नाठाळ नोकरशाही आणि हतबल सरकार!

सरकारनं मग ते कोणत्याही पक्षाचं असो, घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी नोकरशाहीची निर्मिती करण्यात आलेली आहे. नोकरशाहीत काम करणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या कामाचं स्वरुप आणि जबाबदारीनुसार अत्यंत भरीव असं मासिक वेतन शिवाय घर, वाहन, फोन भत्ता, प्रवास भत्ता, नोकर-चाकर, प्रसंगोपात्त पगारी रजा, अशा अनेक सोयी सवलती उपलब्ध करून देण्यात आलेल्या असतात. नोकरशाहीच्या …

वळचणीतल्या हताश नेत्यांचं दिवास्वप्न !

पत्रकारितेत येऊन पुढच्या वर्षी म्हणजे, २०१७मध्ये चाळीस वर्ष होतील. या काळात पत्रकारितेच्या या पुलाखालून किती पाणी वाहून गेलं याची नेमकी मोजदाद करता येणं शक्य नसलं तरी, जे काही पाहिलं आणि अनुभवलं ते विसरु म्हटलं तरी विसरता येणारच नाही. राजकीय वृत्तसंकलन करण्याची संधी मिळाली आणि केवळ सारा महाराष्ट्रच नाही तर, देशभर …

​​‘बीजेपी माझा’ कारण माध्यमांचं उथळपण !

गेल्या पंधरवड्यात समाज माध्यमातून लोकसत्ता हे दैनिक आणि एबीपी माझा व झी चोवीस तास या प्रकाश वृत्तवाहिन्यांविरुध्द जोरदार मतप्रदर्शन झालं; या माध्यमांवर बहिष्कार टाकावा अशी मोहीम चालवली गेली. त्यातही, समाज माध्यमांवर व्यक्त होणारांचा एबीपी माझावर फारच रोष होता असं दिसलं. वाद आणि प्रतिवाद व्हायलाच हवेत कारण; आपल्याला पटो अथवा न …

शेतकऱ्यांनो, संप कराच !

महाराष्ट्राच्या राजकारणात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून धुमशान सुरु असतांनाच अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिलाय; म्हणजे ते येत्या हंगामात केवळ त्यांच्या गरजेपुरतं पीक घेतील. संपावर जाण्याच्या त्यांच्या आवाहनाला जिल्ह्यात बराच प्रतिसाद मिळू लागला असल्याचं दिसतंय. केवळ पुणतांबा येथीलच नाही तर देशातील सर्वच शेतकऱ्यांनी किमान एक हंगाम संप करायला हवा; …

नारायण राणेंचं ‘उदात्त’ वैफल्य !

शिवसेनेत असतांना राज्याचे अल्पकाळ मुख्यमंत्री झालेले नारायण राणे नेहेमीप्रमाणे कॉंग्रेसवर प्रचंड नाराज असून ते लवकरच अन्य कोणत्या तरी पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या माध्यमांत रंगलेली आहे. कॉंग्रेसचा सलगपणे होणाऱ्या पराभवाची उदात्त सल राणे यांच्या मनी असून त्यासाठी कॉंग्रेसचं राज्य नेतृत्व जबाबदार आहे असा प्रत्येक पराभवानंतरचा आवडता राग याही वेळी …

पत्रकारांचा बाप !

कोणत्याही निकषावर मी काही गोविंदराव तळवलकर स्कूलचा विद्यार्थी नाही. त्यांच्या निकट वा दूरच्या गोटातीलही नाही. लहानपणी घरी रविवारी मराठा आणि लोकसत्ता येत असे पण, ते काही वाचायचं वय नव्हतं. वाचनाचा संस्कार झालेला तो आईकडून. वीरकरांची डिक्शनरी, रेन अँड मार्टिनचं व्याकरण कायम हाताशी असायचं. दररोज मराठी इंग्रजी शुध्दलेखन केल्याशिवाय नाश्ता मिळत …

कॉंग्रेसचा कांगावा अन भाजपचं ‘काँग्रेसीकरण’ !

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून जनमताचा कौल मिळाल्यावरही कॉंग्रेसला गोवा आणि मणिपूर राज्यात सत्ता संपादन करता आलेली नसल्यावरून राजकीय धुमशान सध्या सुरु आहे. या धुमशानात कॉंग्रेसचा सूर कांगावेखोरपणाचा लागलेला आहे, हे आधीच सांगून टाकायला हवं. गोव्याच्या राज्यपाल मृदला सिन्हा आणि मणिपूरच्या राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांनी जणू काही, …

न उरला ‘म’ मराठीचा !

नुकताच भाषा दिन साजरा झाला. त्यानिमित्तानं अनेकांनी आपली मातृभाषा मराठीच्या नावानं उमाळे काढले, कोणी अश्रू गाळले, कोणी टाहो फोडला… मराठीची अवहेलना होते, गळचेपी होते… मराठीचे मारेकरी कोण… मराठी शाळा बंद पडताहेत सरकार काहीच करत नाही… असं खूप काही… नकाश्रू गाळले गेले, दूषणं देऊन झाली पण, मराठीसाठी मी ‘मराठीतून’ काय केलं …

फडणीसांसाठी संधी की वैफल्याची विरलेली वस्त्र?

प्रारंभीच एक बाब मोकळेपणानं म्हणा की प्रामाणिकपणानं, मान्य करतो की, नुकत्याच झालेल्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या निकालांबाबतचे माझे अंदाज चुकले आहेत! भाजप राज्यात जागानिहाय क्रमांक एकचा पक्ष होईल, मुंबई महापालिकेत भाजपला ७० ते ७५ जागा आणि नागपूर महापालिकेत ७५ ते ८० जागा मिळतील, अन्य महापालिकात या पक्षाची कामगिरी अत्यंत …

जांबुवंतराव नावाचं एकाकी वादळ!

तेव्हा; आमच्या लहानपणी शाळेला सुट्या लागल्या की मामाच्या गावाला जाण्याची प्रथा होती. मला तर चार मामा होते. पण, मला उमरखेडच्या अशोकमामाकडे जायला आवडायचं कारण आजी-तिला आम्ही अक्का म्हणत असू, फार लाड करत असे. अशोक खोडवे हा मामा आणि मामी दोघीही शासकीय नोकरीत होते. उमरखेडच्या आठवडी बाजाराला लागून असलेल्या एका भल्यामोठ्या …