लालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका!

सत्ताकांक्षा फलद्रूप न झाल्याची मध्यवर्ती कल्पना घेऊन समकालिन राजकारणावर वास्तववादी कादंबरी लिहिली गेली तर ती एक अत्यंत कसदार शोकात्म ललित कृती होईल; शरद पवार, नारायण राणे, मायावती, मुलायमसिंह असे काही त्या कादंब-यांचे नायक असू शकतील. लालकृष्ण अडवाणी यांच्यावरची कादंबरी मात्र महाशोकांतिका असेल आणि लालकृष्ण अडवाणी महानायक ठरतील! शरद पवार आणि लालकृष्ण अडवाणी या दोघांनाही पंतप्रधानपद आणि ते मिळणार नाही हे पूर्णपणे स्पष्ट झाल्यावर आयुष्याच्या उत्तरार्धात राष्ट्रपतीपदाची (सुप्त आस) होती. मात्र, महाराष्ट्रापुरत्या जेमतेम विस्तार असलेल्या पण, स्वत:ला राष्ट्रवादी म्हणवून घेणाऱ्या पवार यांचा सवतासुभा असलेल्या कोणत्याही कॉंग्रेसला आजवर ना कधी राज्यात स्वबळावर सत्ता संपादन आली आणि ना कधी किमान २५ खासदारही निवडून आणता आले. एक स्मरण असं- पंतप्रधानपदासाठी कायम उत्सुक असलेले पण, ते पद मिळालं नाही म्हणून चेहेऱ्यावर कधीही नैराश्य न दर्शवणारे पश्चिम बंगालचे एक नेते एकदा काही पत्रकारांशी या महत्त्वाकांक्षेच्या संदर्भात बोलतांना म्हणाले होते, ‘ज्याच्या पाठिशी त्याचं राज्य पूर्ण ठामपणे नाही, त्याचं पंतप्रधानपदाचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही, हे वास्तव मी स्वीकारलेलं आहे’. ‘यूपीए’चे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे हे नेते नंतर राष्ट्रपती झाले ही बाब अलाहिदा. शरद पवार यांच्याबाबतीत नेमकं असंच घडलं; महाराष्ट्र एकदिलानं आणि एकमुखानं त्यांच्या पाठिशी कधीच उभा राहिला नाही; पण, असं का घडलं वगैरे तो आताचा विषय नाही.

राजकीय पक्ष म्हणून भाजपला शून्यातून उभं करणारे- अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी

लालकृष्ण अडवाणी आणि त्यांच्या भाजप या राजकीय पक्षाचा हिंदुत्ववाद, राजकारणाची (क्वचित हिंसक झालेली व त्याची देशाला फार मोठी किंमत मोजावी लागलेली) शैली आणि धर्मांधता पूर्णपणे अमान्य असली तरी त्यांचं राजकीय कर्तृत्व वर उल्लेख केलेल्या सर्वच नेत्यांपेक्षा फार मोठं, व्यापक, राष्ट्रीय पातळीवरचं; महत्वाचं म्हणजे वैयक्तिक तसंच सार्वजनिक पातळीवर स्वच्छ चारित्र्याचं आहे; (हवाला प्रकरणात त्यांचं नाव आलं पण, पदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरं जात त्यांनी निर्दोषत्व सिध्द केलं). त्यांची अव्यभिचारी पक्षनिष्ठा आणि अविश्रांत राजकीय तपस्या तब्बल साडेसातपेक्षा जास्त दशकांची आहे. आता पाकिस्तानात असलेल्या कराचीत ८ नोव्हेंबर १९२७ रोजी जन्मलेले लालकृष्ण अडवाणी त्यांच्या शालेय व महाविद्यालयीन शिक्षणानंतर झालेल्या फाळणीनंतर भारतात आले आणि इथल्या समाज जीवनाचं एक कट्टर व अभिन्न अंग झाले. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले ते १९४२ पासून; तेव्हापासून ते राजकीय आणि सार्वजनिक जीवनात आजवर सक्रीय आहेत. संघाचे ते पूर्ण वेळ प्रचारक होते. नंतर त्यांना जनसंघात पाठवण्यात आलं. जनसंघ ते जनता पक्ष ते भारतीय जनता पक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास आहे आणि तो प्रचंड खाचखळग्यांचा तसंच अनेक नैराश्यपूर्ण घटनांचाही असला तरी कधी खचल्याची पुसटशीही रेषा त्यांच्या करड्या चेहेऱ्यावर उमटलेली दिसली नाही.

लालकृष्ण अडवाणी आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी हा पक्ष शून्यातून राष्ट्रीय पातळीवर उभा केला, देशभर पक्षाची पाळंमुळं रुजविली. पक्षाचा चेहेरा उदारमतवादी अटलबिहारी वाजपेयी आणि कठोर श्रम लालकृष्ण अडवाणी यांचे; अशी कायम कामाची विभागणी राहिली आणि ती जबाबदारी लालकृष्ण अडवाणी यांनी नेहेमीच कोणतीही कुरकुर न करता स्वीकारली. विचारी, संयमी पण ठाम, जहाल पण शांत, धोरणी आक्रमकता असं गुणवैशिष्ट्य असणारं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. राजकीय लाभासाठी रामजन्मभूमी आंदोलनाचा भडका अडवाणी यांनीच उडवला (आणि समाज दुभंग करणाऱ्या धर्मांध राजकारणाला देशात प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. म्हणूनच जातीय आणि धार्मिक समीकरणांचा ‘सांगोपांग’ विचार करुन राजकारण करणाऱ्या देशातील मायावती, मुलायमसिंह, ओवेसी अशा अनेकांचे अडवाणी हे ‘गुरु’ शोभतात.) त्यासाठी अडवाणी आणि प्रमोद महाजन देशात वणवण फिरले. प्रमोद महाजन यांचं सारथ्य आणि अडवाणी यांची यात्रा हे समीकरणच एकेकाळी देशाच्या राजकारणात रूढ झालं होतं.

लालकृष्ण अडवाणी यांची यात्रा आणि प्रमोद महाजन यांचे ‘सारथ्य’ – अडवाणी यांच्या या यात्रांनी देशातील राजकीय वातावरण ढवळून काढलं गेलं . अशा पाच राजकीय यात्रा त्यांनी काढल्या .

