बच्चा नाही, अब बडा खिलाडी!

राजकीय आणि सामाजिक वातावरण गढूळलेल्या महाराष्ट्रात झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या पहिल्या फेरीच्या निकालावर भाजप आणि त्यातही प्रामुख्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव आहे. ही निवडणूक बरीचशी निमशहरी आणि काहीशी ग्रामीण भागातील जनतेचा कौल असल्यानं भारतीय जनता पक्षानं आता निमशहरी भागातही पाळंमुळं घट्ट केली आहेत असं म्हणायला हरकत नाही. देवेंद्र …

अडाण्यांचा कल्ला!

चलनातील ५०० आणि १००० रुपये मूल्यांच्या नोटांबाबत निर्णय झाला त्यादिवशी महाबळेश्वरला होतो. त्यानंतर हा मजकूर लिहेपर्यंत म्हणजे, गेल्या १७ दिवसापैकी सात दिवस प्रवासात आहे; तेही रस्ता मार्गे आणि कारने. सोबत १०० रुपयांची रोख कमी आणि क्रेडीट कार्डवर भर असा मामला. कुठेही ‘मी पत्रकार आहे’ किंवा सोबतच्या दोस्तयाराने तो ‘डॉक्टर आहे’ …

लेट मी जॉईन द मेजॉरिटी….

“कोणाला हे मृत्युपूर्व डोहाळेसदृश्य रुपक वाटेल, कोणाला ती एक सांकेतिक कथा भासेल तर कोणाला समकालाविषयी व्यक्त झालेली ती अस्वस्थता वाटेल. नैराश्य डोकावतंय-नकारात्मकता आहे त्यात, असंही काहीना वाटू शकेल. बहुसंख्यांना मात्र तो आपणच व्यक्त केलेला एक पारदर्शी संवेदनशील हुंकार आहे, असं वाटेल, इतका सच्चेपणा त्यात आहे” आपण एका विलक्षण शांत, अत्यंत …

मी-मंगला विंचुर्णे-बर्दापूरकर

सुरुवात आणि पूर्णविरामही, सहजच! (‘स्मिता स्मृती’च्या २०१६च्या अंकासाठी मंगलाने लिहिलेला हा लेख आहे. जवळ जवळ सातवर्षानी काही तरी लेखन मंगला केलं!) आमची बदली १९९८साली औरंगाबादला होईपर्यंत म्हणजे; जन्म ते वयाची पंचेचाळीशी पार करेपर्यंत मी पक्की नागपूरकर. धंतोलीतून वसंत नगर हेच काय ते या पंचेचाळीस वर्षातलं स्थलांतर. घरात आम्ही दोघी बहिणी …

सतत घाईत असलेला मित्र!​​

आधी ‘अनसेन्सॉर्ड गप्पां’चे कार्यक्रम आणि नंतर महाबळेश्वर असे सलग सहा-सात दिवस वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, इंटरनेटपासून लांब होतो. ‘रेंज’मध्ये आल्यावर वृतपत्र पहिली तर कळलं की, मोहन हिराबाई हिरालाल याला जमनालाल बजाज सन्मान मिळाला आहे. बातमी वाचल्यावर मनाच्या गाभाऱ्यात हा आनंद सहाजिकच दाट पसरला. त्या आनंदाचा गंध वातावरणातही दरवळला. मोहनला लगेच फोन केला …

स्थित्यंतरं आणि स्थलांतरं!

(माधवबाग हॉस्पिटल्सच्या’आरोग्य संस्कार’या दिवाळी अंकात प्रकाशित झालेला लेख) स्थित्यंतर ही मानवी जगण्याची अपरिहार्यता आहे. त्याशिवाय जगण्यात गंमत नाही, नाट्य नाही. स्थित्यंतर म्हणजे प्रत्येक वेळी काही तरी प्रचंड मोठी उलथापालथ घडणं, असंही समजण्याचं काहीच कारण नाही; अनेकदा सध्या-साध्या रुपात ते आपल्या समोर येत असतं. स्थित्यंतर म्हणा की बदल, उत्क्रांतीच्याही स्वरूपात आपल्याला …

उत्तरप्रदेशातल्या यादवांतली यादवी !

कोणत्याही निवडणुका आल्या की रुसवे-फुगवे, आयाराम-गयाराम, तक्रारी-भाटगिरी, वाद-प्रतिवाद, बंडखोरी असे प्रकार काही प्रमाणात घडतच असतात. भांड्याला भांडं लागलं की आवाज होतो तसंच निवडणुकांची चाहूल लागली की राजकीय पक्षात ‘आवाज’ सुरु होतात आणि हळूहळू ते विरतही जातात. उत्तरप्रदेशात मात्र समाजवादी पार्टीत सध्या जे काही सुरु आहे ते अशा आवाजांच्या पलीकडचं आहे …

फडणवीसबुवा, सावध ऐका पुढल्या हांका…

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारण्याला आणि त्यांच्या नेतृत्वखाली राज्यात भाजप-सेना युतीचं सरकार सत्तारुढ होण्याला ऐन दिवाळीत दोन वर्ष पूर्ण झाली. त्यानिमितानं फडणवीस यांच्या मुलाखती, सरकारनं गेल्या दोन वर्षात केलेल्या कामगिरीच्या जाहिराती प्रसिध्द झाल्या, मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारातील मंत्र्यांची ‘एबीपी माझ्या’च्या कार्यक्रमात भाषणं झाली. विविध वृत्तपत्रांनीही या सरकारच्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र …

‘मनोहर’ असलं आणि नसलं तरी…

आपण एक समंजस समाज म्हणून बहुसंख्येनं जशी चर्चा करायला हवी ती करत नाही, अनेक बाबींचा मुलभूत विचार करत नाही; अशी होणारी तक्रार रास्तच आहे. त्यामुळे जे काही तथाकथित मंथन घडत असतं ते फारच वरवरचं असतं, अनेकदा तर ती एक गल्लतच असते. थोडक्यात आभासी प्रतिमांच्या आहारी जाणं, हे आपल्या समाजातील बहुसंख्यांचं …

भय इथले संपावे…

छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा अभिमानाने मिरवणाऱ्या महाराष्ट्राची घुसमट झालेली आहे, असं भाष्य तीन आठवड्यापूर्वी केलं होतं पण, आता राज्याची सामाजिक आणि राजकीय स्थिती त्यापेक्षा जास्त चिघळली आहे. धर्म आणि जात-पोटजात-उपजात अशी समाजाची मोठी विभागणी सुरुच आहे. मराठा, दलित, बहुजन, धनगर, मुस्लीम अशी ही दरी …