पंकजा मुंडे यांचे अरण्यरुदन !

लोकसभेची सदस्य असलेल्या , सख्खी बहीण प्रीतम यांना नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान न मिळाल्यामुळे पंकजा मुंडे बऱ्याच अस्वस्थ आहेत . मंत्रीमंडळ विस्तारानंतर दिल्लीहून मुंबईला परतल्यावर केलेल्या भाषणात आणि दिव्य मराठी या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अस्वस्थता , रोष आणि संभाव्य बंडखोरीही मोठ्या चतुराईनं व्यक्त केलेली आहे . पंकजा मुंडे या …

उतावीळ नाना पटोळे !

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत रॉजर फेडररची डॉमिनिक केफ्फर याच्या विरुद्धची लढत पाच सेटसपर्यंत आणि जवळजवळ सुमारे अडीच तासावर चालली . फेडरनं हा सामना ७-६ , ६-७ , ७-६ , ७-५ असा जिंकला . म्हणजे दोन्ही खेळाडूंची  किती दमछाक झाली असेल हे लक्षात घ्या . पण , त्यातही कौतुक  रॉजर फेडररचं …

शंकरराव चव्हाण : कांही नोंदी

|| १ || शंकरराव चव्हाण आधी मंत्री आणि नंतर पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले , तो काळ माझ्या शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाचा होता . महाविद्यालयीन शिक्षण घेण्याच्या वर्षांपासूनच मी समाजवादी विचारांच्या लोकांच्या सहवासात आलेलो होतो आणि समाजवाद्याच्या मनात तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांच्याविषयी जो काही एक आकस किंवा अढी असायची , तो आकस म्हणा …

आदित्यनाथ : योगी की हट्टी योगी ?

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला सात महिने उरलेले असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात सुरु असलेल्या शीत युद्धानं  निर्णायक वळण घेतलेलं आहे . योगी आदित्यनाथ जर असेच अडून बसले तर मोदींची  चांगलीच पंचाईत होणार आहे . देशाच्या राजकारणात नरेंद्र मोदी यांना आव्हान देऊ शकणारा नेता सध्या तरी दृष्टीपथात नाही …

विधिमंडळ अधिवेशनाचं ‘तेच ते’…

राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन यावेळीही दोनच दिवसच होणार आहे . या अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास नसेल . आपल्या देशातल्या सर्वच राज्यांच्या विधिमंडळांच्या तसंच संसदेच्याही अधिवेशनांचं कामकाज म्हणजे  लोकशाहीची क्रूर थट्टा झाली आहे . अलीकडच्या अडीच-तीन दशकात विधिमंडळ काय किंवा संसद , अधिवेशन पूर्ण कालावधी किमान गंभीरपणे चालवलं जात नाही आणि त्याचं …

बायडेन , पवार आणि माध्यमांची अगतिकता !

एक आंतरराष्ट्रीय , एक राष्ट्रीय आणि दोन राज्यस्तरीय ‘न्यूज अलर्ट’ माझ्याकडे आहेत . शिवाय व्हॉटसअप विद्यापीठ आहेच . त्यामुळे दिवसाचे चोवीस तास बातम्यांचा रतीब सुरुच असतो . गेल्या आठवड्यात एका आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त वृत्तवाहिनीकडून एक ‘ब्रेकिंग अलर्ट’ मिळाला की ,  अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या कुटुंबियाच्या लाडक्या असलेल्या ‘चॅम्प’ या जर्मन शेफर्ड …

सुंदरलाल बहुगुणा येती घरा !

पत्रकारिता करताना अनेक प्रसंग आणि व्यक्ती येऊन कधी आदळतील यांचा कांहीच नेम नसतो . कधी हे अनपेक्षितपणे घडतं तर कधी ते अपेक्षित असतं तर कधी पूर्वनियोजनाप्रमाणे घडत असतं . त्यामुळे कधी आपण भोवंडून जातो , कधी चकित होतो तर कधी त्यामुळे एक सुखद अशी भावना मनात निर्माण होते . नुकतेच …

पासवानांच्या ‘चिराग’ची फडफड ! 

शह-काटशह , डाव-प्रतिडाव , कोपरखळ्या , खुन्नस-वचपा , अशा अनेक कृती राजकारणात सतत घडत असतात . या कधी दृश्यमान असतात तर कधी नसतात . दृश्यमान नसणाऱ्या अशा कृतींचे परिणाम काही काळानंतर दिसू लागतात . राजकारणाचा हा खेळ कधी कुणाला वर चढवतो , तर कधी कुणी राजकारणाच्या साप-शिडीवरुन थेट तळाला येऊन …

मुद्दा , कुणी पक्ष सोडण्याचा नाही !

जितीन प्रसाद यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला म्हणून फार काही आभाळ कोसळलं आहे , असं समजण्याचं कारण नाही कारण पक्षातरं आता भारतीय राजकारणाचा अविभाज्य अंग झालेली आहेत . एखाद्या नेत्यानं पक्षांतर केलं हा मुद्दा नसून आता तरी काँग्रेस पक्ष खडबडून जागा होणार का नाही हा खरा मुख्य मुद्दा आहे …

पत्रकारांना संरक्षण देणारा निवाडा !

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय  उदय ललित आणि विनीत सरण यांनी नुकताच  ‘सरकारच्या कोणत्याही कृतीवर केलेली टीका हा राजद्रोह नाही’ , असा विनोद दुवा या ज्येष्ठ पत्रकाराच्या संदर्भात दिलेला निर्वाळा स्वागतार्ह आणि दिलासादायकही आहे . निर्भयपणे टीकास्त्र सोडणार्‍या पत्रकारांना त्यामुळे संरक्षणच मिळणार आहे . मात्र , एखाद-दुसरा अपवाद वगळता मराठी वृत्तपत्रसृष्टीने या …