पुरे करा ही झोंबाझोंबी !
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीला राज्याच्या सत्तेत येऊन आता एक वर्ष पूर्ण झालंय. राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत कोणाही किमान सुसंस्कृत माणसाला लाज वाटेल अशी झोंबाझोंबी गेल्या वर्षभरात सुरु आहे. अर्थात अलिकडच्या काही दशकात राजकारणात सुसंस्कृत लोक फारच कमी उरलेले आहेत आणि सत्तेसाठी कमरेचं सोडून डोक्याला …