राजकारणातली विधिनिषेधशून्यता – जामिनावरचे भुजबळ !

पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा तसंच विधानपरिषदेच्या सहा आणि पतंगराव कदम यांच्या निधनानं रिक्त झालेल्या पलूस विधानसभा या निवडणुकांच्या निमित्तानं महाराष्ट्रात जे काही राजकारण सुरु आहे त्याचं वर्णन विधिनिषेधशून्य याच शब्दात करता येईल; त्यावर अर्थातच यांना विधिनिषेध होता कधी, असा प्रश्न कुणीही विचारी आणि लोकशाहीवर निष्ठा असणारा माणसानं उपस्थित केला तर …

जयंत पाटलांसमोरील आव्हानं आणि मुख्य सचिवपदाची निरर्थक चर्चा

//१// जयंत पाटीलांना शुभेच्छा! जयंत पाटील यांची (महा)राष्ट्रवादी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी एकमतानं निवड करुन राजकीयदृष्ट्या चाणाक्ष (या शब्दाला पर्याय म्हणून अनेकजण धूर्त असा शब्दप्रयोग करतात!) असल्याचं शरद पवार यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे. जयंतरावांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जरा जास्तच वाढत चाललेली सलगी आणि ते काँग्रेसमधे जाणार या कुजबुजीला म्हणा …

आणखी किती आसारामबापू…

पत्रकारितेच्या निमित्तानं झालेल्या दिल्लीच्या वास्तव्यात पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकार आणि सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसचा अस्त तर भाजपात लालकृष्ण अडवाणी युगाचा अस्त आणि नरेंद्र मोदी युगाचा उदय यासह अनेक राजकीय घडामोडी आणि काही खळबळजनक घटनाही अनुभवाच्या पोतडीत जमा झाल्या . खळबळजनक घटनांत ‘तहलका’च्या तरुण तेजपाल आणि स्वयंघोषित भोंदू …

देवेंद्र फडणवीस क्लीनचीट प्रा. लि. !

समाज माध्यमांवर आलेली एखादी कमेंट कधी कधी अतिशयोक्त असूनही वास्तवाला चपखलपणे कशी भिडते याचं उदाहरण म्हणजे – “ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि बँनक्राफ्ट यांनी जर महाराष्ट्रात चेंडू कुरतडण्याची कृती केली असती तर त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नक्कीच ‘क्लीनचीट’ मिळाली असती!” – ही कमेंट वाचल्यावर लक्षात …

कॉपी, तेव्हा आणि आताही!

दहावी बारावीच्या परीक्षा सुरु झाल्या की कॉपीच्या बातम्याचं पीक बहरात येतं. या वर्षी या बातम्या वाचतांना आणि पाहतांना स्वानुभव आठवला आणि या पिकाला मरण नाही कायम भाव आहे याची खात्री पटली. पत्रकारितेत आलो तरी १९९८ पर्यंत दहावी आणि बारावीच्या परीक्षा आणि अधुनमधून कॉपी हा केवळ बातमीचा विषय होता; तोही दुरुनच. …

निकाल गुजरातचा, इशारा महाराष्ट्रालाही!

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुका एकदाच्या संपल्या. गेले काही दिवस विशेषत: गुजरातची निवडणूक हा सार्वर्त्रिक चर्चेचा विषय होता. समाज माध्यमांवर तर अनेकदा या ऊत आलेल्या चर्चेला अधिकृत/अचूकतेचा ना शेंडा असायचा ना बुडखा. या चर्चा म्हणा की, मत-मतांतराला एक तर कोणाच्या तरी टोकाचा भक्तीचा किंवा टोकाचा द्वेषाचा रंग असायचा. गुजरातच्या …

एकारलं कर्कश्शपण आणि (अ)सहिष्णुतेचं राजकीयीकरण !

( अभय निकाळजे या पत्रकार मित्राने तो कार्यकारी संपादक असलेल्या आदर्श गावकरी या दैनिकाच्या  दिवाळी अंकासाठी समकालीन स्थितीवर माझी एक मुलाखत घेण्याची जबाबदारी त्याचा सहकारी तरुण पत्रकार सुभाष वेताळ याच्यावर सोपवली. त्यासाठी एक प्रदीर्घ प्रश्नावली पाठवली .  नंतर अचानक अभय निकाळजे आणि सुभाष वेताळ यांनी नोकरी सोडली ( की त्यांना नोकरी  …

फडणवीस, नोकरशाहीचे नाही जनतेचे मुख्यमंत्री व्हा !

मिडिया आणि जनतेचा पाठिंबा मिळवण्याच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस आजवरचे सर्वात फेवरेट मुख्यमंत्री असावेत. कां असू नयेत? अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यावर गेल्या तीन वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:ला ज्या पध्दतीने सिध्द केलंय ते अपवादात्मक आहे. स्वच्छ प्रतिमा, विकासाची तळमळ आणि पक्षश्रेष्ठींचा भरभक्कम पाठिंबा असणारे अलिकडच्या किमान चार दशकातले ते पहिले …

दिलीप वळसेंची एकसष्ठी !

(गेल्या सुमारे चार दशकांपासून राज्याच्या राजकारणात वावरणारे, ​प्रशासनात ​आपल्या कामाचा ठसा उमटवणारे माजी मंत्री, शरद पवार यांचे कट्टर समर्थक दिलीप वळसे पाटील एकसष्ठी गौरव समारंभ अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत झाला . त्यानिमित्त प्रकाशित होणाऱ्या गौरव ग्रंथासाठी दिलीप वळसे पाटील यांचा राजकीय प्रवास अनुभवलेल्या पत्रकाराने मांडलेला हा ताळेबंद -) घटना माधव …

नांदेडच्या निकालाचा व्यापक अर्थ

नांदेड महापलिकेच्या निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाला धूळ चारली आणि कॉंग्रेसला संजीवनी दिली; एवढ्यापुरता हा मुद्दा नाही तर त्यापलिकडे या निवडणुकीच्या निकालाचं महत्व आहे. भाजपची जबरदस्त हवा असल्याची जी काही चर्चा मिडियात होती ती वाचनात असतानाच निवडणूक सुरु झाल्यावर नांदेडात दोन दिवस होतो; त्याचवेळी मिडियाच्या त्या चर्चेत तथ्य …