बाय द वे, राजकीय जीवनात लालकृष्ण अडवाणी यांनी एकूण पाच ‘यात्रा’ काढल्या, देशभर लक्षावधी किलोमीटर्स प्रवास केला आणि गाव पातळीवर देश पिंजून काढला; हे त्यांचे राजकीय श्रम केवळ अतुलनीय आहेत. लोकसभेत केवळ दोन सदस्य अशा खाईत भारतीय जनता पक्ष कोसळला पण, वाजपेयी आणि अडवाणी यांनी त्या खाईतून पक्षाला बाहेर काढलं; सभागृहातला सर्वात मोठा पक्ष हे स्थान प्राप्त करून दिलं; पुढे जाऊन केंद्रात इतर पक्षांसोबत युती करून का होईना पण, आधी तेरा दिवस-मग तेरा महिने-नंतर पूर्ण टर्म सत्ता मिळवून दिली. आता तर त्यांचा पक्ष केंद्रात आणि अनेक राज्यात स्वबळावर सत्तेत आहे; मात्र अशा या सुगीच्या दिवसात वाजपेयी प्रकृती अस्वास्थ्यामुळे बाजूला पडलेले आहेत तर लालकृष्ण अडवाणी यांना पूर्णपणे बाजूला टाकण्यात आलेलं आहे.

देशाच्या उपपंतप्रधानपदापर्यंत लालकृष्ण अडवाणी पोहोचले. ते जेव्हा उपपंतप्रधान झाले तेव्हा पंतप्रधान असलेले अटलबिहारी वाजपेयी थकलेले होते आणि स्वाभाविकच लालकृष्ण अडवाणी हेच केंद्रीय सरकारचे सर्वेसर्वा होते. माझं म्हणणं अनेकांना रुचणार नाही पण, नमूद करतोच; ‘प्रथम देश आणि मग पक्ष’ अशी भूमिका घेत म्हणजे संघाचा अजेंडा बाजूला ठेऊन; पंतप्रधान वाजपेयी आणि उपपंतप्रधान अडवाणी यांनी केंद्र सरकार चालवतांना पंडित जवाहरलाल नेहेरु यांनी आखून ठेवलेली परराष्ट्र धोरणांची चाकोरी बदलली नाही, देशाच्या सेक्युलर भूमिकेला तडा न जाऊ देण्याचा प्रयत्न केला आणि संघ धुरिणांची इच्छा डावलून पाकिस्तानशी असलेले संबध अधिक सुरळीत व सौहार्दाचे होण्यासाठी प्रयत्न केले. म्हणूनच त्या दोघांची जनमानसातली प्रतिमा उजळली. ही प्रतिमा इतकी उजळ होत गेली की, त्यापुढे सरसंघचालकांची प्रतिमा लहान आणि ते पद खुजं वाटू लागलं. संघ स्थापनेपासून असं प्रथमच घडत असल्यानं त्यामुळे संघात अस्वस्थता पसरणं अपरिहार्य होतं.

याच काळात आम्हा काही संपादकांशी बोलतांना तत्कालिन सरसंघचालक सुदर्शन यांच्या बोलण्यातून ती अस्वस्थता अगदी स्पष्ट नसली तरी बऱ्यापैकी व्यक्तही झाली; त्या चर्चेप्रसंगी मोहन भागवत हेही उपस्थित होते. ती अस्वस्थता मला ‘मळमळ’ वाटली; ‘कट्टर’ लालकृष्ण अडवाणी संघाच्या नजरेतून उतरण्याची ती सुरुवात आहे अशी पुसटशी जाणीवही तेव्हा झाली आणि त्या ‘मळमळी’वर मग मी ‘लोकसत्ता’तून टीकास्त्र सोडलं; तेव्हा बराच गहजब झालेला होता. (ती हकिकत ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या ‘दिवस असे की…’ या पुस्तकात पृष्ठ क्रमांक १५६वर विस्ताराने आलेली आहे.) नंतर पाकिस्तानात जाऊन लालकृष्ण अडवाणी यांनी बॅरिस्टर जीना यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले आणि संघ आणखी बिथरला. २००४ पाठोपाठ २००९च्या लोकसभा निवडणुका भाजपने लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या पण, भाजपचं स्वबळावरचं किंवा एनडीएचं सरकार स्थापन होण्याइतकं बहुमत मिळालं नाही; उलट कॉंग्रेस सभागृहातील सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थिरावला आणि (संघ आणि भाजपच्या नाकावर टिच्चून श्रीमती सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद नाकारल्यावर) केंद्रात मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखाली यूपीएचं सरकार सत्तारूढ झालं; तेव्हाच संघाच्या दृष्टीकोनातून लालकृष्ण अडवाणी यांची किंमत पूर्ण उतरलेली होती!

रा. स्व. संघाच्या शाखेत लालकृष्ण अडवाणी

दरम्यान मोहन भागवत हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक झालेले होते. इथे एक बाब ठळकपणे लक्षात घेतली पाहिजे– मोहन भागवत परिवारात जसजसे सर्वशक्तिमान होत गेले तसतसं लालकृष्ण अडवाणी यांचं पक्षातलं स्थान डळमळीत होत गेलं. आधी लोकसभेतील विरोधी पक्ष नेतेपद लालकृष्ण अडवाणी यांच्याकडून काढून सुषमा स्वराज यांच्याकडे दिलं गेलं; मग रा. स्व. संघाचे (पक्षी : मोहन भागवत यांचे) ‘ब्ल्यू आईड बॉय’ नितीन गडकरी यांना ‘रीतसर’ प्रक्रिया पार पाडून पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान करण्यात आलं; नंतर पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांना समोर आणलं गेलं. नरेंद्र मोदी यांचं नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर झाल्यावर ‘ब्लॉग बॉम्ब’ टाकण्याचा लालकृष्ण अडवाणी यांचा प्रयत्न बहुमिन्नतीनंतर नितीन गडकरी आणि सुषमा स्वराज यांनी बारगळवण्यात यश मिळवलं; नंतर त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरुन ‘मानपान’ घडवलं गेलं; लालकृष्ण अडवाणी तसंच त्यांच्या सर्व ज्येष्ठ सहकाऱ्यांची होणारी ‘तडफड’ एक पत्रकार म्हणून जवळून अनुभवता आलेली आहे.

