भय इथले संपावे…
छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा अभिमानाने मिरवणाऱ्या महाराष्ट्राची घुसमट झालेली आहे, असं भाष्य तीन आठवड्यापूर्वी केलं होतं पण, आता राज्याची सामाजिक आणि राजकीय स्थिती त्यापेक्षा जास्त चिघळली आहे. धर्म आणि जात-पोटजात-उपजात अशी समाजाची मोठी विभागणी सुरुच आहे. मराठा, दलित, बहुजन, धनगर, मुस्लीम अशी ही दरी …