जांबुवंतराव नावाचं एकाकी वादळ!

तेव्हा; आमच्या लहानपणी शाळेला सुट्या लागल्या की मामाच्या गावाला जाण्याची प्रथा होती. मला तर चार मामा होते. पण, मला उमरखेडच्या अशोकमामाकडे जायला आवडायचं कारण आजी-तिला आम्ही अक्का म्हणत असू, फार लाड करत असे. अशोक खोडवे हा मामा आणि मामी दोघीही शासकीय नोकरीत होते. उमरखेडच्या आठवडी बाजाराला लागून असलेल्या एका भल्यामोठ्या …

मुख्यमंत्री, ऐका ही अस्वस्थ समाजमनाची स्पंदनं…

-येवला तालुक्यातील नगरसूलच्या कृष्णा डोंगरे या शेतकऱ्यानं शेतातला कांदा पेटवून दिला, कारण भाव नाहीत; ही बातमी वाचत असतानाच बुलढाण्याहून पत्रकारितेतला दीर्घकाळचा सहकारी सोमनाथ सावळे यांचा फोन आला. सोमनाथ मुळचा शेतकरी. आता शेती आणि पत्रकारिता यांची सांगड घालून वावरत असतो. निवडणुकांचा विषय निघाल्यावर सोमनाथ म्हणाला, ‘सोयाबीनचे भाव पार पडल्यानं शेतकरी मेटाकुटीला …

‘राज, तुम्हारा चुक्याच !’

शिवसेनेचे नेते मनोहर जोशी आणि सुधीर जोशी हे नात्यानं मामा-भाचे. मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या मंत्रीमंडळात सुधीर जोशी महसूल मंत्री होते. त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या मामांविषयी सुधीर जोशी यांची एक मुलाखत प्रकाशित झाली होती. त्यात एक प्रश्न होता – ‘मनोहर जोशी यांच्या स्वभावातला सगळ्यात स्ट्रॉंग पॉईंट कोणता?’ त्यावर सुधीर …

नो पार्टी इज डिफरन्ट !

‘पार्टी वुईथ डिफरन्स’ असं कितीही म्हणवून घेतलं तरी भारतीय जनता पक्ष आपल्या देशातील अन्य कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा मुळीच वेगळा नाही हे सांगायला नकोच. भाजपत असलेली बजबजपुरी, हेवेदावे, सत्तास्पर्धा, घराणेशाही अन्य पक्षांपेक्षा काहीही वेगळी नाहीये; अन्य राजकीय पक्षांनी ते ‘डिफरन्ट’ असल्याचा दावा कधीच केलेला नाही तर आपला पक्ष ‘वेगळा’ असल्याचे फुसके …

‘न उतले-मातले’ले दोन राज्यपाल!

बुध्द : सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवासराव पाटील यांनी सप्रेम भेट दिलेली भगवान बुध्द यांची विलक्षण रेखीव मूर्ती. देशाच्या उत्तरपूर्व भागात भटकंती करायला जायची विमानाची तिकीटं हातात आल्यावर आसामचे राज्यपाल बनवारीलालाजी पुरोहित आणि सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवासराव पाटील यांची सहाजिकच आठवण झाली. पत्रकारांच्या आमच्या पिढीपेक्षा जगण्याचे दहा-बारा उन्हाळे-पावसाळे जास्त पाहिलेली आणि कर्तृत्वानं ज्येष्ठ …

वनव्रतस्थ मारुती चितमपल्ली

‘भगवे’पणाचा निकष आड न आणला जाता ज्येष्ठ साहित्यिक, व्रतस्थ ‘वनसंत’ मारुती चितमपल्ली यांना राज्य सरकारचा विंदा करंदीकर सन्मान जाहीर झाला आणि त्यांची झालेली पहिली भेट आठवली— विशेषत: महाराष्ट्र टाइम्स या दैनिकात आलेलं चितमपल्ली यांचं लेखन वाचनात आलेलं असल्याचे ते दिवस होते. ते लेखन वेगळं होतं, त्याला अनवट असा रानगंध होता, …

राजकीय अस्तित्वाची दंगल!

अपेक्षेप्रमाणे नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची दंगल सुरु झाली आहे. थंडीच्या लाटेत सापडलेल्या उत्तरप्रदेश, पंजाब, उत्तराखंडात राजकीय हवा तापण्याचे दिवस आलेले आहेत. पाच राज्यातील एकूण ६९० मतदार संघात निवडणूक आयोगानं सुरु केलेल्या निवडणुकीच्या दंगलीचा निकाल येत्या अकरा मार्चला लागणार आहे. भविष्यातल्या लोकसभा निवडणुकीची ही रंगीत तालीम आहे …

शुभ शकुनाच्या ओल्या रेषा!

//१// आसाराम लोमटे, अक्षयकुमार काळे, अनिल पिंपळापुरे या यार-दोस्तांना वर्ष सरता सरता मोठे सन्मान मिळाले; आनंद विश्वव्यापी झाला. २०१६नं भरल्या मनानं निरोप घेतांना येणारं नवीन वर्ष अशा अनेक आनंददायी बातम्यांचं असेल अशा जणू शुभ संकेताच्या ओल्या रेषाच आखल्यासारखं वाटलं. १९९८च्या मी महिन्यात माझी महिन्यात ‘लोकसत्ता’च्या औरंगाबाद कार्यालयात बदली झाली तेव्हा …

दानवेंचा रिकामा आड आणि पोहोरा!

नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या तीनही टप्प्यातील निकाल जाहीर झाले असून ‘मनातल्या मनात’ किंवा ‘जनतेच्या मनात’ असलेले राज्य भारतीय जनता पक्षातील बहुतेक सर्व इच्छुक मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून आता बाहेर पडले आहेत. क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर, हे सर्व ‘हिट विकेट’ झालेले आहेत. नुकतीच ‘क्लीनचीट’ मिळालेल्या पंकजा मुंडे, मग विनोद तावडे, नंतर एकनाथराव खडसे यांनी …

एकाच माळेचे मणी!

देशाच्या सांसदीय राजकारणात सध्या जे काही सुरु आहे ते मन उद्विग्न करणारं आहे. सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंकडून ‘मला संसदेत बोलू दिलं जात नाही’ असा टाहो फोडला जातोय. लोकशाही म्हणजे संवादातून चालणारं सरकार, हा आजवरचा समज पूर्णपणे चूक कसा आहे, हेच सिध्द करणारा आरोप-प्रत्यारोपांचा कोलाहल माजलाय; संसदेचा मासळी बाजार …