एके काळचे गुरु आणि शिष्य- लालकृष्ण अडवानी आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी . आज ते नातं अस्तित्वात आहे ? 

२०१४च्या लोकसभा निवडणुकीत संघाच्या नियोजनाला यश आलं आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला स्वबळावर सत्ता मिळाली; परिवाराचं स्वप्न साकार करणारा तो क्षण नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यानं एकहाती मिळवून दिलेला होता. लोकसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळालं नाही तर आपणच एनडीएचे सर्वसंमतीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असूत ही लालकृष्ण अडवाणी यांची अंधुक आशाही मोदी आणि भाजपच्या या ऐतिहासिक यशानं पूर्ण मावळली. त्यानंतर तर लालकृष्ण अडवाणी आणि त्यांच्या सर्व ज्येष्ठ सहकाऱ्यांची रवानगी पक्षाच्या ‘सल्लागार मंडळात’ म्हणजे वेगळ्या शब्दात-स्पष्टच सांगायचं तर, अडगळीच्या खोलीत करण्यात आली. या सर्व प्रसंगी ‘अडवाणी युगाचा अस्त होतोय’ आणि २०१६साली लालकृष्ण अडवाणी यांना पद्मविभूषण हा सन्मान मोदी सरकारने जाहीर केल्यावर ‘आता काही लालकृष्ण अडवाणी राष्ट्रपती होणार नाहीत’, भाजपतील ‘अडवाणी युगाचा अस्त झालाय’ असं लिहित होतो तेव्हा, ‘भक्तां’नी हल्ले चढवत मला त्रस्त करून सोडलं होतं.

बाबरी मस्जीद पाडल्याचा खटला ऐन राष्ट्रपती निवडणुकीच्या तोंडावर ‘उकरून’ काढला गेला वगैरे बाबी फारच क्षुल्लक आहेत. लालकृष्ण अडवाणी यांना पंतप्रधान न होऊ देणं ही ‘परिवारा’कडून खेळली गेलेली एक नियोजनबध्द प्रदीर्घ खेळी होती आणि राष्ट्रपतीपद त्यांना मिळणारच नव्हतं. भारतीय राजकारणाच्या पटावर सध्या तरी इतकी मोठी इनिंग्ज खेळलेला, लालकृष्ण अडवाणी यांच्या सारखे अविश्रांत कठोर श्रम घेतलेला, अनुभवी नेता दुसरा कोणीही नाही. मात्र त्यांची पंतप्रधान होण्याची प्रकट आणि राष्ट्रपती होण्याची सुप्त महत्त्वाकांक्षा फलद्रूप झालीच नाही…ज्या राम मंदिरासाठी त्यांनी इतका हिंसक संघर्ष केला तो ‘राम’ लालकृष्ण अडवाणी यांना पावलाच नाही. लालकृष्ण अडवाणी यांची एका राजकीय महाशोकांतिकेचा महानायक अशीच दखल राजकीय इतिहासकारांना घ्यावी लागणार आहे!

एक कोडं मात्र उलगडत नाही; आयुष्याचे तब्बल ८९ उन्हाळे-पावसाळे पाहिलेल्या लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याला या खेळी समजल्या कशा नाहीत; कुठे थांबावं हे त्यांना कळलं कसं नाही? खरं तर, दिलेल्या योगदानाच्या मोबदल्यात पक्षांनीही अडवाणी यांच्या पदरात भरपूर काही टाकलेलं होतं. या खेळी समजूनही जर महत्वाकांक्षा जाणीवपूर्वक तेवतच ठेवली गेली असेल तर, ही महाशोकांतिका ओढावून घेण्यास लालकृष्ण अडवाणी हेही तितकेच जबाबदार आहेत; असा निष्कर्ष कोणी काढलाच तर तो अवाजवी ठरणार नाही.

// नवीन वाचकांच्या माहितीसाठी- प्रस्तुत लेखकाने रा. स्व. संघाच्या मुख्यालयी म्हणजे नागपूरला संघ हे बीट अन्नेक वर्ष कव्हर पत्रकार म्हणून केलेलं आहे; पुढे, २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी यूपीए म्हणजे- कॉंग्रेस पक्ष आणि पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचा होणारा दारुण पाडाव, राहुल गांधी यांचं कॉंग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून झालेलं आगमन, भाजप आणि राष्ट्रीय राजकारणाच्या पडद्यावर नरेंद्र मोदी यांचा उदय म्हणजे-लालकृष्ण अडवाणी यांचा राजकीय अस्त होण्याच्या काळात दिल्लीत होतो; म्हणून या सर्व घडामोडीं आणि त्यामागे असणारे ‘बिटविन द लाईन’ संदर्भ जवळून अनुभवता आलेले आहेत. //

(सर्व छायाचित्रे गुगलच्या सौजन्याने)

संपर्क +९१९८२२०५५७९९
[email protected]

================================================
‘डायरी’, नोंदी डायरीनंतरच्या’, ‘दिवस असे की…’, ‘आई’, ‘क्लोज-अप’, ‘ग्रेस नावाचं गारुड’, ‘समकाल’ या माझ्या पुस्तकांसाठी लिंक-
http://www.bookganga.com/ebooks/books/Bookapplet?AID=4736828222950359515
================================================

संबंधित पोस्ट

 • Surendra Deshpande….
  When he was home min what he did for ram mandir article370 or pak based terrorism nothing

  • Sandeep Sawant ·….
   He was not having clear majority that time. Even if he had, he would not have done it. Today Modiji has a clear majority but he will also not do it.

   It is being repeated again and again…. Ram mandir was an issue to get votes. Similarly 370.

 • Dattatraya Jadhav ·….
  ह्याची फळे भोगावी लागतील

 • Veera Rathod ….
  त्यांच्या नावात ‘राम’ नव्हता अन् आडनावात ‘अड’वाणी होती अडवने..म्हणून अडवनी.

