‘फाजल’ सुलभाताई !

■■ ज्येष्ठ संगीत समीक्षक सुलभा पंडित मूळच्या सोलापूरच्या ,त्यांचं शिक्षण औरंगाबादला झालं आणि विवाहोत्तर वास्तव्य झालं विदर्भात . सुलभाताईंच्या निधनाला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं . त्यानिमित्तानं सुलभाताईंनी संगीतविषयक लिहिलेले कांही लेख , परीक्षणं आणि व्यक्तिचित्राचं ‘सुरावरी हा जीव तरंगे’ हे कॉफी टेबल बुक त्यांच्या कुटुंबियांच्यावतीने प्रकाशित होत आहे . …

-तर कॉँग्रेसचं अस्तित्व सूक्ष्मदर्शक यंत्रातून शोधावं लागेल !

( आणीबाणी उठवल्यावर झालेल्या लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसचा दारुण पराभव झाला तेव्हा म्हणजे  , सुमारे ४२ वर्षांपूर्वी ,  प्रख्यात व्यंगचित्रकार आर . के . लक्ष्मण यांनी काढलेलं हे व्यंगचित्र…व्यंगचित्रकार किती भविष्यवेधी असतो नाही ? ) पाच राज्याच्या निवडणुकांत अपेक्षेप्रमाणे भाजपनं उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये सत्ता प्राप्त केली . गोव्यामध्ये बहुमताच्या काठावर असल्यानं …

नरेंद्र लांजेवार : बुलढाण्याचा सांस्कृतिक दूत…

‘नागपूर पत्रिका’ या दैनिकाच्या दिवसांत कधीतरी नरेंद्र लांजेवारची ओळख झाली . त्याच काळात केव्हा तरी स्त्री अत्याचाराच्या विरोधात ठामपणे संघर्ष करणाऱ्या डॉ. सीमा साखरे यांनी बुलढाण्याजवळच्या सैलानी बाबा दर्ग्याच्या परिसरातील स्त्री शोषणाबद्दल लिहिलं होतं . त्या संदर्भात आम्ही दोघे तिघे पत्रकार अधिक माहिती घेण्यासाठी गेलो तेव्हा नरेंद्र लांजेवार दिवसभर आमच्यासोबत …

मनस्वी चित्रकार दिलीप बडे

दिलीप बडेची ओळख आम्हा दोघांच्याही विद्यार्थीदशेपासूनची . आम्ही दोघंही मराठवाड्यातले पण , ओळख झाली ती मात्र मुंबईत . तेव्हा तो ‘जेजे’ला होता आणि मी मुंबईत पोटासाठी पत्रकारितेच्या धबडग्यात नुकतंच शिरलो होतो . तेव्हा आठवड्यातून एखादी तरी चक्कर ‘जेजे’ ला मारण्याचा माझा रिवाज होता . कारणं दोन . एक म्हणजे जगण्याची …

रसिकतेच्या झाडावर विहरणारा पक्षी…

पहिल्यांदा भेटायला आला तेव्हा तरुण  सुहास जेवळीकरच्या अंगावर अॅप्रन होता . तेव्हा मी अपरिहार्यपणे नेहरु युवक केंद्राचा ‘अर्ध्याहून अर्धा’ वेळेचा ग्रंथपाल होतो . त्या कामाचे दरमहा ५० रुपये वेतन मिळे . त्यातून माझा दरमहा खानावळीचा दोन्ही वेळच्या जेवणाचा ४५ रुपये खर्च भागत असे , पण ते असो.. नेहरु युवक केंद्रासोबतच …

भाजप विरोधाची कच्ची मोळी !

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नुकत्याच केलेल्या मुंबई दौऱ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच (महा)राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन केंद्र आणि राज्य सरकारमधील संघर्ष चर्चेत आणला आहे . हा संघर्ष तसा काही नवीन मुद्दा नाही . यापूर्वीही केंद्र आणि राज्य सरकारांतील संघर्ष , परस्परांतील तणावपूर्ण संबंधाबाबत चर्चा …

सुधीर जोशी… ऐसा नेता पुन्हा न होणे !

तुम्ही युवक आहात याचं प्रमुख लक्षणं म्हणजे साप्ताहिक ‘मनोहर’चं वाचन , असं असण्याचा तो सत्तरीच्या दशकातला काळ होता . आताच्या भाषेत सांगायचं  तर साप्ताहिक ‘मनोहर’ व्हायरल झालेलं होतं . ‘मनोहर’च्या अशाच एका अंकात मुंबईचे स्मार्ट महापौर सुधीर जोशी यांचं ‘इम्पाला’ या कारसोबतचं छायाचित्र पाहण्यात आलं . हिंदी चित्रपटांमुळे तेव्हा इम्पाला …

राजकारण नव्हे ही तर गटारगंगा !

( गणंग म्हणजे – ( १ ) धान्यांतील न शिजणारा दाणा ; भिजण्यांत मऊ न होतां , शिजविल्यानंतरही टणक राहणारा दाणा . जोंधळा इ. धान्याच्या लाह्या केल्या असता त्यातला न फुटलेला दाणा . ( २ ) (ल.) मूर्ख, टोणपा, अक्षरशत्रू , ठोंब्या , मतिमंद माणूस . —- वझे शब्दकोश ) …

नरेंद्र मोदी खोटारडे आहेत , असं म्हणणार नाही पण-

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत जे भाषण केलं आणि त्यात महाराष्ट्राच्या संदर्भात कांही बेताल वक्तव्य केली . त्याबद्दल खरं तर , नरेंद्र मोदी यांना खोटारडा म्हणण्याची इच्छा मी कटाक्षानं आवरली आहे . याची कारणं दोन-प्रदीर्घ काळ विधिमंडळ आणि संसदेच्या कामाचं वृत्तसंकलन केल्यानं खोटं/खोटारडा/चूक हे शब्द संसदीय …

​अर्थसंकल्प : काही आठवणी आणि गमती जमती !

​​यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर होत असतानाच महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या जनसंवाद आणि वृत्तपत्रविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कामाचा एक भाग म्हणून ‘लाईव्ह’ वृत्तसंकलन केलं आणि त्याचा ‘एमजीएम संवाद’ हा  विशेषांक प्रकाशित केला . त्या अंकाचं प्रकाशन करताना अर्थसंकल्प वृत्तसंकलनाच्या ८० च्या दशकातल्या अनेक आठवणी जाग्या झाल्या . एक पत्रकार म्हणून …