महाविकास आघाडीचं गर्वहरण !
राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्षाचा तिसरा उमेदवार विजयी होणं म्हणजे , राज्यातील सत्ताधारी आघाडीचं गर्वहरण होणं आहे . पसंती क्रमानं होणारी निवडणूक म्हणजे बाष्कळ बडबड नसते तर ती निवडणूक जिंकण्यासाठी भिंत बांधताना जशी एकेक वीट रचायची असते त्याप्रमाणे एकेका मतांची विचारपूर्वक तजवीज करायची असते , हा धडा या निकालातून …