 • Anand Kathapurkar ·….
  काहीही महाशोकांतिका नाहीये. ते उपपंतप्रधान होते. तेही काही कमी नव्हतं.
  एक कळत नाही, भाजपात कुणाला संधी मिळाली नाही की बाकीच्यांनाच का इतकं वाईट वाटावं?
  शिवसेनेत आनंद दिघेंचं, राज ठाकरेंचं काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे..काँग्रेसमधे तर अडगळीत टाकलेल्यांची भली मोठी यादी आहे…
  त्यामुळे भाजपात होणाऱ्या गोष्टींबाबत उगाचच ऊर बडवून लोकांची सहानुभूती मिळवायचा केविलवाणा प्रयत्न कुणी करू नये.

  • Rajaram Gholap ….
   It is only of price of heretic mindset who had instigated common public in guise of hindu religion.

   • Milind Wadmare ….
    राष्ट्रीय पक्ष म्हणून भाजपचे आणि त्यातील व्यक्तींचे मूल्यमापन होता कामा नये असे तरी का वाटावे? आणि एक पत्रकार म्हणून तरी हरकत नसावी.

    • Anand Kathapurkar · ….
     राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेस मधल्यांचं कधी मूल्यमापन झालं? तिथे तर गांधी घराण्याला सोडून बाकी कुणालाच काहीही मूल्य नव्हतं.

     • Vijay Aswar….
      बर्दापूरकरांनी वस्तुस्थिती मांडली आणि सहानुभूति घेऊन बर्दापूरकरांना राष्ट्रपति व्हायचे नाही !

     • Shailesh P.Patane ….
      भाजपा मधे त्यांना अडगळीत टाकले आहे. आता गरज सरली

 • Rajeev Nawathe ….राम मंदीराचा मुद्दा हा रामाचं अयोध्येत मंदीर व्हावं यासाठी घेतला होता , खरोखरच रामावर नीतांत प्रेम आहे म्हणुन घेतला होता , हींदुत्वाच्या अस्मितेसाठी घेतला होता की स्वत:ला पंतप्रधान पद मिळावं यासाठी घेतला होता हे रामजाणे पण गेल्या तीन वर्षांत अडवाणीवीषयी सहानभुती वाटणारांची संख्यामात्र नक्की वाढली !

 • Prasanna Shembekar ….
  Problem with him was his reactive nature and bold statements. Ultimately he had to pay for it..

  • Gulshan Patle ·….
   ९०दी चा राष्ट्रपती….ते ही भारतासारख्या तरूण देशात?

 • Gulshan Patle ·….
  ९०दी चा राष्ट्रपती….ते ही भारतासारख्या तरूण देशात?

 • Rajaram Gholap ….
  Pay as your past doing.

 • Keshao Gurumukhi ….
  Jaise jyache karma taise tyache false detox re Ishwar. Vithal Vithal …. Namacha Gajar, garje Bhima teer; garje Bhima teer ….

 • Pratik Shivajirao Patil ….
  वाचला सर ,अडवाणींच्या एकूण राजकीय कारकिर्दीचा मागोवा मस्त घेतलाय 😊

 • Pratibha Bhosale ….
  नायक नही खलनायक हू मैं

 • Rajiv Jadhao ….
  राजकारण हे असचं असते,तिथे दयामायेला स्थान नाही.धार्मिक उन्माद फैलवणाऱ्या अडवाणीचे नियोजन मोदी,महाजन यांनी केले.आज त्याच मोदींचे हातून अपमानीत व्हायची वेळ आली.

 • Pralhad Lulekar ….
  शोकांतिकेचा महानायक … सत्यच

 • Mulajkar Achyut ….
  अडवाणी हे काही किरकोळ नेते नाहीत मोडीभक्त काहिही लिहत आहेत

 • Mulajkar Achyut · ….
  मोदी आणि आडवाणी यांच्यात तुलना पण नाही होऊ शकत

 • Mulajkar Achyut · ….
  ज्या माणसांमुळे हा माणूस देशाच्या सर्वोच्च पदावर पोचला ते पण विसरून गेला .
  आठवते का गोवा कार्यकारिणी
  आटलजी काय म्हणाले होते .
  अतिशय सडेतोड विसलेशन केले आहे प्रविनजी

 • Anand Kathapurkar ·….
  मोडी नाही हो मोदी! आणि आत्ता अडवानी आठवले का? आनंद दिघेंचं काय झालं माहितीये सगळ्यांना. आजही ठाण्यात शिवसेना आली ते त्यांच्याच पुण्याईवर. असो

  आणि अभक्तांना का पोटदुखी होतिये. भाजपात काही झालं की का अभक्तांना आनंदाच्या उकळ्या फुटतात हेच कळत नाही .
  तुलना बाकीचेच करत आहेत. भाजपात कुणीही करत नाहीये.

 • Abhijit Jadhav ·….
  सत्यमेव जयते याचा व्यक्तिगत अनुभव आल्याची जाणीव घेतोय सर. रथयात्रे वेळी लोकांनी सोन्या चांदिचे राम दिले होते ते खरं आहे काय? आणि खरं असेल तर ते कुठं असतिल.

 • Prabhakar Nikum ·….
  कसली आलीए शोकांतिका ? न्याय करायचा तर कधिच जेलमध्य बसायला पाहिजे होतं .

 • Anil Nagapure….
  Best

 • Anil Govilkar….
  एका अस्तंगत होत गेलेल्या राजकीय नेत्याचा अतिशय सुरेख परामर्श घेतला आहे. तरीही मला असे वाटते, जे लिहिले त्यापेक्षा अधिक काही अजून बाकी राहिले आहे, असे वाचताना वारंवार जाणवत होते. अर्थात तसे ते असणारच म्हणा. अडवाणी हे व्यक्तिमत्व अशा एका लेखापुरते सीमित होणारे नक्कीच नाही. १९९२ नंतर मी बराचसा काळ जरी परदेशी घालवला असला तरी भारतातील बहुतेक सगळ्या घटना मला कळत होत्या. त्यामुळे तुम्ही लिहिलेले सगळे पटत गेले. खरतर, अडवाणी एके काळी दिल्लीचे महापौर होते आणि महापौर म्हणून त्यांची कारकीर्द बरीच गाजली होती. असे म्हणतात, नवी दिल्ली वसविण्यामागे अडवाणींचे परिश्रम, कल्पना इत्यादी गोष्टी होत्या. अर्थात माझ्या बाबतीत या सगळ्या ऐकीव तसेच काही ठिकाणी केलेले वाचन, इतपतच मर्यादित आहे !!
  असो, सुंदर लेख.

