महाराष्ट्राच्या इतिहासातील निकराची लढाई !

महाराष्ट्राला आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. बहुदा दिवाळीच्या आसपास होणाऱ्या  निवडणुकीची  खडाखडी जोरात सुरु झालेली आहे . ही निवडणूक महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वांत अटीतटीची तसंच निकराची लढाई म्हणून बघावी लागणार आहे . लढाई म्हटलं की नुसती खडाखडी करुन भागत नाही तर एकमेकाशी थेट भिडावं लागतं . त्या भिडण्यात कुणाला इजाही …

सुधीर रसाळ – वाङ्मयाभ्यासाच्या वाटेवरचा व्रतस्थ

वयाची नव्वदी पार केली म्हणून अभिनंदन करण्यासाठी नुकताच रसाळ सरांना भेटून आलो . ( सोबतचं छायाचित्र याच भेटीत ‘शूट’लं आहे . ) रसाळ सर म्हणजे     डॉ . सुधीर नरहर रसाळ . मराठीतले विद्यमान ज्येष्ठतम समीक्षक . वाङ्मय संस्कृतीचे चिंतक . निगर्वी आणि सालस विद्वत्ता हे रसाळ सरांच्या व्यक्तिमत्त्वाचं लेणं आहे …

नानासाहेब चपळगावकरांची आजची भेट !

( छायाचित्र : प्रवीण बर्दापूरकर ) आज म्हणजे , २७ जुलैला सकाळी नानासाहेबांना भेटायला गेलो . वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांच्यात असलेली ऊर्जा आणि लेखन-वाचनाची ऊर्जा अनुभवून स्तंभित होऊन बाहेर पडलो . नानासाहेब म्हणजे- लेखक , गोखले आणि आगरकर यांच्या विचारांच्या वाटेवर चालणारे विचारवंत , मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती …

■ राजकारणाचे गेले ते दिन गेले…

दिवस अन तारीख नक्की आठवत नाही पण , हे नक्की आठवतं की १९७७चा मे महिना होता . मुंबईच्या आताच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसला एक टॅक्सी थांबली . खादीचा पांढरा कुडता , त्यावर जाकीट घातलेले एक गृहस्थ उतरले आणि प्रवासाची बॅग हातात घेऊन ते गृहस्थ औरंगाबादला ( आताचे छत्रपती संभाजी नगर ) …

सभागृहात आक्रमक व्हा की !

विधिमंडळाचं प्रत्येकच अधिवेशन हा आता एक सोपस्कार उरला आहे . सत्ताधारी असो की  विरोधक अधिवेशनातील कामकाज कुणीही गंभीरपणे घेत नाही , अशी स्थिती आता आलेली आहे . सर्व पक्षीय विरोधक सभागृहाबाहेर धरणे धरतात , घोषणाबाजी करतात पण , सभागृहात गप्प का राहतात ही न समजणारी बाब आहे . संसदीय आयुधांचा …

संघानं भाजपवर छडी उगारली आहे , मारली नाही अजून !

आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि आता इंद्रेशकुमार यांनी नरेंद्र मोदी यांच्या अहंकारी  स्वभावाबद्दल केलेल्या सूचक इशारावजा वक्तव्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील संबंध मधुर राहिलेले नाहीत , नात्यात तणाव आलेला आहे , हे आता पुरेसं उघड झालं आहे . हे संबंध ताणले गेल्याची जी …

फर्स्ट इंप्रेशन – भाजपचा नक्षा उतरवणारा कौल !

संसदीय लोकशाहीत मतदारच निर्णायक असतो , कुणी ईश्वरानं पाठवलेला अंश किंवा मंदिर निर्माता नाही , असा इशाराच जणू नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी दिला आहे . केवळ ‘चारशे पार’च नाही सोबतच नरेंद्र मोदी आणि भाजपच्या धर्मांध अहंकाराचा फुगाच भारतीय मतदारांनी फोडला आहे आणि सत्ता मिळाली …

‘बसोली’ @ चंद्रकांत चन्ने !

‘ब’सोली’ म्हणजे ‘चंद्रकांत चन्ने’ आणि ‘चंद्रकांत चन्ने’ म्हणजे ‘बसोली’ हेच समीकरण नागपूरकर-विदर्भाच्याच नाही तर बसोलीचा कलावंत जगाच्या पाठीवर जिथं कुठं आहे त्यांच्या मनात आहे . हा मजकूर प्रकाशित होईल त्यादिवशी देशातील कमेव एव्हढी मोठी बालकलावंताची  ‘बसोली’ ही चळवळ सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे . राजकारणाच्या रणधुमाळीत कलावंतांच्या एखाद्या चळवळीचं …

लोकशाहीचा लिलाव…

जगातील सर्वात मोठी संसदीय लोकशाही आपल्या देशात आहे असा गौरवपूर्वक नेहेमीच केला जातो  . या आपल्या लोकशाहीचा पाया निवडणुका आहे आणि हा पायाच कसा भुसभुशीत आहे याचं दर्शन लोकशाहीविषयी संवेदनशील असणाऱ्याला अस्वस्थ करणारं आहे . सध्या सुरु असलेल्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाल्यापासून म्हणजे , १ मार्च २०२४ पासून पासून  देशात …

पवार , ठाकरे , फडणवीस , शिंदे यांची झाकली मूठ !

लोकसभा निवडणुकीची तिसरी फेरी संपलेली असून अजून चार फेऱ्या बाकी आहेत .आणखी एका महिन्यानं आजच्याच दिवशी दिल्लीत नवं सरकार सत्तारुढ होण्याची घाई टिपेवर असेल . निवडणुकीच्या मध्यावर प्रचाराची आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याची स्पर्धा जोरात आहे . प्रचाराच्या कुरुप पातळीबद्दल गेल्याच आठवड्यात लिहिलं होतं . ती पातळी आणखीनच खालावत जाताना दिसत आहे…’तू …