‘तळ्यात मळ्यात’ करणारे गंगोपाध्याय एकमेव न्यायमूर्ती नाहीत !

न्या. कृष्णा अय्यर यांच्या एका विधानाची आठवण करुन देतो – “राजकारणाविना  कायदा अंध आहे आणि  कायद्याविना राजकारण बहिरे आहे” . मूळ इंग्रजी विधान असे- Law without politics is Blind and Politics without law is Deaf . ■■ कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदाचा राजीनामा देऊन सक्रिय राजकारणात येण्याचा अभिजीत गंगोपाध्याय यांचा निर्णय सहाजिकच …

व्यवहार कुशल मनोहर जोशी…

ज्या बिगर मराठा नेत्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांची मुद्रा उमटवली त्यात मनोहर जोशी यांचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल . मुंबईचे नगरसेवक ते लोकसभेचे अध्यक्ष मार्गे मुंबईचे महापौर , विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य , मुख्यमंत्री , खासदार , केंद्रीय मंत्री असं मनोहर जोशी यांचा राजकीय वाटेवरचा आणि त्याला समांतर असणारा यशस्वी शिक्षक …

​आधी काँग्रेस​ची ढासळणारी तटबंदी सांभाळा !

अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा त्याग करुन भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याच्या घटनेचा धुरळा आता खाली बसण्यास सुरुवात झाली आहे . चारपेक्षा जास्त दशकं अशोकराव काँग्रेसच्या राजकारणात दिल्लीपासून नांदेडपर्यंत वावरले . दोनवेळा लोकसभा आणि पाचवेळा विधानसभेवर काँग्रेसचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली , ते दोनवेळा मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष होते म्हणजे पक्षानं त्यांना …

घराणेशाहीचे कांदे नाकानं सोलण्याचा भाजपचा नसता उद्योग !

(  ■चित्र- विवेक रानडे ) पुन्हा एकदा काँग्रेसमधील घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित करण्यात आल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या नेत्यांच्या निवासस्थानी एक तर आरसा नसावा किंवा घरात असलेल्या आरशात हे नेते स्वत:चा चेहेरा बघत नसावेत असंच म्हणायला हवं . खरं तर , घराणेशाही हे आपल्या देशातील राजकारणाचं सर्वपक्षीय व्यवच्छेदक लक्षणं आहे …

नितीशकुमारांची अगतिकता…

बिहार राज्यात सत्तापालट करण्याचा जो खेळ नितीशकुमार यांनी गेल्या आठवड्यात रंगवला , त्यावर टीका करायची ठरवली तर ‘कंबरेचं सोडून डोक्याला बांधणं’ अशी करता येईलही पण , तो नितीशकुमार यांच्या आजवरच्या संधीसाधू धोरणांशी सुसंगत असा ठरवून खेळलेला अगतिक डाव आहे . कायमच येनकेन प्रकारे सत्तेत राहण्याचं राजकारण करणाऱ्या नेत्यांची ही अशी …

‘रामा’बाबत काँग्रेसचा गाफीलपणा !

देश सध्या बहुतांशी राममय झालाय . खरं तर तो भारतीय जनता पक्षानं तसा केलाय असं म्हणणं जास्त योग्य होईल . ( यात लक्ष्मण आणि सीता मात्र कुठे दिसत नाहीत ; रामालाही भाजपनं एकटं पाडलं आहे ! ) २२ जानेवारीला राजकीयीकरण झालेल्या राम भक्तीचा कळस साधला जाईल . त्यासाठी केंद्र आणि …

कोंडीत सापडलेले उद्धव ठाकरे 

शिवसेनेच्या फुटीर आमदारांबद्दल दाखल झालेल्या अपात्रता याचिकांवरील निकाल अपेक्षेप्रमाणे आणि अपेक्षेतकाच उशिरा देण्याची ‘काळजी’ विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतलेली आहे . उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याच्या तयारीत असली तरी आता त्याचा फार कांही उपयोग होईल असं दिसत नाही कारण लोकसभा निवडणुका उंबरठ्यावर आलेल्या …

वाताहत उडालेली आजची पत्रकारिता…

एकेकाळी म्हणजे , सुमारे दोन-अडीच दशकापूर्वीपर्यंत बहुसंख्य वृत्तपत्र संपादकाच्या नावानं ओळखली जायची . आतासारखं ‘अमुक मालकाचं’ वृत्तपत्र  , चॅनल , अशी प्रथा तेव्हा नव्हती . दैनिक ‘मराठवाडा’ म्हटलं की अनंतराव भालेराव यांचा  , सोलापूरचा ‘संचार’ म्हटलं की , रंगा वैद्य यांचा अशी ओळख असायची . त्यावेळी मुद्रीत माध्यम म्हणजे केवळ …

पत्रकारच व्हायचं असं माझं कांही निश्चित नव्हतं…

■नांदेडच्या आनंद मिडियाच्यावतीनं ‘लेखणीच्या अग्रावर’ हे माझं नवीन पुस्तक पुढील महिन्यात प्रकाशित होत आहे . त्या पुस्तकासाठी लिहिलेलं ‘खरं तर,’  हे मनोगत- खरं तर , पत्रकारच  व्हायचं असं मी कांही निश्चित केलेलं नव्हतं . बालपण ते वयाची तिशी हा माझा काळ अतिशय खडतर होता  , त्यातला बराचसा विपन्नावस्थेतलाही होता . …

भाजपची हडेलहप्पी !

संसदेच्या दोन्ही सभागृहात गेल्या आठवड्यात सदस्य निलंबनाची जी घाऊक कारवाई करण्यात आली त्याचं वर्णन लोकशाहीनिष्ठ नैतिकतेचा निकष लावायचा झाला तर ,  ‘सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची असंसदीय हडेलहप्पी’ याच शब्दांत करावं लागेल . भारतीय लोकशाहीच्या इतिहासात आजवर अशा निर्घृण पद्धतीनं यापूर्वी कोणताही सत्ताधारी पक्ष वागलेला नव्हता , हे आपण लक्षात घेतलं …