सत्ताधुंद आणि आचरटेश्वरांच्या देशा !

‘राजीव गांधी यांनी नायजेरियन (म्हणजे काळ्या वर्णाच्या) मुलीशी लग्न केले असते तर त्या मुलीला कॉंग्रेसने नेता म्हणून स्वीकारले असते का ?’ अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी सोनिया गांधी यांच्या वर्णाच्या संदर्भात केलेली टिप्पणी कोणाही सुसंस्कृत आणि सभ्य माणसाला असभ्य, अश्लाघ्य आणि निर्लज्जपणाचा कळस वाटणारी असली …

फडणवीस, रयतेचे मुख्यमंत्री व्हा!

पत्रकारितेत १९७८ साली आल्यानंतर नागपूर शहरात २६ वर्ष वास्तव्य झाले. या शहराने वार्ताहर ते संपादक असा माझा प्रवास पहिला. सुख-दुखाच्या क्षणी या शहराने भावना मोकळ्या करण्यासाठी मला आधार दिला. हे शहर, तेथील अगणित भली-बुरी माणसे, रस्ते, झाडे, अनेक संस्था, वास्तू, असह्य टोचरा उन्हाळा, बोचरी थंडी, बेभान पाऊस… इत्यादी इत्यादी माझ्या …

कारण ‘राज’ आणि शिवाजीराव देशमुख

औरंगाबाद महापालिकेच्या येत्या निवडणुकीच्या चाचपणीसाठी आलेल्या राज ठाकरे यांची भेट झाली. अर्थातच भरपूर गप्पा झाल्या. मी म्हणालो, ‘फार उशीर केला तुम्ही औरंगाबादची निवडणूक लढवण्यासाठी यायला. या शहराची वाट लावली आहे. एके काळी टुमदार आणि देखणं असणारं हे गाव बकाल करून टाकलंय लोकप्रतिनिधींनी गेल्या दहा-बारा वर्षात’. राज ठाकरे म्हणाले, ‘म्हणूनच नाही …

काटजू यांचा उठावळपणा!

महात्मा गांधी नावाचा माणूस समजून न घेता आणि याच गांधी नावाचा विचार उमजून न घेता टीका करण्याचा उठावळपणा करणाऱ्यांच्या यादीत आता मार्कंडेय काटजू या इसमाची भर पडली आहे. एक अत्यंत फाटका माणूस आणि त्याने मांडलेला जीवनवादी विचार मिळून गांधीवाद तयार झाला. याच गांधीवादाने जगातल्या अनेकांना ‘माणूस’ म्हणून जगण्याची प्रेरणा दिली, …

आव्हानांच्या चक्रव्यूहात अशोक चव्हाण!

अsssssssखेर काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना बदलले. या बदलाला इतका उशीर झालाय की योग्य वेळी घेतलेला निर्णय असे म्हणता येत नाही की देर आये दुरुस्त आये, असेही म्हणता येत नाही. माणिकराव ठाकरे २१ ऑगस्ट २००८ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले तेव्हा राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता होती. काँग्रेसचे राज्यातले लोकसभेत १३ आणि विधानसभेचे …

कलगीतुरा – महाराष्ट्र आणि बिहारमधला

महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये सर्व काही सुरळीत नाही हे काही आता लपून राहिलेले नाही. या सरकारातील मुख्यमंत्र्यासकट सर्वांनीच अंतर्गत धुसफुस म्हणा की नाराजी वेळोवेळी जाहीर करण्यात कोणतीही कमतरता ठेवलेली नाही. भाजपातील एकनाथ खडसे या ज्येष्ठ मंत्र्याने लाख्खो मराठी माणसाचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरात विठोबा-रुखमाईच्या आरतीनंतर मुख्यमंत्रीपदी बहुजनांचा प्रतिनिधी (म्हणजे …

डिलीट न होणारी माणसं…

एक म्हणजे, दैववादी किंवा नियतीवादी नसल्याचा तोटा काय असतो तर, आर आर पाटील यांच्या मृत्यूचे समर्थन करता येत नसल्याने त्याचे खापर कोणावर तरी फोडून मोकळे होता नाहीय. दुसरे म्हणजे, हे विधान करत असतानाच हेही स्पष्ट केले पाहिजे की, मी काही आरआर यांच्या खास वगैरे वर्तुळात नव्हतो. तरीही त्यांच्या मृत्यूची बातमी …

…हा दिवा विझता कामा नये !

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी बहुमत संपादन करणार, सभागृहातील सर्वात मोठा पक्ष हे भारतीय जनता पक्षाचे स्थान जाणार आणि काँग्रेसला पाचच्या आत जागा मिळणार हे अंदाज होतेच. प्रचारच्या शेवटच्या टप्प्यात दिल्लीत होतो तेव्हा ‘आप’ला ४०-४२ जागा नक्की मिळतील, हा आकडा  ४५ पर्यंत जाऊ शकतो असे वातावरण होते. मात्र दिल्लीकर मतदारांनी …

दिल्लीची उत्कंठा शिगेला !

उत्कंठा शिगेला पोहोचवणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अगदी अंतिम टप्प्यात दिल्लीत होतो. निवडणुकीच्या रणांगणातल्या भाषेत ‘कत्तल-की-रात’ असणारे जाहीर प्रचाराचा शेवटचा आणि संपल्यानंतरचा हेही दोन दिवस त्यात होते. हा मजकूर प्रकाशित होईपर्यंत दिल्लीत मतदान झालेले असेल. मतदारांचा कौल १० फेब्रुवारीला दुपारी बाराच्या आत कळेल. त्याआधी मतदार पाहण्याचे निष्कर्ष प्रकाशवृत्त वाहिन्यांवरून आलेले असतील. …

‘टिस’ही तुळजापूरचे आणि दुष्काळाचे मळभ…

तुळजाभवानीचे मंदिर असलेले गाव, ही उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर या गावाची ओळख सर्वसामान्यपणे आहे. या गावाच्या कुशीत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (‘टिस’) नावाची एक राष्ट्रीय स्तरावरची नामांकित संस्था आहे याची माहिती मराठवाड्यातही अनेक विद्यार्थी, पालक, पत्रकार, बुद्धिवंतांना नाही. या संस्थेत ‘Media and Politics in India: with reference to Electoral Politics’ …