प्रिय राणी आणि अभय बंग

राणी आणि अभय या डॉक्टर बंग दांपत्याला पद्मश्री हा सन्मान जाहीर झाल्याचं कळल्यावर आनंदाचे कल्लोळ भेटीला आले; त्याची अनेक जीवाभावाची कारणं आहेत. गेल्या अनेक वर्षापासून आमच्यात प्रांजळ मैत्री आहे. त्यातही अभयशी जास्त संपर्क असतो. अकृत्रिम मैत्रीचे हे बंध आमच्या पुढच्या पिढीतही कायम आहेत. राणी आणि अभय या बंग डॉक्टर दांपत्याच्या, …

तोगडियांचे नकाश्रू…

विश्व हिंदू परिषदेचे नेते डॉ. प्रवीण तोगडिया यांना प्रकाश वृत्त वाहिन्यांवर ‘लाईव्ह’ अश्रू ढाळतांना पाहिल्यावर या माणसात कोडगेपणा खच्चून भरलेला आहे याची खात्री पटली . राम मंदिराच्या उभारणीसाठी आधी विखारी धर्मांध चळवळ आणि नंतर त्यापेक्षाही जास्त विखारी आंदोलन करतांना मरण पावलेल्या किंवा गुजरातेत झालेल्या दंगलीत बळी पडलेल्या कोण्याही जाती-धर्माच्या माणसाच्या …

अविवेकाचा धुरळा !

गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन पांचव्या मुख्य न्यायमूर्तींच्या संदर्भात जी काही परिस्थिती कथन केली ती जितकी चिंताजनक आहे, त्यापेक्षा जास्त त्यानिमित्तानं उडालेला अविवेकाचा धुरळा अस्वस्थ करणारा आहे. आपल्या देशाच्या कनिष्ठ ते अगदी सर्वोच्च न्याय व्यवस्थेत सर्व काही ‘ऑलवेल’ नाही, याचे अनेक संकेत आणि दाखले यापूर्वीही मिळालेले …

लालुंचा हुच्चपणा!

चारा घोटाळ्यात आतापर्यंत दोन खटल्यात लालूप्रसाद यादव यांना तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा झालेली आहे. तिसऱ्या खटल्याचा निकाल या महिन्याच्या शेवटी लागण्याची शक्यता आहे, अशा बातम्या वाचनात आल्या आहेत. तो निकाल लागल्यावरही चारा घोटाळा प्रकरणातील अजून तीन खटले बाकी आहेत. पहिला निकाल लागला तेव्हा केंद्रात कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएचं सरकार होतं तर …

भीमा कोरेगावनंतर : काही निरीक्षणे

// एक // आधी भीमा कोरेगावला मग त्याची प्रतिक्रिया म्हणून राज्यभर जे काही प्रतिसाद उमटले त्यावरून आपल्या राज्याचं पोलीस दल समाज मनाची नाडी ओळखण्यात कसं थिटं पडलं आहे , हे विदारकपणे समोर आलेलं आहे . गेल्या वर्षभरापासून भीमा कोरेगावच्या कार्यक्रमाची तयारी सुरु होती , त्यासाठी गावोगाव बैठका घेतल्या जात होत्या …

बेपर्वाईचे बळी…

मुंबईतल्या परळ भागातील पूर्वीच्या कमला मिल्सच्या कंपाऊंडमधील दोन हॉटेल्सना लागलेल्या आगीत १४ जणांचा झालेला मृत्यू म्हणजे साक्षात बेपर्वाईचे बळी आहेत आणि या बेपर्वाईत सर्वपक्षीय राजकारणी, प्रशासन आणि बेफिकीर धनांधळे पालक अशा सर्वांचा सक्रीय सहभाग आहे. ज्यांनी या भागाला भेट दिलेली असेल त्यांना इतके बळी हकनाक घेणारी ही घटना इतक्या उशीरा …

लालुंचा घोटाळा आणि जिगरबाज ‘ते’ चौघे!

​(रांचीच्या विशेष सीबीआय न्यायालयाने चारा घोटाळा प्रकरणी​ लालूप्रसाद यादव आणि जगन्नाथ मिश्रा या बिहारच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांना दोषी धरले आहे. हा घोटाळा नेमका काय आहे, तो कसा उघडकीस आला याचा वेध घेणारा हा मजकूर पुनर्मुद्रित करत आहोत. याच ब्लॉगवर हा मजकूर १३ मे २०१७ला प्रकाशित झाला होता   https://goo.gl/68ANVJ  ) जयप्रकाश …

निकाल गुजरातचा, इशारा महाराष्ट्रालाही!

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुका एकदाच्या संपल्या. गेले काही दिवस विशेषत: गुजरातची निवडणूक हा सार्वर्त्रिक चर्चेचा विषय होता. समाज माध्यमांवर तर अनेकदा या ऊत आलेल्या चर्चेला अधिकृत/अचूकतेचा ना शेंडा असायचा ना बुडखा. या चर्चा म्हणा की, मत-मतांतराला एक तर कोणाच्या तरी टोकाचा भक्तीचा किंवा टोकाचा द्वेषाचा रंग असायचा. गुजरातच्या …

विश्रामगृह नावाची ​(बकाल झालेली) ​संस्कृती…

शासकीय विश्रामगृहांचं लहानपणापासूनच एक सुप्‍त असं आकर्षण मनात होतं. आई आणि वडील दोघेही शासकीय नोकरीत असल्यानं त्यांचे वरिष्ठ गावी आल्यावर विश्रामगृहावरच उतरत असत. विश्रामगृहाच वातावरण कसं एकदम अ‍ॅरिस्टोक्रॅटीक, कव्हर घातलेले शिस्तबध्द सोफे, खानसामा आणि अन्य कर्मचारी युनिफॉर्ममध्ये, जेवणाच्या टेबलवर आकर्षकपणे मांडून ठेवलेला संरजाम मनात खोलवर तेव्हापासूनच रुतून बसला. तो बडेजाव …

राहुलसमोरील आव्हाने !

गुजरात  विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजत असतांना, कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याचा बहुप्रतिक्षित असलेला राहुल गांधी यांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. २८ डिसेंबर १८८५रोजी स्थापन झालेल्या म्हणजे १३२ वर्षांची परंपरा असलेला कॉंग्रेसचा विचार, या विचारानं या देशाला दिलेलं राजकीय मॉडेल, हा मूळ पक्ष फुटल्यावर १९६९ साली झालेल्या काँग्रेस (आय किंवा इंदिरा) …