 • Parimal Dhawalekar
  प्रिय, प्रविण सर
  खुप सुंदर लिहलत. आवडलं !

 • Sunil Dikshit ·….
  ते उपपंतप्रधान होतेचकी

 • Mangesh Tarole-patil….
  “लाल” यांना वगळून “कृष्णा”नी एकदा “आड” मुठे धोरण राबवत जीना प्रेम त्यांच्या “वाणी”वर आणले आणि त्यांना उतरती क”म”ळा लागली…….?

 • Padmanabh Pathak….
  हं. सहमत.!

 • Mangesh Paturkar…. कसली आली शोकांतिका,अडवाणी ना आयुष्यात सगळे च मोठी पद उपभोगली आहे कदाचित त्यावेळी कुणावर अन्याय झाला असेल,कधी ना कधी कुणावर तरी न्याय अन्याय होतच असतो,योग्य परिस्थिति पाहून च योग्य निर्णय घ्यावा लागतो.
  लोकांच्या पोटात का दुःखतं माहीत नाही, आणि परिवाराला नावं ठेवण सध्या फॅशन च आहे.

 • CA-Yogesh Joshi YJ ….
  कसलाही कट असावा असं वाटत नाही. तब्बल 2 निवडणुका आणि 8 वर्षे प्रमुख पद -2004 ते 2012 त्यांच्याकडेच होतं…. जे मोदी यांनी केलं ते किमान यूपीए च्या दुसऱ्या विजयाच्या वेळी यांनी केलं असतं तर?

 • Baliram Jadhav BJ ….
  अडवणींना शेवटी गुरूदक्षिणा नाहीच…..
  अटलजी – अडवाणींजी या जोडीने आपल पुर्ण आयुष्य आपल्या पक्षासाठी वाहुन दिलं, 2 खासदार असलेल्या पक्षाला स्वतः च्या कष्ट, निःस्वार्थी भावना, पक्षाशी असलेली एकनिष्ठता, संघभावना,कार्यकर्त्यांशी असलेली प्रेम-अपुलकी याच्या जोरावर 200 अपेक्षा अधिक खासदाराचा पक्ष बनवला,
  अडवाणीजींना पंतप्रधान पदी विराजमान होण्याची संधी त्यावेळी पक्षाध्यक्ष असल्याने स्वतःच्या हातात असताना स्वतः निःस्वार्थपणाने आपल्या परम मित्राला (अटलजींना) पंतप्रधान पदी विराजमान केलं…
  ही त्यागभावना कुठे..?….आणि आता देशाच राजकारण सांभाळणारी जोडगोळी कुठे…?
  माफ करा साहेब तुम्ही केलेल्या त्यागाची किंमत सर्व आयतं मिळालेल्या या जोडगोळी ला काय कळणार..? आणि चुकून कळाली तरी यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार…
  कारण तुम्हांस गुरूदक्षिणा म्हणुन आनंदाने राष्ट्रपती पदी बसवण्याची संधी त्यांच्या हातात असताना फक्त जातीवादी मताच्या राजकारणासाठी तुम्हाला डावललं गेलं आणि काही समाजाच्या मतपेटी आपल्या कडे टिकुन राहाव्यात यासाठी दुसरा ऊमेदवार दिला…हे सर्व न समजण्यासारखा आजचा समाज अडाणी राहिलेला नाहीये, ही तेवढीच लक्षात ठेवण्यासारखीच गोष्ठ आहे……
  तुमच्या एका निस्सिम चाहत्याकडून भविष्यासाठी खुप शुभेच्छा…
  – बळीराम जाधव

 • Mangesh Pimple….
  बहोत हिसाब चुकाना है

 • Anil Shende….
  hinsak sangharsh kasa kay mhanata buwa, kahi kalala nahi.

 • Rajesh Kulkarni….
  जेव्हा वाजपेयी बहुतेकांना ा मान्य उमेदवार होते तेव्हा अडवाणी नव्हते. मोदींची लोकप्रियता समोर आली तेव्हा यांची बरीचशी झाकोळली होती. आता वयही विरोधात होते.
  शिवाय युपीएच्या आधीची निवडणुक यांच्या पंतप्रधानपदासाठीच्या उमेदवारीखाली लढवली, परंतु अपयश आले.
  तेव्हा त्यांना पंतप्रधानपदापासून दूर ठेवण्यात आले असे का म्हणावे?

 • Anil Bhure ·….
  युगान्त…आडवाणींची राहिलेली ऊरलीसुरली राजकीय आकांक्षा पण लयास गेली…” सत्तेपुढे शहाणपण चालत नाही” म्हणतात ते खरे आहे…

 • Pravin Pagare ·….
  ऐरणीवरचा विषय असेल तो आता लालकृष्ण अडवाणी यांच्या संन्यास मार्गाचा. 2019 नंतर अडवाणी यांचा राजकीय संन्यास जवळपास नक्की मानवा लागेल.

 • Bhupendra Kusale ….
  मेहनत करे मुर्गा
  अंडा खाये फकिर …. एकंदरीत
  असा हा सगळा प्रकार आहे .
  भाजपवाला नाही ,,परंतू अद्याप
  P M in waiting..च राहीलेले
  अडवाणी यांच्यावर गुजरलेला असा
  बाका प्रसंग
  वै-यावरही यैवू नये

  • Pravin Abde ·….
   असा प्रसंग यशवंत चव्हाण शरद पवार यांच्या वर देखील आला

 • Damodar Dehedkar ….
  पद नाही मिळाले म्हणुन त्यांचे मोठेपण कमी होत नाही.त्यांनी पक्षासाठी कार्य केले पदासाठी नाही

 • Shantaram Pandere ….
  अटलजींचा आदर्श घ्यायला हवा होता. हिंसा ही भारतीय मानसमध्ये अजून तरी नाही! म्हणून हि शोकांतीका एवढेच!!

