ऐसा नेता पुन्हा होणे नाही…

राज्य आणि देशाच्या राजधानीत काम करायला मिळावं , विधिमंडळ व संसदेचं वृत्तसंकलन करता यावं हे पत्रकाराचं स्वप्न असतं . सरकार , प्रशासन कसं चालतं , राजकारण कसं खेळलं जातं , राजकारणातले चढ-उतार , कट , कारस्थानं जवळून बघता येतात , अनेक ऐतिहासिक घटनांचं साक्षीदार होता येतं , सत्तेच्या कॉरिडॉरमध्ये वावरताना …

बहुमतातील अस्थिरता…

विधानसभा निवडणुकीत भाजप , एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्षाचा समावेश असलेल्या महायुतीला मोठ्ठं बहुमत मिळालं असलं तरी नव्यानं स्थापन झालेलं सरकार अस्थिर आणि जनतेत अस्वस्थता आहे . निकाल हाती आल्यावर सरकार स्थापन व्हायला , मुख्यमंत्री ठरायला जवळजवळ दोन आठवडे लागले . मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यावर …

कवेत न मावलेले मनोहर सप्रे

( मनोहर सप्रे यांचं सुमारे तीस वर्षांपूर्वीचं हे व्यंगचित्र आजही तंतोतंत लागू पडतं आहे ! ) ​मनोहर सप्रे यांची ओळख आधी त्यांच्या व्यंगचित्रातून झाली . तेव्हा त्यांची व्यंगचित्र ‘लोकसत्ता’च्या पहिल्या पानावर प्रकाशित होत असत . एक जबरदस्त  पंच  त्यांच्या व्यंगचित्रात असे .  चित्रातली माणसं जणू आपल्या आजू-बाजूलाच वावरतात असे वाटत …

अक्का

आईला मी माई , तिच्या आईला अक्का आणि माझ्या वडिलांना अण्णा म्हणत असे . आई , पत्नी आणि कन्या वगळता कौटुंबिक नातेसंबंधाचे गुंते उलगडत बसणं किंवा त्यांची मुळं कुठे , कशी लांब पसरली आहेत यांचा शोध घेण्याची वृत्ती माझ्या रक्तात नाहीच मुळी . सख्खी बहीण आम्हाला नाही , आहोत ती …

भाजपच्या कोंडीचं गुऱ्हाळ !

( छायाचित्रे- विवेक रानडे ) महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले . राज्यात भारतीय जनता पक्ष , एकनाथ शिंदे  यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा  राष्ट्रवादी  काँग्रेस पक्ष यांच्या महायुतीला मिळून सव्वा दोनशेपेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत म्हणजे अतिशय स्पष्ट बहुमत मिळालं आहे . त्याला आता नऊ दिवस होत आहेत …

ना कथाकार ना रेखाचित्रकार…झालो पत्रकार !

■ साडेचार दशकातील माझ्या पत्रकारितेच्या अनुभवांवर आधारित , नुकत्याच प्रकाशित झालेल्या नवीन पुस्तकांचं मुखपृष्ठ .■  अत्यंत कनिष्ठ मध्यम वर्गीय असं आमचं कुटुंब होतं . आई -म्हणजे माई नर्स, पदरी चार मुलगे. १९६० पूर्वीचा तो काळ. तीन आकडीच्या आतला तिचा पगार आणि खाणारी तोंड पाच. शिवाय त्या चौघांची शिक्षणं, जगणं इत्यादी. …

महायुतीची ‘लाडकी बहीण , भाऊ’ जोमात ; महाविकास आघाडी कोमात !

धक्कादायक अन् अनपेक्षित या दोन शब्दांत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाचं वर्णन करावं लागेल . निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली तेव्हाच महायुतीला विजयाची संधी असल्याचा कल जाणवत होता मात्र , महायुतीचा असा अभूतपूर्व विजय होईल यांचा अंदाज कुणालाच आलेला नव्हता . महायुतीतल्या भाजप , एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या …

टीका ‘सिलेक्टिव्ह’ नको

■■■ राज्यातील महायुती सरकारच्या  ‘लाडकी  बहीण’ योजनेवर  ‘उधळपट्टी’ म्हणून ज्यांनी टीका केली ती महाविकास  आघाडी आता निवडणूक जाहीरनाम्यात महिलांना दरमहा ३  हजार रुपये देणार  , असं वचन  देते  ; यांचा अर्थ सरकाराच्या तिजोरीवर आणि कर दात्यांच्या खिशावर दुप्पट डल्ला  ; जनतेला राजकारणी कसं उल्लू बनवतात याचं हे उदाहरण आहे .  उल्लू …

राज्यातले दोन ‘बडे’ बंडखोर ; शंकरराव आणि अंतुले !

महाराष्ट्राच्या निवडणुकीत बंड आणि बंडखोर हे कांही परग्रहांवरुन अचानक प्रगटलेले पाहुणे नाहीत . निवडणुका झाल्यावरही सत्तेला काटशह देणारे बंडखोर असतातच आणि मुख्यमंत्री असो की पक्षाध्यक्ष , की अन्य नेता , त्याचं आसन डळमळीत  करण्याचा उद्योग राजकारणात सतत सुरुच असतो ; हे ‘उद्योग’ हेदेखील एक प्रकारची बंडखोरीच असते . निवडणुकीच्या काळात …

‘कन्नड’चे दिवस

महात्मा गांधी मिशनच्या रम्य परिसरात शिरलं की , महाविद्यालयीन जीवनातले दिवस आठवतात . हा परिसर इतका मनोहारी तर , आमचा तेव्हाचा महाविद्यालयीन परिसर अतिशय रुक्ष . कन्नड बसस्टॅण्ड समोर असलेल्या नाल्याच्या काठावर नुकतीच तयार झालेली नगरपालिकेची  एक वास्तू म्हणजे आमचं महाविद्यालय . १९६० ते ८० तो काळ सर्वच बाबतीत अतिशय …