ट्युशन्स – एक स्वानुभव!
(अकरावी-बारावी प्रवेशांचे दिवस पुन्हा आलेले आहेत. हवं ते महाविद्यालय मिळेल का नाही, मिळेल त्यात गंभीरपणे शिकवतील का आणि त्यात ट्युशन्स हाही एक कळीचा मुद्दा. यावरचा एक स्वानुभव…) दहावीचा निकाल लागला, लेकीला ७९ टक्के मार्क्स मिळाले. सगळ्याच विषयात विशेष प्राविण्य मिळालं. बापाचं ५५ टक्क्यांचं तर लेकीची आई नेहेमीच फर्स्टक्लास करिअर असलेली. …