 • Rajendra Kale ….
  अब *’कृष्ण’* का टिकट काटकर,
  *’राम*’ को दे दिया तो,
  *मीरा* विरोध करेगी ही..

 • Anant Pimpalkhute ….
  अडवाणी ची एकच चुक त्यांना निवृत्ति कडे घेवुन गेली बर्याच लाेकांना आठवतही नसेल कि हें महाशय पाकिस्तान ला जावुन जिना च्या कबरी जवळ जें बरळले त्याला माफी नव्हतीच !!!

 • प्रकाश कुळकर्णी….
  1992 नंतर मी अडवाणींचा खूप चाहता होतो, जिनाच्या कबरी वर माथा टेकवल्यावर मला थोडे वाईट वाटले पण तरी सुद्धा मला ते आवडत, पण मोदींना विरोध केला तेव्हा मात्र त्यांचा राग आला, पण तरीही वाटे कि हे राष्ट्रपती व्हायला हवे होते, पण राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी मोदींना अडचणीत आणले असते त

 • Milind Joshi ….
  फारच छान

 • Dharmesh Pamnani ….
  Everything is fair in Love & war & Politics

 • Suryakant Shinde ·….
  “भाजपचे ‘लोहपुरुष’ पाकी बिर्याणीवर असा ताव मारला की ते राजकीय जीवनात कायमस्वरूपी वितळून ( पघळून ) गेले.. अन लोहपुरुष्याची मर्यादा स्पष्ट झाली..!!”

 • Sopan Pandharipande ….
  Good analysis, Pravin!!

 • Raj Khapre · ….
  Karmache Fal ithech bhogawe lagatat

 • Vasudha Chivate ….
  पद पाहिजे असं नाही आठवण कायम काम केल्याची राहते

 • Rajendra Kore ·….
  अडवाणी हेच खरे राष्ट्रपती पदाचे उमेदवार भाजपा ने द्यायला हवे होते…नक्कीच बिनविरोध निवडून अले असते

  • Dhananjaya Kotwal ….
   अशक्य होते ते…ज्या रामनाथजींमध्ये मोहरी एवढा हि दोष न काढू शकलेल्या विरोधकांनी त्यांचे विरुद्ध उमेदवार दिलाच…अडवणींना उमेदवार केल्यावर राम मंदिर,हवाला सगळी उजळणी झाली असती

   • Rajendra Kore ·….
    पण tyanchwar खुप अन्याय झाला असे वाटतेajendra Kore ·…

 • Suryakant Jagdale ·….
  अगदी बरोबरच

 • Pravin Upadhye ·….
  ‘हिंसक संघर्ष’?…. बर्दापूरकर साहेब लाज बाळगा जराशी… आंदोलक हिंसक झाले ते मुलायम सिंगाने आंदोलकांवर गोळीबार केल्या नंतर.. संपूर्ण रथयात्रे दरम्यान कोठेही हिंसाचार झाला नव्हता… हाती लेखणी आणि ढुंगण पुसायला कागद आहे म्हणून वाट्टेल ते लिहु नका..

 • Prasann Harankhedkar….

  फार सुरेख लिहिला आहात काका हा लेख!!!

 • Sachin Ketkar….
  मोहनराव भागवत यांच्यावर एखादा तपशीलवार लेख लिहा। हा माणूस अत्यंत मुरब्बी, धोरणी आहे।

  • Shankar Bhalekar ·….
   अडवाणींना दूर ठेवले हे राजकीयदृष्टया मोदींनी हेतुपुरस्सरच केलेले दीसते !

 • Shankar Bhalekar ,,,,
  अडवाणींना दूर ठेवले हे राजकीयदृष्टया मोदींनी हेतुपुरस्सरच केलेले दीसते !

 • Prafulla Kulkarni ….
  अवघ्या आशा श्रीरार्मापण !

 • Gunvant Patil ….
  अडवाणींची पाकिस्तान trip ही एक calculated risk होती. बाजपेयींनंतर पुन्हा जर आघाडी चे सरकार स्थापन करण्याची शक्यता असती तर पक्षाला निधर्मी चेहरा हवा होता. कारण सहकारी पक्षांनी कट्टर कडवाणींना नाकारले असते. अशा वेळी मागे महाजन बाशिंग बांधून ऊभे होते. दुर्दैवाने त्यांचा म्रुत्यु झाला. जर का प्रमोद महाजनांचा म्रुत्यु काही काळ आधी झाला असता तर अडवाणी कधीच पाकिस्तान गेले नसते.

 • Janardhan Paunikar ·….
  संघ संस्कारित स्वंयंसेवक तयार करणारी संस्था आहे असे त्यांचे लोक आज पर्यंत म्हणत आले आहे . वयोवृद्ध सन्मानिय व्यक्तीचं त्यांच्या परंपरेनुसार मानसंन्मान केलं आहे असं आपण समजायचं.

 • Sandhya Saratkar….
  आड़वाणी ची प्रत्येक कृति ही आरएसएस ला खुश करन्याकरिताच होती मस्जिदी चा घुमट पडल्यानंतर त्यांच्या चेहरयावरचा आनंद अवर्णनीय होता .
  आपल्या पुढ़यात काय वाढून ठेवले आहे
  है अड़वानीलाही कळू दिले नाही त्याचच नाव आरएसएस.

 • Ajay Kandar….
  Good अगदी सत्य

 • Adv. Madhav Bhokarikar….
  आता नुकतीच श्री. प्रविण बर्दापूरकर यांनी मा. लालकृष्ण आडवाणी यांच्यासंबंधी लिहिलेल्या विचार वाचले. त्यांच्या इतर विचारांबद्दल वाद न घालता, एवढेच सांगता येईल –
  घरातील कर्तबगार मुलाला घरासाठी आयुष्यभर सर्वकाही करावे लागते. लोकांशी, समाजाशी, नातेवाईकांशी वाईटपणा घ्यावा लागतो. मग घर बऱ्यापैकी पुढे येते. अपेक्षा असते त्याची व बाहेरच्यांची पण की याच्या कर्तबगारीतेला मान्यता मिळेल. तसे प्रत्येक वेळी होतेच असे नाही. घर सांभाळणे महत्वाचे असते, त्याच्या कर्तबगारीची पावती देणे नाही. मग घरातीलच इतरांना मानपानासाठी पुढे केलं जाते. त्या कर्तबगार मुलाला हे पण समजत असतेच ! पण इतरांना अपेक्षित असलेले न वागणं हेच आवश्यक बनलेले असते. अन्यथा त्यातून त्याने कर्तृत्वाने उभे केलेले घर धोक्यात येणार असते. हे पण त्याचेच कर्तृत्व असते. त्याला घर सांभाळायचे असते, पडू द्यायचे नसते. हा आदर्श निर्माण करणे हा त्याच्या कर्तृत्वाचाच भाग असतो.
  आपण बरेचसे या अनुभवातून गेलेले असाल.
  इतर ज्या पक्षांच्या नेत्यांनी हे ओळखले नाही, त्यांची अवस्था आपण पहात आहोत.

