हम नही सुधरेंगे !
आता परतीचाही मान्सून बरसण्याची शक्यता नाही अशा बातम्या प्रकाशित झालेल्या असतानाच औरंगाबाद या शहराच्या नामांतरावरुन सुरु झालेल्या खडाखडीच्या बातम्या वाचताना मनात आलेली पहिली प्रतिक्रीया आहे, ‘हम नही सुधरेंगे’! मराठवाड्यातील भीषण दुष्काळामुळे विदीर्ण झालेल्या अंत:करणाने लोकप्रतिनिधीं आणि प्रशासनाच्या संवेदना हरपल्या आहेत अशी जी टीका होते आहे–व्यथा मांडली जात आहे त्यावर शिक्कमोर्तब …