वेगळ्या विदर्भाचं (वार्षिक) तुणतुणं!
मावळत्या आठवड्यात स्वतंत्र विदर्भाचं तुणतुणं वाजवण्याचा (वार्षिक) राजकीय उपचार पुन्हा एकदा पार पडला. सत्ताधारी किती उतावीळ आणि विरोधी पक्ष किती अदूरदर्शी आहे, हेच त्यातून दिसलं. भाजप-सेना युतीच्या अर्ध्या मंत्रीमंडळावर एका पाठोपाठ भ्रष्टाचाराचे आरोप विरोधी नेत्यांकडून झालेले आहेत. आर्थिक घोटाळ्यांच्या आघाडीवर ‘पार्टी वुईथ डिफरन्स’ आरोपींच्या पिंजऱ्यात उभी केली गेली; कॉंग्रेस आणि …