‘बालवादी’ – राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसही!

विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, कर्तृत्वानं इंदिरा गांधी मोठ्या की शरद पवार हा महाराष्ट्रात झालेला वाद कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील या दोन्ही नेत्यांचे अनुयायी किती कोत्या मनाचे आणि खुज्या उंचीचे आहेत याचं प्रतीक तर आहेच, त्याशिवाय व्यक्तीकेंद्रित राजकारणाच्या बाहेर येण्याची अजूनही त्यांची तयारी नाही आणि त्यांच्यात राजकीय औदार्य, शिष्टाचार वसहिष्णुतेचा …

ट्युशन्स – एक स्वानुभव!

(अकरावी-बारावी प्रवेशांचे दिवस पुन्हा आलेले आहेत. हवं ते महाविद्यालय मिळेल का नाही, मिळेल त्यात गंभीरपणे शिकवतील का आणि त्यात ट्युशन्स हाही एक कळीचा मुद्दा. यावरचा एक स्वानुभव…) दहावीचा निकाल लागला, लेकीला ७९ टक्के मार्क्स मिळाले. सगळ्याच विषयात विशेष प्राविण्य मिळालं. बापाचं ५५ टक्क्यांचं तर लेकीची आई नेहेमीच फर्स्टक्लास करिअर असलेली. …

कॉंग्रेसचं वाढतं बकालपण

वस्तू आणि सेवा कर लागू होणं, राष्ट्रपतीपदाचा उमेदवार जाहीर करणं, राहुल गांधी यांची चीनी दुतावासाला भेट… अशा काही घटनांतून कॉंग्रेस वस्तू आणि सेवा कर लागू होणं, राष्ट्रपतीपदाचा उमेदवार जाहीर करणं,राहुल गांधी यांची चीनी दुतावासाला भेट… अशा काही घटनांतून कॉंग्रेस पक्षात  सामुदायिक शहाणपणाचा अभाव आणि परस्पर संवादाचा दुष्काळ आहे हे पुन्हा एकदा …

शिवसेनेची तडफड की फडफड!

वस्तू आणि सेवा कर लागू होण्याआधीचे जकात नाके कर जमा करण्यासाठी होते; कसाब सारख्या दहशतवाद्यांना रोखण्याचं काम सुरक्षा यंत्रणेचं होतं आणि अजूनही आहे; हे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना ठाऊक नाही. ही बाब शिवसेना आणि सेनेच्या बहुसंख्य नेत्यांचं आकलन कसं खुजं आहे हे जसं जाणवून देणारी आहे तसंच शिवसेनेचं …

लालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका!

सत्ताकांक्षा फलद्रूप न झाल्याची मध्यवर्ती कल्पना घेऊन समकालिन राजकारणावर वास्तववादी कादंबरी लिहिली गेली तर ती एक अत्यंत कसदार शोकात्म ललित कृती होईल; शरद पवार, नारायण राणे, मायावती, मुलायमसिंह असे काही त्या कादंब-यांचे नायक असू शकतील. लालकृष्ण अडवाणी यांच्यावरची कादंबरी मात्र महाशोकांतिका असेल आणि लालकृष्ण अडवाणी महानायक ठरतील! शरद पवार आणि …

मराठी एकं मराठी !

आम्ही मराठीचे कट्टर पुरस्कर्ते असलो तरी आम्हा दोघां पत्नी-पतीची, पार्श्वभूमी मात्र केवळ मराठीची नाही. मी मूळचा मराठवाड्यातील; १९४७साली देश ब्रिटिशांच्या जोखंडातून स्वतंत्र झाला तरी सप्टेबर १९४८ पर्यंत आमचा मराठवाडा निझामाच्याच अंमलाखाली होता. आमच्या पिढीपर्यंत शिक्षणातही उर्दू माध्यम होतं. माझी आई नर्स होती आणि तिची जिथं पोस्टिंग असे तिथं आमचं शिक्षण …

फडणवीसांचे खूप ​’​अधिक​’​ काही ​’​उणे​’​!

दिग्गज नेते शरद पवार यांनी नाकारलेलं असलं तरी, भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणुकीचं व्यक्त केलेलं भाकीत अगदीच काही फुसकं नव्हतं. मार्च महिन्याच्या शेवटच्या आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आसपास वावरणाऱ्या काही आमदारांनी हीच माहिती खाजगीत बोलतांना दिलेली होती. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची …

वादळी आणि बेडर राजकारणी; उमदा मित्र

(महाराष्ट्राच्या राजकारणात नवी समीकरणे निर्माण करणारे भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मिक अपघाती निधनाला ३ जून २०१७ला तीन वर्ष पूर्ण होत आहेत. प्रस्तुत लेखकाचा गोपीनाथ मुंडे यांच्याशी महाविद्यालयीन जीवनातील मित्र ते एक राजकारणी असा अकृत्रिम संपर्क चारपेक्षा जास्त दशकांचा होता. या लेखकाने त्याच नजरेतून घेतलेला गोपीनाथ मुंडे यांच्यातील उमदा मित्र …

राहुल गांधी आणि बिलंदर काँग्रेसजन !

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यापासून (समाज, मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक्स अशा तिन्ही) माध्यमातील राजकीय विश्लेषक आणि विचारवंता (?)मध्ये कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविषयी मोठी नफरत दाटून आलेली दिसते आहे; कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनीही राहुल त्यांच्यातल्या नेतृत्व क्षमतेविषयी प्रतिकूल प्रतिक्रिया सावधपणे व्यक्त केल्या आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकांपासून कॉंग्रेसच्या आजवर झालेल्या (आणि होणाऱ्या …

नितीन गडकरींची नाबाद साठी !

//१// भारतीय जनता युवा मोर्चाचा शहराध्यक्ष ते भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता ते पक्षाचा एक प्रमुख राष्ट्रीय नेता, एक आमदार ते केंद्रात प्रभावी मंत्री… असा ज्याचा प्रवास पाहता आला आणि ज्याच्या सळसळत्या तरुण वयापासून असलेलं मैत्र आजही कायम आहे, ते नितीन गडकरी येत्या शनिवार, २७ …