राज्यातले दोन ‘बडे’ बंडखोर ; शंकरराव आणि अंतुले !
महाराष्ट्राच्या निवडणुकीत बंड आणि बंडखोर हे कांही परग्रहांवरुन अचानक प्रगटलेले पाहुणे नाहीत . निवडणुका झाल्यावरही सत्तेला काटशह देणारे बंडखोर असतातच आणि मुख्यमंत्री असो की पक्षाध्यक्ष , की अन्य नेता , त्याचं आसन डळमळीत करण्याचा उद्योग राजकारणात सतत सुरुच असतो ; हे ‘उद्योग’ हेदेखील एक प्रकारची बंडखोरीच असते . निवडणुकीच्या काळात …