भय इथं पुन्हा दाटून आलंय…

साधारण १९८६-८७ ते १९९६-९७ या सुमारे दहा वर्षांतलं देशातलं वातावरण आठवतं का ? पंजाब , काश्मीर , आसाम , नागालँड , पश्चिम बंगाल अशा अनेक राज्यात अस्वस्थता होती ; हिंसक कारवायांना मोठ्या प्रमाणात वाढलेल्या होत्या . त्यातच  ‘हम मंदिर वहीं बनाऐंगे’ , ‘जय श्रीराम’ अशा घोषणांचा महापूर आलेला , ‘गर्व …

भाजप विरोधाची कच्ची मोळी !

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नुकत्याच केलेल्या मुंबई दौऱ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच (महा)राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन केंद्र आणि राज्य सरकारमधील संघर्ष चर्चेत आणला आहे . हा संघर्ष तसा काही नवीन मुद्दा नाही . यापूर्वीही केंद्र आणि राज्य सरकारांतील संघर्ष , परस्परांतील तणावपूर्ण संबंधाबाबत चर्चा …

नरेंद्र मोदी खोटारडे आहेत , असं म्हणणार नाही पण-

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत जे भाषण केलं आणि त्यात महाराष्ट्राच्या संदर्भात कांही बेताल वक्तव्य केली . त्याबद्दल खरं तर , नरेंद्र मोदी यांना खोटारडा म्हणण्याची इच्छा मी कटाक्षानं आवरली आहे . याची कारणं दोन-प्रदीर्घ काळ विधिमंडळ आणि संसदेच्या कामाचं वृत्तसंकलन केल्यानं खोटं/खोटारडा/चूक हे शब्द संसदीय …

म्हशीनं मारली काँग्रेसला ढुशी !

आज्जीला , आईच्या आईला , आम्ही अक्का म्हणत असू . ते खोडवे कुटुंबीय मुळचं विदर्भातलं . वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षी म्हणजे १९६०/६१ मध्ये अक्काला प्रथम भेटल्याचं स्मरतं . अक्का कायम स्मरणात राहिली ती उत्तम आरोग्य आणि म्हणींच्या वापरामुळे . १९८५ की ८६ साली एका राजकीय कार्यक्रमाच्या वृत्तसंकलनासाठी उमरखेडला गेलो तेव्हा वय वर्षे ८७ असलेल्या आक्कानं स्वयंपाक …

ममतांची मुंगेरीलालगिरी !

“अमुक-तमुक पक्षाचा विजय म्हणजे तमुक पक्षाला निवडणूक जिंकण्यात आलेलं अपयश आहे” , अशी भोंगळ विधानं करण्यात आपल्याकडचे बहुसंख्य राजकीय विश्लेषक तरबेज आहेत . तसंच काहीसं बहुसंख्य राजकीय नेत्यांचही झालेलं आहे . वस्तुस्थिती काय आहे याची कोणतीही तमा न बाळगता देशाचं राजकारण कवेत घेण्याचा प्रयत्न हे नेते करत असतात . पश्चिम बंगालच्या …

भाजपचा ढोंगीपणा !

उत्तर प्रदेशातल्या लखीमपूर येथे शेतकऱ्यांना चिरडल्याचा आणि त्या  प्रकरणी केंद्रीय मंत्री पुत्राला पाठीशी घालण्याच्या  उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारच्या कृतीचा निषेध म्हणून महाराष्ट्रात सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीने बंद पाळला . त्याबद्दल भारतीय जनता पक्षानं ‘सरकार पुरस्कृत बंद’ असा केलेला थयथयाट हा ढोंगीपणाचा कळस आहे आणि तो ‘पार्टी वुइथ डिफ्रंन्स’ कसं …

सत्तेच्या गैरवापराची स्मरणयात्रा…

‘सत्तेचा गैरवापर किंवा भ्रष्टाचाराचा आरोप झालेले किती मंत्री तुम्हाला तुमच्या पत्रकारितेच्या काळात बघायला मिळाले’ , असा प्रश्न महात्मा गांधी मिशन विद्यापीठात पत्रकारिता शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानं परवा विचारला . या प्रश्नाचं उत्तर शोधताना पत्रकारितेच्या गेल्या चार साडेचार दशकात असे आरोप झालेले बरेच मंत्री आठवले ; ती एक स्मरणयात्राच म्हणायला हवी . …

भाजपचं पडद्याआडचं ‘कर्नाटक कनेक्शन’

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याआधीच भारतीय जनता पक्षाच्या विषय पत्रिकेवर ‘ऑपरेशन कर्नाटक’ आणि ‘ऑपरेशन उत्तरप्रदेश’ होते . भाजपत अलीकडे घडलेल्या सर्व प्रमुख घटनांशी कर्नाटक कनेक्शन आहे ते कसं , या मजकुराच्या नंतरच्या भागात  येणारच आहे . ठरल्याप्रमाणे कर्नाटकमधलं ऑपरेशन पार पडलं असून त्यात बी . एस . येडीयुरप्पा यांनी बाजी मारली …

उतावीळ नाना पटोळे !

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत रॉजर फेडररची डॉमिनिक केफ्फर याच्या विरुद्धची लढत पाच सेटसपर्यंत आणि जवळजवळ सुमारे अडीच तासावर चालली . फेडरनं हा सामना ७-६ , ६-७ , ७-६ , ७-५ असा जिंकला . म्हणजे दोन्ही खेळाडूंची  किती दमछाक झाली असेल हे लक्षात घ्या . पण , त्यातही कौतुक  रॉजर फेडररचं …

शंकरराव चव्हाण : कांही नोंदी

|| १ || शंकरराव चव्हाण आधी मंत्री आणि नंतर पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले , तो काळ माझ्या शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाचा होता . महाविद्यालयीन शिक्षण घेण्याच्या वर्षांपासूनच मी समाजवादी विचारांच्या लोकांच्या सहवासात आलेलो होतो आणि समाजवाद्याच्या मनात तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांच्याविषयी जो काही एक आकस किंवा अढी असायची , तो आकस म्हणा …