मोहन , घाईत एक्झिट घेतलीस रे तू …
२३ जानेवारीची सकाळ मोहनच्या निधनाची बातमी घेऊन उगवली…आणि कशाला झाली सकाळ , असा प्रश्न पडला . डोकं सुन्न झालं…अशा वेळी एरवी संवयीचा झालेला एकटेपणा अस्वस्थ करायला लागला… मोहन म्हणजे मोहन हिराबाई हिरालाल . ■■ मोहनची पहिली ओळख ते आजची सकाळ हा दीर्घ असा साडेचार दशकांचा आंच्यातला मैत्रीचा प्रवास आहे ; …