‘महाधिवक्ता’ श्रीहरी अणे !
अणे या आडनावामुळे वकील असणाऱ्या श्रीहरी अणे विषयी उत्सुकता निर्माण झाली. नागपूरच्या पत्रकारितेत मी डेरा टाकून जम बसवेपर्यंत निष्णात ‘कॉन्सटीट्युशनल लॉयर’ म्हणून श्रीहरी यांचं नाव झालेलं होतं. तळागाळातल्या, वंचित समाजाच्या समस्या मांडणाऱ्या विविध जनहित याचिका (स्वखर्चाने) लढवणारा आणि त्यातही महत्वाचं म्हणजे कट्टर विदर्भवादी वकील म्हणूनही श्रीहरी यांची प्रतिमा उजळ झालेली …