  • Vasant Damle…..
   भाजपातल्या लोकां पेक्षा बाहेरच्या लोकानांच …अडवाणी चा जास्त कणव….व….काळजी…

   • Sameer Puranik ….
    सुंदर विवेचन..

    • Amit Upadhye….
     Bjp vallyanna knach nhi stta ali ki apal te kaarat dusryach te balya

     • Pravin Upadhye ….
      राम मंदिर रथयात्रे नंतर श्री. अडवाणी कर्मठ, कडवे हिंदुत्ववादी आणि समस्त विरोधी पक्षांच्या द्वेषास पात्र होते… आज मोंदीसमोर डाळ शिजत नसल्याने श्री. अडवाणी उदारमतवादी आहेत….

     • Madhav Bhokarikar….
      तसेच म्हणता येणार नाही.

     • E J Mahajan ….
      अत्यंत अभ्यासपूर्ण सूक्ष्म निरिक्षण आहे भाऊ .

     • Avinash Jahagirdar….
      पक्ष व त्याही पुढे जाउन राष्ट्रीय हीत डोळ्यांसमोर ठेवायचं, तसेच विरोधी पक्षांवर कुरघोडी करायची, पुढच्या निवडणुकीची गणितं मांडायची, तर भावनांना बाजुला ठेवावं लागतं. कांहींची नाराजीही पत्करावी लागते. मोदीजी कसलेले, मुरब्बी राजकारणी आहेत.लोकांचा त्यांचेवर विश्वास आहे.

     • Vasudha Chivate ….
      सगळे पद खुर्ची करता धडपडत असतात साठी जे काम करणारे ते बाजूला चं राहतात

     • Amar Kamlakar Deshpande….
      अडवाणीजी दी ग्रेट

     • Madhav Bhokarikar….
      प्रत्येक काळांत आपल्या प्रत्येकाच्या योगदानाची दखल असतेच.

     • Avinash Jahagirdar….
      काँग्रेस च्या राजवटीत राजकारण हा शब्द अतिशय बदनाम झाला आहे. सर्वजण सर्वकाही स्वार्थ। आणि खुर्चीसाठीच करतात, असेच आपल्या मनात रुजले आहे. हे दुर्दैवं.

     • Vasudha Chivate….
      मग अडवाणीजीं नां का राष्ट्रपति करत नाहीत

     • Avinash Jahagirdar….
      आपल्या नेत्यावर व राजकीय कौशल्यावर, त्याच्या शुध्द हेतुवर आपला विश्वास असावा. मा. आडवाणी व मा मुरलीमनोहर जोशी स्वतः नामांकन पत्र भरतेवेळी उपस्थित होते व त्यांच्या बॉडी लैंग्वेज मध्ये कुठेही नाराजी दिसली नाही.

     • Kantilal Tatiya….
      ” त ” म्हणजे ” तपेले ” !!

     • Dranant Akole ….
      ही शिकवण फक्त आर एस एस. करु शकते जेथे फक्त हिंदु धर्मा चा विचार होतो

     • Nandu Phadke….
      खरं आहे

     • समोरच्याला प्रतिवादाचा आणि आपल्याला मान्य असो वा नसो , त्याला स्वत:चे मत बाळगण्याचा अधिकार असतो ही माझी कायमच धारणा आहे . धन्यवाद !

     • Ritesh Shahane….
      Ritesh Shahane Bolachiya kadi, Bolachich bhat, Jewooniya trupt zale kon ?
      Ritesh Shahane आम्हाला ना अडवाणी बद्दल काही संवेदना आहेत किंवा मोदी बद्दल. आम्ही फक्त राजकारणाचा गारुडी खेळ पाहणारे दर्शक आहोत. आम्हाला माहीत असते शेवटी सर्व मदाÚयाच्या हातीच असते की कोण कसा नाचनाच व कोण कसा कोलांट उडी मारणार. विनाकारणाच्या राजकारणात फार काही उरले नाही आहे. काल सोनिया होती आज मोदी, शहा आहेत, उगाच का जीवाला त्रास करुन का घ्यायचा ? शेवटी सर्व सारखेच ! अडवानींना राष्ट्रपतीपद नाही मिळाले याचे देशाला काही सोयर सुतक नाही. तस पाहीलं तर भाजपाचे सर्वात ज्येष्ठ नेते या न्यायाने त्यांना सर्वोच्च पद भेटावे अशी सर्वांचा म्हणजे आमच्या सारख्या कोणाचेही निष्ठावंत नसलेल्या लोकांची सुद्धा अपेक्षा होती परंतू उद्दामपणे, उर्मटपणे आपल्या ज्येष्ठांचा मुखभंग करुन त्यांना तुम्ही आमच्या मर्जीशिवाय लाचार आहात ही संस्कृती भाजपा नेतृत्वाने स्थापीन्याचा जणु विडा उचलला आहे, काँग्रेसचे उदात्तीकरण करीत नाही परंतू प्रणबदा सारख्या ज्येष्ठाला न्याय दिला त्यांनी. असो…. लिहुन सांगायचे तर बरेच काही आहे, परंतू बर्दापुरकर सरांनी थोडक्यात मिमांसा केलीच आहे. हा आगावूचा प्रपंच.
      तसे माधवसरांना एव्हडेच सांगावे वाटते की आडवानींनी घरातील कर्तबगार मुलालाच पुढे केले होते. परंतू त्याने त्यांनाच भंगारात काढले.

