चिंतन आत्मरुदन ठरु नये…

उशिरा सुचलेलं शहाणपण अशा शब्दात काँग्रेस पक्षाच्या नुकत्याच पार पडलेल्या  चिंतन शिबिराचं वर्णन करायला हवं . देशाच्या राजकारणात काँग्रेस पक्षाची नौका डळमळायला सुरुवात झाली ती २०११पासून . झाले न झालेले अनेक आर्थिक घोटाळे , अण्णा हजारे यांचं दिल्लीतलं आंदोलन ही त्या डळमळण्याची सुरुवात  होती . २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पक्षाकडून स्वीकृती …

राजद्रोहाचं राजकारण !

खासदार  नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या राज्य सरकारच्या कृतीचं समर्थन करता येणार नाही , असं गेल्या स्तंभात जे म्हटलं होतं तसंच निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे ; हे निरीक्षण निकालात उमटतं का त्यावर लक्ष ठेवायला हवं . देशातील ज्येष्ठतम नेते शरद पवार …

भय इथं पुन्हा दाटून आलंय…

साधारण १९८६-८७ ते १९९६-९७ या सुमारे दहा वर्षांतलं देशातलं वातावरण आठवतं का ? पंजाब , काश्मीर , आसाम , नागालँड , पश्चिम बंगाल अशा अनेक राज्यात अस्वस्थता होती ; हिंसक कारवायांना मोठ्या प्रमाणात वाढलेल्या होत्या . त्यातच  ‘हम मंदिर वहीं बनाऐंगे’ , ‘जय श्रीराम’ अशा घोषणांचा महापूर आलेला , ‘गर्व …

श्रीलंकेच्या दिवाळखोरीतून मिळणारा धडा

श्रीलंकेची ओळख लहानपणापासूनचीच , रामायणातील कथा ऐकून . त्यामुळेच लंकेत सोन्याच्या विटा वगैरे असल्याचं अप्रूप होतं . तारुण्यभान येण्याआधी आणि नंतरही रेडियो सिलोनवरच्या बिनाका ( नंतर सिबाका ) गीतमाला तसंच अन्य आवडीच्या हिंदी गाण्यांमुळे ही ओळख अलवार बनली . महाराष्ट्राच्या अरण्य प्रदेशाचे दरवाजे नक्षलवाद्यांनी ठोठावले तेव्हाच्या वृत्तसंकलनाच्या पहिल्या पिढीत ज्येष्ठ …

तेच ते आणि , तेच ते …

लोडशेडिंगच्या संदर्भात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची झालेली पत्रकार परिषद आटोपल्यावर प्रकाश वृत्त वाहिन्यांचे काही पत्रकार भेटले . वीज टंचाई , लोडशेडिंग , कोळशाचा अत्यल्प पुरवठा , मिळणाऱ्या कोळशात दगडाचं प्रमाण जास्त असणं  . कोळसा पुरवठा होण्यात केंद्र सरकार करत असलेलं असहकार्य वगैरे मुद्दे ते पत्रकार सांगू लागले आणि प्रश्न पडला …

ही तर काँग्रेसचं अस्तित्व नाममात्र करणारी मृत्यूघंटाच !

‘अंगा पेक्षा बोंगा’ भक्षण केल्यावर अजगर अगदी किमान हालचाल वगळता प्रदीर्घ काळ निपचित पडून राहतो . २०१४च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवापासून आपल्या देशातल्या काँग्रेस पक्षाची अवस्था अशी , निपचित अजगरासारखी झालेली आहे . देशाभिमानाची हिंस्र धार्मिकता निर्माण करणारी एकपक्षीय राजवट देशात येण्याचा धोका स्पष्ट दिसू लागलेला असताना काँग्रेसनं जागं होण्याची …

‘फाजल’ सुलभाताई !

■■ ज्येष्ठ संगीत समीक्षक सुलभा पंडित मूळच्या सोलापूरच्या ,त्यांचं शिक्षण औरंगाबादला झालं आणि विवाहोत्तर वास्तव्य झालं विदर्भात . सुलभाताईंच्या निधनाला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं . त्यानिमित्तानं सुलभाताईंनी संगीतविषयक लिहिलेले कांही लेख , परीक्षणं आणि व्यक्तिचित्राचं ‘सुरावरी हा जीव तरंगे’ हे कॉफी टेबल बुक त्यांच्या कुटुंबियांच्यावतीने प्रकाशित होत आहे . …

-तर कॉँग्रेसचं अस्तित्व सूक्ष्मदर्शक यंत्रातून शोधावं लागेल !

( आणीबाणी उठवल्यावर झालेल्या लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसचा दारुण पराभव झाला तेव्हा म्हणजे  , सुमारे ४२ वर्षांपूर्वी ,  प्रख्यात व्यंगचित्रकार आर . के . लक्ष्मण यांनी काढलेलं हे व्यंगचित्र…व्यंगचित्रकार किती भविष्यवेधी असतो नाही ? ) पाच राज्याच्या निवडणुकांत अपेक्षेप्रमाणे भाजपनं उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये सत्ता प्राप्त केली . गोव्यामध्ये बहुमताच्या काठावर असल्यानं …

नरेंद्र लांजेवार : बुलढाण्याचा सांस्कृतिक दूत…

‘नागपूर पत्रिका’ या दैनिकाच्या दिवसांत कधीतरी नरेंद्र लांजेवारची ओळख झाली . त्याच काळात केव्हा तरी स्त्री अत्याचाराच्या विरोधात ठामपणे संघर्ष करणाऱ्या डॉ. सीमा साखरे यांनी बुलढाण्याजवळच्या सैलानी बाबा दर्ग्याच्या परिसरातील स्त्री शोषणाबद्दल लिहिलं होतं . त्या संदर्भात आम्ही दोघे तिघे पत्रकार अधिक माहिती घेण्यासाठी गेलो तेव्हा नरेंद्र लांजेवार दिवसभर आमच्यासोबत …

मनस्वी चित्रकार दिलीप बडे

दिलीप बडेची ओळख आम्हा दोघांच्याही विद्यार्थीदशेपासूनची . आम्ही दोघंही मराठवाड्यातले पण , ओळख झाली ती मात्र मुंबईत . तेव्हा तो ‘जेजे’ला होता आणि मी मुंबईत पोटासाठी पत्रकारितेच्या धबडग्यात नुकतंच शिरलो होतो . तेव्हा आठवड्यातून एखादी तरी चक्कर ‘जेजे’ ला मारण्याचा माझा रिवाज होता . कारणं दोन . एक म्हणजे जगण्याची …