एन . डी . पाटील सम एन . डी . पाटीलच !

■ एन . डी  . पाटील यांच्यासोबत पूर्ण न केलेल्या पदयात्रेची एका पत्रकाराची ही आठवण . ■ आमच्या पिढीची पत्रकारिता ज्या नेत्यांच्या करिष्म्यावर बहरली त्यात प्रमुख नाव प्रा .  एन . डी  . पाटील यांचं . इंग्रजी सोबतच मराठी वर्ततपत्रातील बातम्यातही त्यांचा उल्लेख ‘एन  डी’ असा सर्रास केला जात असे .  …

उत्तरप्रदेशात योगी एकाकी ?

विधानसभेच्या निवडणुका जाहीर होताच उत्तरप्रदेशच्या राजकारणात रंगत भरायला सुरुवात झाली आहे . सत्ताधारी भाजपाला एका पाठोपाठ एक धक्के बसत असून राजकारणी सत्ता परिवर्तनाच्या धास्तीने कशी पक्षांतरं करतात याच्या बातम्या दररोज वाचायला मिळत आहेत . आज अखेर एक खासदार , तीन मंत्री आणि आठ आमदारांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली असून आणखी किमान …

​सारा खेळ निवडणुकांचा !

प्रत्येक गोष्टीचं राजकारण कसं करावं , हे  साऱ्या जगानं आपल्याकडून शिकावं अशी स्थिती आपल्याकडे अलीकडच्या काही वर्षात निर्माण झालेली आहे . राजकारण करतांना अनेकदा विचारी आणि संवेदनशील माणसाला शिसारी यावी अशीच पातळी कशी गाठली जाते याचं उत्तम उदाहरण म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत अलीकडेच पंजाबात जी काही त्रुट राहिली …

म्हशीनं मारली काँग्रेसला ढुशी !

आज्जीला , आईच्या आईला , आम्ही अक्का म्हणत असू . ते खोडवे कुटुंबीय मुळचं विदर्भातलं . वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षी म्हणजे १९६०/६१ मध्ये अक्काला प्रथम भेटल्याचं स्मरतं . अक्का कायम स्मरणात राहिली ती उत्तम आरोग्य आणि म्हणींच्या वापरामुळे . १९८५ की ८६ साली एका राजकीय कार्यक्रमाच्या वृत्तसंकलनासाठी उमरखेडला गेलो तेव्हा वय वर्षे ८७ असलेल्या आक्कानं स्वयंपाक …

विधिमंडळ अधिवेशन नव्हे , नुसताच कल्ला !

आठवण माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आहे . वर्ष १९९२ असावं आणि दिवस असेच थंडीचे होते . तेव्हा अटलबिहारी वाजपेयी लोकसभेतले विरोधी पक्षनेते होते आणि पंतप्रधानपदी पी . व्ही . नरसिंहराव होते . सभागृहात सत्ताधारी काँग्रेस पक्षाचं बहुमत काठावरचं होतं . शिवाय संसदेबाहेरही अनेक प्रश्न आक्राळविक्राळ बनलेले होते . त्यामुळे …

पत्रकारितेत सुमारांची चलती असते तेव्हा  सत्य दीनवाणं  उभं असतं…

“देशातील शोध पत्रकारिता नाहीशी होत आहे ; सगळीकडे गोडीगुलाबीचे धोरण दिसत आहे” , अशी देशाचे मुख्य न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा यांनी भारतीय पत्रकारितेबद्दल व्यक्त केलेली भावना या देशातील संवेदनशील आणि लोकशाहीवादी माणसाच्या मनाची व्यथा आहे . रक्तचंदनाच्या झाडाबद्दल ज्येष्ठ पत्रकार सुधाकर रेड्डी उदूमुला यांनी लिहिलेल्या ‘ब्लड सँडर्स : दि ग्रेट फॉरेस्ट हाईस्ट’ या पुस्तकाच्या …

ममतांची मुंगेरीलालगिरी !

“अमुक-तमुक पक्षाचा विजय म्हणजे तमुक पक्षाला निवडणूक जिंकण्यात आलेलं अपयश आहे” , अशी भोंगळ विधानं करण्यात आपल्याकडचे बहुसंख्य राजकीय विश्लेषक तरबेज आहेत . तसंच काहीसं बहुसंख्य राजकीय नेत्यांचही झालेलं आहे . वस्तुस्थिती काय आहे याची कोणतीही तमा न बाळगता देशाचं राजकारण कवेत घेण्याचा प्रयत्न हे नेते करत असतात . पश्चिम बंगालच्या …

‘मॅग्नेटिक’ अटलबहादूर सिंग , नागपूरकर !

( ■सर्व छायाचित्रे – विवेक रानडे , नागपूर ) आपण समजतो , तसं नसतं ; माणसाला अन्य माणूस एका दमात नाही आणि पूर्ण तर कधीच समजत नाही . अनेक  प्रसंग आणि येत जाणाऱ्या सहवासातून आपल्याला माणूस समजत जातो . ही प्रक्रियाही तुटक तुटक असते . या तुटक तुटकतेतून माणसाची निर्माण झालेली …

​-म्हणून अनंतराव भालेराव यांचं स्मरण ​गरजेचं आहे…  

‘कैवल्यज्ञानी’ हा पत्रमहर्षि अनंतराव भालेराव यांच्या बहुपेडी स्मरणांचा ग्रंथ वाचकांच्या हाती सोपवतांना एक विलक्षण समाधान आहे . स्वतंत्र लेखन आणि संपादन असं मिळून , हे माझं पंधरावं  पुस्तक . स्वतंत्र लेखनाला मिळालेला वाचकांचा प्रतिसाद आणि त्यातून मिळणाऱ्या समाधानापेक्षाही संपादनातून मिळणारा आनंद जास्त आहे , हे प्रांजळपणे मी कबूल करतो . …

अंगावर चिखल उडवून घ्यायचाच कशाला ?

आधीच सांगून टाकायला हवं की , समाजमाध्यमांवरची एक पोस्ट वाचून हा मजकूर सुचला आहे . त्या पोस्टचा आशय असा – “त्या पोस्टकर्त्याचे वडील प्रदीर्घ आजाराने निधन पावले . कोणत्यातरी दोन-तीन ग्रहांची अशुभ छाया (?)  पडल्यामुळे त्याचे वडील अत्यंत कठीण अशा काळातून जात होते . मृत्यूनंतर तरी ती अशुभ छाया दूर …