ज्याचा त्याचा गांधी !

​{ महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या हिन्दी अभ्यासक्रमासाठी ‘ब्लॉग लेखन’ या विषयावर एक धडा ( lesson ) लिहिण्याची संधी ज्येष्ठ अभिनेत्री  , प्रा. अनुया दळवी यांच्यामुळे मला  मिळाली . ब्लॉग लेखनाचे प्रात्यक्षिक म्हणून महात्मा गांधी याच विषयावर लिहावं असा , अनुयाताईचा आग्रह होता . तो  हिन्दी ब्लॉग ज्या मूळ …

राजकारण्यांनी आक्रमक व्हावं , असुसंस्कृत नाही !

महाराष्ट्राच्या राजकारणातले एक ज्येष्ठ नेते बबनराव ढाकणे यांच्याशी नुकत्याच फोनवर गप्पा झाल्या .  जुन्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला आणि विषय आताच्या राजकारणावर आला . काय वाटतं सध्याच्या राजकारणावर या प्रश्नाला उत्तर देताना बबनराव ढाकणे म्हणाले , ‘चिंता वाटते .’ राजकारण्यांची भाषा , वागणं , राहणी आणि मग्रुरी यावर मग बबनराव बराच वेळ बोलत राहिले ; …

शरद पवार बोलले खरं , पण…

मध्यंतरी ‘काँग्रेस , पक्ष की समृद्ध अडगळ ?’ हा मजकूर ( ब्लॉग ) लिहिला होता . त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना एका ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यानं  ( मेलद्वारे) दिलेली प्रतिक्रिया अशी होती– “ काँग्रेस पक्षाचे भवितव्य संकटात आहे आणि त्याबाबत काँग्रेसने काय करायला हवे यासंबंधी सतत काही ना काही लिहिले-बोलले जातेय . सर्व …

सत्तेच्या गैरवापराची स्मरणयात्रा…

‘सत्तेचा गैरवापर किंवा भ्रष्टाचाराचा आरोप झालेले किती मंत्री तुम्हाला तुमच्या पत्रकारितेच्या काळात बघायला मिळाले’ , असा प्रश्न महात्मा गांधी मिशन विद्यापीठात पत्रकारिता शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानं परवा विचारला . या प्रश्नाचं उत्तर शोधताना पत्रकारितेच्या गेल्या चार साडेचार दशकात असे आरोप झालेले बरेच मंत्री आठवले ; ती एक स्मरणयात्राच म्हणायला हवी . …

दाल में कुछ तो काला है !

अलीकडच्या काळात गाजणाऱ्या शंभर कोटींच्या खंडणी कांडातील राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख , त्यांना गाजवणारे परमबीर सिंग सक्त वसुली संचालनालय (इडी) आणि राज्य सरकारनं वसुलीप्रकरणी चौकशीसाठी नियुक्त केलेल्या चंडिवाल आयोगासमोर हजर होत नाहीत . शिवसेनेचे एक आमदार प्रताप सरनाईक हेही समन्स बजावूनही सक्त वसुली संचालनालयासमोर चौकशीसाठी जात नाहीत . शंभर …

अहो गडकरी , सर्वपक्षीय ‘टक्क्यां’चं बोला की !

केंद्र सरकारच्यावतीनं महाराष्ट्रात वाशीम जिल्ह्यात ज्या एका रस्त्याचं काम सुरु आहे त्या कामात शिवसेनेचे काही स्थानिक उपद्रवी नेते अडथळा आणत आहे आणि त्यामागील कारणं अर्थातच आर्थिक आहेत , अशा आशयाचं पत्र केंद्रीय रस्ते बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे  . ‘लुज टॉक’ करणं , पुराव्याशिवाय बोलणं किंवा …

श्याम देशपांडे नावाचा बुकमार्क…

प्रतिभावंत नाटककार आणि ललित लेखक महेश एलकुंचवार यांच्या ‘नेक्रोपोलीस’ या लेखात to join the majority हा शब्दप्रयोग वाचनात आला होता . ‘मरणे’ असा त्याचा अर्थ . या विश्वात हयात  असणाऱ्यांपेक्षा मृतांची ( मृतात्म्यांची म्हटलं  तरी चालेल ) संख्या जास्त असते म्हणून मरणाऱ्याने जिथे बहुसंख्य आहेत त्या जगात  प्रवेश केला , …

नरेंद्र मोदी कळीच्या ​मुद्द्यांवर का बोलत नाही ?

केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचं सरकार सत्तारुढ झाल्यावरच संसदेचं अजून एक अधिवेशन गोंधळात पार पडलं . ईस्त्रायली तंत्रज्ञानाचा वापर करुन ( पेगॅसस् ) काही विरोधक आणि पत्रकारांचे सेलफोन टॅपिंग झाल्याच्या मुद्द्यावरुन संसदेत सलग गोंधळ होत राहिला तरी अधिवेशनाचा कालावधी पूर्ण केला गेला आणि शासकीय कामकाजही पूर्ण झाले , असा …

‘बिर्याणी तो सिर्फ झांकी है…’

पुण्याच्या एका महिला पोलीस उपायुक्ताने मागवलेल्या/न मागवलेल्या बिर्याणी आणि प्रॉन्झची भरपूर चर्चा प्रकाश वृत्त वाहिन्या आणि समाजमाध्यमांवर झाली आहे . मात्र सनदी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अशा फुकट पाहुणचाराच्या अगणित सत्यकथा पारायणासारख्या वर्षा-नु-वर्षे सुरु आहेत हे लक्षात घ्यायला हवं . पोलिस दल आणि एकूणच प्रशासनातील कनिष्ठ प्रशासनाला वरिष्ठ अधिकारी कसे फुकटे …

भाजपचं पडद्याआडचं ‘कर्नाटक कनेक्शन’

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याआधीच भारतीय जनता पक्षाच्या विषय पत्रिकेवर ‘ऑपरेशन कर्नाटक’ आणि ‘ऑपरेशन उत्तरप्रदेश’ होते . भाजपत अलीकडे घडलेल्या सर्व प्रमुख घटनांशी कर्नाटक कनेक्शन आहे ते कसं , या मजकुराच्या नंतरच्या भागात  येणारच आहे . ठरल्याप्रमाणे कर्नाटकमधलं ऑपरेशन पार पडलं असून त्यात बी . एस . येडीयुरप्पा यांनी बाजी मारली …