गुलाम नबींची ‘आझादी’ कचकड्याची न ठरो !

अपेक्षेप्रमाणे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसचा त्याग केला आहे . भाजप शासित केंद्र सरकारकडून ‘पद्म’ सन्मान मिळाला आणि राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपली तेव्हा निरोपादखल केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अश्रू गाळले , तेव्हापासून गुलाम नबी काँग्रेस सोडणार असल्याची आवाजात चर्चा होती ; ती आता खरी ठरली आहे …

नितीन गडकरी , बोला की स्पष्टपणे एकदा !

( ■चित्र – विवेक रानडे ) भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीतून एक दिग्गज नेते नितीन गडकरी यांना वगळून त्याजागी देवेंद्र फडणवीस यांचा समावेश करण्यात आल्याचा मुद्दा बराच चर्चेत आहे . राजकारणात २+२ = ४ असं कधीच नसतं ; ते तीन , पांच किंवा पाचशेसुद्धा असू शकतं . म्हणूनच त्याला …

भाजपच्या डोळ्यांतलं  घराणेशाहीचं मुसळ !

( ■ चित्र – विवेक रानडे ) भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा ‘घराणेशाहीपासून मुक्ती’ हा प्रकाशित झालेला लेख ‘दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण , स्वत:च्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही ’ , ही म्हण सार्थ ठरवणारा आहे. केशव उपाध्ये जुने मित्र आहेत  ते , गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू म्हणून …

निवडणूक चिन्हांबद्दल बोलू कांही…

‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळणार , यावरच्या अटकळी आणि पैजा सध्या जोरात आहेत . समाज माध्यमांवरचे राजकीय विश्लेषक (?) आणि घटनातज्ज्ञ (?) त्यावर हिरिरीनं  व्यक्त होत आहेत . हे प्रकरण सध्या निवडणूक आयोगासमोर प्रलंबित असतानाच शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली . वस्तुत: …

जिव्हाळ्याची सावली !

■विदर्भाच्या राजकारण , समाजकारण , शिक्षण , पर्यावरण  आणि सांस्कृतिक क्षेत्रातील  ज्येष्ठ नेते गिरीश  गांधी आज , २३ जुलै २०२२ला वयाच्या पंच्याहत्तरीत प्रवेश करत आहेत . त्यानिमित्ताने प्रकाशित होणाऱ्या ‘सावली’ या गौरव ग्रंथातील  हा  ‘अनकट ‘ लेख  – ■ सर्व  छायाचित्रे – विवेक रानडे  एखादं शहर पूर्ण जाणून घ्यायचं असेल …

मिथकात अडकलेले उद्धव ठाकरे…

महाराष्ट्रात सत्तांतर झालं . काहींना त्याचा आनंद झाला , काहींना ते फारच झोंबलं . अनेकांना ते सत्तांतर ज्या पद्धतीनं घडलं ते मुळीच रुचलं नाही . त्या सत्तांतराच्या संदर्भात अगदी घटना तज्ज्ञ ते फेसबुकीय राजकीय  तज्ज्ञांनी   मतं-मतांतरं व्यक्त केलेली आहेत . सध्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असे दोनच मंत्री आहेत . राष्ट्रपतीपदाची निवडणूक …

‘प्रश्न विचारणारी पत्रकारिता आता अस्ताला गेली आहे’ 

महाराष्ट्रात झालेली राज्यसभा निवडणूक ते सत्तांतर या सुमारे तीन आठवड्यांच्या प्रवासात आपल्या सर्वच माध्यमांच्या विश्वासार्हतेनं धोक्याची पातळी गाठलेली आहे . डावे असो की उजवे , पुरोगामी असो की , प्रतिगामी , मोदी समर्थक असो की , विरोधक अशा सर्वांच्याच माध्यमांबाबतच्या प्रतिक्रिया मुळीच सकारात्मक नाहीत . स्पष्ट सांगायचं तर , माध्यमांचं आणि त्यातही प्रकाश वृत्तवाहिन्यांचं वृत्तसंकलन या काळात पिसाळल्यासारखं …

विलासराव-गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर राजकारणात मराठवाडा पोरका…  

■ औरंगाबादच्या ‘आदर्श गावकरी’ या दैनिकांचा वर्धापन दिन नुकताच साजरा झाला . त्यानिमित्ताने ‘आदर्श गावकरी’ने एक विशेष पुरवणी प्रकाशित केली . त्या पुरवणीत पत्रकार उद्धव भा . काकडे यांनी मराठवाड्याच्या विद्यमान राजकीय  परिस्थितीच्या संदर्भात घेतलेली ही माझी मुलाखत -■ शंकरराव चव्हाण यांना मराठवाड्याच्या स्वातंत्र्य लढ्याची पार्श्‍वभूमी होती. त्यानंतर विलासराव देशमुख, गोपीनाथ …

शिवसेना कुणाची : ठाकरे का शिंदेची ?

■ परत येण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन एकनाथ शिंदे यांनी अजून तरी माघार घेतलेली  नाही , हे गृहीत धरुन हा मजकूर लिहिलेला आहे . ■ हा मजकूर प्रकाशित होईल तेव्हा शिवसेनेतील सत्ता संघर्ष सुरु होऊन सुमारे एक आठवडा झालेला असेल.  हा संघर्ष आता शिवसैनिकांना मान्य असणारी आणि केवळ ठाकरे कुटुंबीयांचं नेतृत्व …

महाविकास आघाडीचं गर्वहरण !

राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्षाचा तिसरा उमेदवार विजयी होणं म्हणजे , राज्यातील सत्ताधारी आघाडीचं गर्वहरण होणं आहे . पसंती क्रमानं होणारी निवडणूक म्हणजे बाष्कळ बडबड नसते तर ती निवडणूक जिंकण्यासाठी भिंत बांधताना जशी एकेक वीट रचायची असते त्याप्रमाणे एकेका मतांची विचारपूर्वक तजवीज करायची असते , हा धडा या निकालातून …