एकाच माळेचे मणी!
देशाच्या सांसदीय राजकारणात सध्या जे काही सुरु आहे ते मन उद्विग्न करणारं आहे. सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंकडून ‘मला संसदेत बोलू दिलं जात नाही’ असा टाहो फोडला जातोय. लोकशाही म्हणजे संवादातून चालणारं सरकार, हा आजवरचा समज पूर्णपणे चूक कसा आहे, हेच सिध्द करणारा आरोप-प्रत्यारोपांचा कोलाहल माजलाय; संसदेचा मासळी बाजार …