राजकारण्यांचे ‘तेव्हा’चे डब्बे…

विधिमंडळाच्या अधिवेशनानिमित्त ‘लोकसत्ता’ या दैनिकात ‘कुजबुज’ हा स्तंभ प्रकाशित होतोय. त्यात लोकप्रतिनिधींच्या खाद्यप्रेमाची महती सांगणारा ‘‘डब्बा’ ऐसपैस’ मजकूर प्रकाशित झालाय. ही कुजबुज कोणी केलीये त्याचं नाव दिलेलं नाहीये पण, निर्दोष भाषा तसंच शैली आणि संदर्भ लक्षात घेता हा मजकूर आमच्या पाठच्या पिढीचा पत्रकार संतोष प्रधान याचाच असणार याची खात्री आहे. …

उडता पंजाब !

स्वामीप्रसाद मौर्य यांनी बसपाचा राजीनामा देऊन उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांचं जसं बिगुल फुंकलं तस्सच, फटकेबाजीसाठी ओळखला जाणाऱ्या जिगरबाज माजी क्रिकेटपटू नवज्योत सिद्धूनं भाजपनं दिलेल्या खासदारकीचा राजीनामा देऊन पंजाब विधानसभा निवडणुकांच्या रणसंग्रामाची सुरुवात केलीये. थोडंस विषयांतर करून सांगायचं तर, सिद्धूनं राज्यसभा सदस्यत्व आणि भाजप सोडण्याच्या निर्णयाचं दिल्लीच्या राजकारण्यांना आणि विविध माध्यमातील …

‘माध्यम’चं वेगळेपण आणि ‘आमादमी विदाऊट पार्टी’

सकारात्मक, विधायक काही घडत नाही, शहरी आणि त्यातही प्रामुख्यानं, मध्यमवर्गीयांची संवेदनशीलता हरवत चालली आहे, नमस्कार करावा अशी पाऊलेच दिसत नाहीत, आजची तरुण पिढी चंगळवादी झालीये, वाचन संस्कृती लोप पावते आहे… वगैरे खंत नेहेमीच कानावर पडते. प्रत्यक्षात शंभर टक्के तसं काहीच नसतं, नाहीच. समाजात खूप काही चांगलं घडत असतं पण, ते …

निवडणुकांची नांदी !

चार राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री मंडळाचा विस्तार आणि फेरबदल असा घाट नुकताच घातला. मंत्री मंडळातील पाच जणांना वगळत त्यांनी प्रकाश जावडेकरांना कॅबिनेट मंत्री म्हणून बढती दिली आणि १९ नव्या चेहेऱ्याना राज्यमंत्रीपदाची मनसबदारी बहाल केली. येत्या सहा-साडेसहा महिन्यात निवडणुका लागणाऱ्या उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा आणि …

छत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…

पंतप्रधान न होऊ शकलेले ; गेला बाजार राज्यात स्वबळावर सत्ता संपादन न करू शकलेले आणि संयमी, विचारी, मनात काय चाललंय याची पुसटशीही चुणूक चेहेऱ्यावर उमटू न देण्याचं कौशल्य असणारे, ‘जाणता राजा’ अशी प्रतिमा असणाऱ्या शरद पवार यांनी पुन्हा एकदा छत्रपती-पेशवे म्हणजे ‘मराठा-ब्राह्मण’ वाद उकरून काढला आहे. स्वत: इतकी दशकं सत्तेत …

‘गोड’ ग्लानीतले कॉंग्रेसजन…

‘सव्वाशे वर्षांची परंपरा असलेला कॉंग्रेस हा एकमेव पक्ष असून, हा पक्ष कधीच संपणार नाही’, असं पुणे जिल्ह्यातल्या वडगाव शेरी इथं झालेल्या युवक कॉंग्रेसच्या मेळाव्याला संबोधित करतांना राज्याचे माजी सहकार मंत्री, कॉंग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील म्हणाले असल्याची बातमी वाचली आणि कॉंग्रेस नेते गोड गैरसमजाच्या ढगात राहतात याची खात्री पटली. हर्षवर्धन पाटील …

(महा)राष्ट्रवादी निराशा !

मुंबईत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आमच्या गप्पा सुरु होत्या. राष्ट्रवादीचे स्वच्छ समजले जाणारे हेवीवेट जयंत पाटील यांनी, ते राज्याचे मंत्री असताना केलेल्या संशयास्पद आर्थिक गैरव्यवहाराची माहिती राज्याचे सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव आणि ज्येष्ठ सनदी अधिकारी आनंद कुळकर्णी आमच्याशी शेअर करत होते; तेव्हाच मुंबईत षण्मुखानंद सभागृहात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा १७ वा वर्धापन दिन …

नारायणागमन !

हा मजकूर प्रकाशित होईल तोपर्यंत महाराष्ट्र विधानसभेतून विधानपरिषदवर निवडणुकीची प्रक्रिया अधिकृतपणे संपलेली असेल आणि दिवाकर रावते, सुभाष देसाई, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर प्रभृतींसोबत नारायण राणे यांचा विधिमंडळात प्रवेश झालेला असेल. आपण जनाधार गमावला असून आता आपल्याला सांसदीय राजकारणात मागील दरवाजाने प्रवेश केल्याशिवाय पर्याय नाही, हे कटू सत्य अखेर नारायण राणे …

हट्टी मुलीची यशकथा !

– ती डाव्यांच्या डाव्या आणि उजव्यांच्या उजव्या डोळ्यात कायम सलते.. – स्वत:ला ‘सेक्युलर’ म्हणवून घेणारे कॉंग्रेसवाले तर तिच्या नावानं कायम बोटं मोडत असतात.. – पंतप्रधान असताना अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘तुमची मुलगी हट्टी आहे’, अशी तक्रार तिच्या वृद्ध्द आईकडे कौतुकानं केली होती, महत्वाचं म्हणजे तेव्हा ती वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होती.. …

जय हो, अम्मा !

जयललिता जर क्रिकेट खेळत असत्या आणि त्या फलंदाजीला आल्या तर, मैदानावरचे क्षेत्ररक्षक, गोलंदाज आणि पंच त्यांना साष्टांग दंडवत घालत आहेत, असं एक व्यंगचित्र नुकतच पाहण्यात आलं. जयललिता नावाचं व्यक्तीस्तोम त्यातून ध्वनित होतं तसंच, तामिळनाडूच्या राजकारणातली लाचारी, बिनकणाही त्यातून समोर येतो. विधानसभा निवडणुकीत एखाद्या राजकीय पक्षानं सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला जाण्याची …