वसुंधरेच्या कुशीत विसावलेलं मिथक…
वैयक्तीक आणि सार्वजनिक अशा दोन पातळ्यावर वेगवेगळं आयुष्य एकाच वेळी जगावं लागलेल्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानं भारतीय राजकारणातलं एक मिथक वसुंधरेच्या कुशीत कायमचं विसावलं आहे. गॉसिप नाही पण, जयललिता यांचं वैयक्तीक आयुष्य असमाधान आणि अतृप्ततेचा चीरदाह होता: शापित सौंदर्यवती असंही त्यांना म्हणता येईल. मात्र एक अभिनेत्री आणि राजकारणी म्हणून …