नव्वदीच्या उंबरठ्यावरचा आशावादी कॉम्रेड !
आत्ममग्न भासणा-या अजय भवनातील एका साध्या खोलीत भाई बर्धन यांची भेट झाली तो, त्यांचा वयाच्या ८८व्या वर्षाचा शेवटचा दिवस होता . चेहे-यावर वार्धक्याच्या खुणा सोडल्या तर १९८०च्या सुमारास पाहिलेली त्यांची ऐट आणि नागपूरच्या पत्रकार भवनात काय किंवा रस्त्यावर काय, मोर्चात मूठ वळवून घोषणा देणारी बर्धन यांची चिरपरिचित सळसळती देहबोली कायम …