राहुल गांधींच्या पदयात्रेच्या तरंगांच्या लाटा होतील का ?

शेकडोंची गळाभेट , हजारोंना सोबतीला घेत आणि लाखो लोकांचे लक्ष वेधून घेणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पदयात्रा उद्या , ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात प्रवेश करत आहे . १५० दिवस चालणारी ही पदयात्रा बारा राज्यातून जाणार आहे आणि ३५७० किलोमीटरचा प्रवास राहुल गांधी पायी करणार आहेत . ७ सप्टेंबरला सुरु झालेली …

■ मल्लिकार्जुन खरगे : सक्षम अध्यक्ष  की ताटाखालचं मांजर ?

एकीकडे राहुल गांधी यांची देशव्यापी पदयात्रा सुरु असतांनाच दुसरीकडे काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची लुटूपुटूची लढाई मल्लिकार्जुन खरगे यांनी अपेक्षेप्रमाणे जिंकली आहे . लुटूपुटूची लढाई म्हणण्याचं  कारण की , खरगे यांच्या उमेदवारीला गांधी कुटुंबियाचा अघोषित आणि पक्षांतंर्गत जी-२१ गटाचा जाहीर पाठिंबा होता .  अशा परिस्थितीत शशी थरुर यांची उमेदवारी नाममात्र आहे आणि त्यांचा पराभव …

‘अनटोल्ड’ मनोहर म्हैसाळकर

( छायाचित्र – विवेक रानडे ) कार्यकर्ता , संघटक आणि माणूस अशा दोन पातळ्यांवर मनोहर म्हैसाळकर जगत असत . या दोन्ही पातळ्यांवर त्यांच्या बऱ्यापैकी निकट जाण्याची किंबहुना त्यांच्या खास गोटातला एक होण्याची संधी मला मिळाली . वैयक्तिक पातळीवर माधवी आणि मनोहर म्हैसाळकरांची नागपुरातील जी लाडकी पण व्रात्य कार्टी म्हणून ओळखली …

लळा आणि छंदही शब्दांचा !

■■ १५ ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिन , त्यानिमित्तानं हे  कांही आत्मपर –■■ बालपणीचा काळ , १९६०ते ७०च्या दशकातला . माझी आई-माई नर्स होती . औरंगाबाद जिल्ह्यातलं खंडाळा आणि बीड जिल्ह्यातलं नेकनूर ही दोन गावं वगळली तर तिची प्रत्येक नियुक्ती आडगावातलीच . एसटीनं  रस्त्यावरच्या फाट्यावर सोडलं की तिच्या नियुक्तीचं गाव …

दसऱ्याची धुळवड !

शिवसेनेतल्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांनी या वर्षीच्या  दसऱ्याचा माहोल  ‘हायजॅक’ केला . या मेळाव्यापुढे प्रकाश वृत्त वाहिन्या , डिजिटल प्लॅटफॉर्म आणि मुद्रीत माध्यमांना या राज्यात इतर काही प्रश्न आहेत याचा जणू विसरच पडलेला होता . गर्दीचा निकष लावला तर एकनाथ शिंदे आणि भाषणाच्या आघाडीवर उद्धव ठाकरे …

केशवराव धोंडगे – ‘मन्याड’चा थकलेला वाघ !

( छायाचित्र – महात्मा गांधी मिशन रुग्णालयात केशवराव धोंडगे , सोबत  त्यांच्या पत्नी सौ . प्रभावती . ) जाणीव-नेणिव आणि स्मरण-विस्मरणाच्या सीमा रेषेवर असलेल्या वयोवृद्ध केशवराव धोंडगे यांची नुकतीच भेट झाली . महाराष्ट्राच्या राजकारणावर ठसा उमटवणाऱ्या अस्सल मराठवाडी इरसालपणा आणि मराठवाडी बोलीच्याही गोडव्याचा ठसा उमटवणारे केशवराव धोंडगे यांचं वय १०५ …

काँग्रेस आणि राहुल गांधींचे भवितव्य  ठरवणारी पदयात्रा…  

काँग्रेस पक्षाच्या नवीन ( आणि गांधी कुटुंबाच्या बाहेरच्या असलेल्या) अध्यक्षाच्या निवडणुकींच्या हालचालींनी  वेग  घेतलेला असतांना हा मजकूर प्रकाशित होईल तेव्हा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या भारत जोडो यात्रेला पंधरवडा उलटलेला आहे . उल्लेखनीय बाब म्हणजे , या पंधरा दिवसांत तरी कष्टकरी-कामकरी , सर्वसामान्य आणि विशेषत: युवकांमध्ये या यात्रेविषयी मोठं …

नितीशकुमारांची चाल तिरकी ?

राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’ची धामधूम सुरु असतांनाच इकडे बिहारमध्ये सत्तापालट झाला . भाजपसोबत ( अपेक्षित ) घटस्फोट घेऊन नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत पुन्हा एकदा घरोबा केलेला आहे . वरवर पाहता भाजपची साथ सोडून नितीशकुमार राष्ट्रीय जनता दलासोबत गेले असं वाटत असलं तरी , काँग्रेसच्या …

गुलाम नबींची ‘आझादी’ कचकड्याची न ठरो !

अपेक्षेप्रमाणे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसचा त्याग केला आहे . भाजप शासित केंद्र सरकारकडून ‘पद्म’ सन्मान मिळाला आणि राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपली तेव्हा निरोपादखल केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अश्रू गाळले , तेव्हापासून गुलाम नबी काँग्रेस सोडणार असल्याची आवाजात चर्चा होती ; ती आता खरी ठरली आहे …

नितीन गडकरी , बोला की स्पष्टपणे एकदा !

( ■चित्र – विवेक रानडे ) भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीतून एक दिग्गज नेते नितीन गडकरी यांना वगळून त्याजागी देवेंद्र फडणवीस यांचा समावेश करण्यात आल्याचा मुद्दा बराच चर्चेत आहे . राजकारणात २+२ = ४ असं कधीच नसतं ; ते तीन , पांच किंवा पाचशेसुद्धा असू शकतं . म्हणूनच त्याला …