लालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका!

सत्ताकांक्षा फलद्रूप न झाल्याची मध्यवर्ती कल्पना घेऊन समकालिन राजकारणावर वास्तववादी कादंबरी लिहिली गेली तर ती एक अत्यंत कसदार शोकात्म ललित कृती होईल; शरद पवार, नारायण राणे, मायावती, मुलायमसिंह असे काही त्या कादंब-यांचे नायक असू शकतील. लालकृष्ण अडवाणी यांच्यावरची कादंबरी मात्र महाशोकांतिका असेल आणि लालकृष्ण अडवाणी महानायक ठरतील! शरद पवार आणि …

मराठी एकं मराठी !

आम्ही मराठीचे कट्टर पुरस्कर्ते असलो तरी आम्हा दोघां पत्नी-पतीची, पार्श्वभूमी मात्र केवळ मराठीची नाही. मी मूळचा मराठवाड्यातील; १९४७साली देश ब्रिटिशांच्या जोखंडातून स्वतंत्र झाला तरी सप्टेबर १९४८ पर्यंत आमचा मराठवाडा निझामाच्याच अंमलाखाली होता. आमच्या पिढीपर्यंत शिक्षणातही उर्दू माध्यम होतं. माझी आई नर्स होती आणि तिची जिथं पोस्टिंग असे तिथं आमचं शिक्षण …

फडणवीसांचे खूप ​’​अधिक​’​ काही ​’​उणे​’​!

दिग्गज नेते शरद पवार यांनी नाकारलेलं असलं तरी, भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणुकीचं व्यक्त केलेलं भाकीत अगदीच काही फुसकं नव्हतं. मार्च महिन्याच्या शेवटच्या आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आसपास वावरणाऱ्या काही आमदारांनी हीच माहिती खाजगीत बोलतांना दिलेली होती. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची …

वादळी आणि बेडर राजकारणी; उमदा मित्र

(महाराष्ट्राच्या राजकारणात नवी समीकरणे निर्माण करणारे भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मिक अपघाती निधनाला ३ जून २०१७ला तीन वर्ष पूर्ण होत आहेत. प्रस्तुत लेखकाचा गोपीनाथ मुंडे यांच्याशी महाविद्यालयीन जीवनातील मित्र ते एक राजकारणी असा अकृत्रिम संपर्क चारपेक्षा जास्त दशकांचा होता. या लेखकाने त्याच नजरेतून घेतलेला गोपीनाथ मुंडे यांच्यातील उमदा मित्र …