ग्रंथांचं गुणगुणणं !
आईला आम्ही माई म्हणत असू. शिक्षा करण्याची माईची संवय जगावेगळी होती (हे आता जाणवतं!); खोड्या केल्या, चूक जरा गंभीर असली किंवा शेजारपाजारच्या कोणी चुगली केली तर पितळी पिंपातील पाण्यात उभं राहण्याची आणि तसं उभं असतांना म्हणजे, शिक्षा भोगताना एखादं पुस्तक मोठ्या आवाजात वाचण्याची सक्ती असे. शिक्षेची तिनं ठरवलेली मुदत संपण्याआत …