काँग्रेस आणि राहुल गांधींचे भवितव्य ठरवणारी पदयात्रा…
काँग्रेस पक्षाच्या नवीन ( आणि गांधी कुटुंबाच्या बाहेरच्या असलेल्या) अध्यक्षाच्या निवडणुकींच्या हालचालींनी वेग घेतलेला असतांना हा मजकूर प्रकाशित होईल तेव्हा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या भारत जोडो यात्रेला पंधरवडा उलटलेला आहे . उल्लेखनीय बाब म्हणजे , या पंधरा दिवसांत तरी कष्टकरी-कामकरी , सर्वसामान्य आणि विशेषत: युवकांमध्ये या यात्रेविषयी मोठं …