     • Madhav Bhokarikar ….
      श्री. रितेश शहाणे,
      आपण सर्व जण कोणत्याही राजकीय पक्षाच्या धोरणांत, निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप करू शकू असे नाही, अशी माझी प्रामाणिक समजूत आहे.
      निरपेक्षपणे पाहिले तर मा. आडवाणीं हे यासाठी निश्चितच योग्य आहेत यांत मला शंका नाही. मात्र राजकारणांत कोण योग्य आहे यापेक्षा सध्या सोयीचे काय आहे हे सर्वच पक्ष पहातात.
      दुसरा मुद्दा मा. आडवाणींनी अशा कोणाचेही नांव पुढे केले नाही की ज्यामुळे त्यांचे नांव मागे पडले.

     • Ritesh Shahane ….
      आडवानीजी गुडघ्याला बाशींग बांधुन बसले होते का ? किंवा अमक्याला महामहीम म्हणून स्विकारा असे म्हणतील अशी गोष्ट विचाराला सुद्धा पटते का ?
      ते स्वाभावीकच असायला पाहीजे होते. नाही दिले ना पद, तर का त्या वयोवृद्ध ज्येष्ठाची अवहेलना करीत आहात ?

     • Adv K G Bhosale ….
      गरज सरो वैद्य मरो

     • Madhav Bhokarikar….
      ही दुर्दैवी रीत आहे समाजाची !

     • Avinash Jahagirdar ….
      चला, या निमित्ताने मा. आडवाणीजींना प्रथमच एवढे मोठे समर्थनहीं मिळाले .
      राजकारणात कधीचा कधी प्रधान मागे घेउन व प्यादा पुढे करून डाल जिंकता येतो.

     • Rajiv Gokhale….
      Providence has yet again bestowed a chance of a lifetime to L. K. Advani to prove his merit & usefulness by reopenong Babri Mosque demolition case. Now it all depends upon Advaniji as to how he responds the challange! If he owns all the responsibility for the destruction of the age old Mosque built by barbarian invader Baber, in place of birthplace of Ram lalla, beloved inspiration to the Hindu resurgence & pride for thousands of years, then he is sure to be convicted by the secular judiciary of India, a giant country fragmented on the basis of supremacy of religious population, & sent to jail along with his compatriots
      . However, his jail term shall prove to be the rallying point for Hindu majority & Hindu consolidation shall pave way to great Hindu unrest, further fueling the already existing legitimate Hindu anger, forcing the judiciary to set free all the BJP leadership from the jail term unconditionally & honourably with all the charges removed. That moment shall ring bells for the inevitable end of secularism & muslim appeasement. It is worthwhile to note that this did happen once in 1939;when Adolf Hitler & his Nazy comrades took out a street march in protest of the socialist govt of the times in Munich & was fully put into jail under the clause of anti national activity. However the judiciary was forced to release him & all his Nazy party workers unconditionally within six months of his jail term. In ensuing general elections to the German Reich, Hitler got elected with thumping majority. History repeats yet again & duly complements the risk taker.

     • Ritesh Shahane….
      It’s not that, this is far worst than nazy’s. A person, who gave you birth as a hindu nationalist is suffuring. has got wound’a & humalitation from you, it’s pain fulll.
      all i can say that give respect to elders
      Aadwani is not my idole but yet I followe my great Indian tradition.

     • Shrinivas Kulkarni ….
      गाॅधी…मो. अली जिन्ना…आणि मोदी हे तिघे ही गुजरातचे आहेत…..!!!

     • Madhav Bhokarikar….
      हो ! गुजरात भारतातील एक राज्य आहे.

     • Avinash Jahagirdar ….
      जी व्यक्ति सुटी न घेता 18 18 तास करते, यद्किंचितही स्वार्थ नाही, केवळ राष्ट्र प्रथम हे धोरण ठेवून काम करते देशाला सर्वोच्च स्थानी घेवून जाण्यासाठी तळमळीने काम करते, आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा सुधारण्यासाठी आपल्या सर्व क्षमतांसह आहोरात्र झटते, अशा व्यक्तिला अकारण टार्गेट करणे कितपत योग्य आहे. आडवाणींना डावलण्यात स्वार्थ वा अन्य वाईट हेतू असेल अशी कल्पना तरी कशी केली जावू शकते?

     • Adv K G Bhosale ….
      हेतु सपष्ट आहे अंधभक्त समजून .घेऊ शकत नाही

 • Anand Vijapur ….
  शोकांतिकेचा महानायक … सत्यच

 • Rajendra Punse · ….
  मरेपर्यंत राजकारण केलेच पाहिजे का ? जे मिळाल त्यात समाधान मानल पाहिजे . महाराष्ट्राला एवढा तरुण मुख्यमंत्री भेटला तरी शरदरावांचे राजकारण सुरूच….

  • Yashavant Harne ….
   Shared pawar is doing politics on his own power therefore nobody has right to make this type of statement.

 • Sharad Deshpande ….
  पोस्ट आवडली.

 • Ajinkya D Yeul ….
  modi×

 • Hemlata Pandey Lohave….
  nice post

 • rakash Paranjape….
  समर्पक विश्लेषण

 • Bala Sawant….
  राजकारणात बस झाले म्हणायचे नसते का?

 • Pradeep S. Hirurkar ….
  सर, राजकाण काहीही असो मात्र याविषयीची हळहळ चोहिकडे दिसुन येते.

 • Pramod Lende Khairgaokar ….
  राजकीय खेळातील महाशोकांतिका ,उत्तम शीर्षक … अचूक वेध

 • Er Manoj Madgulkar….
  Good

 • Sutar Subhash ….
  इतर समाजाला ( हिंसक) दुखवायचा, कसला संघर्ष हो, सर मला नाही वाटत की, त्यांच्यावर अन्याय झाला. कर्म तसे फळ

 • Avinash Jahagirdar ….
  मा आडवाणी यांचे वय 90 वर्षे आहे. कांही दिवसांपूर्वी ते एका विषयावरील चर्चेत भाग घेवून बोलायला उभे राहिले व इतके भरकटले की सर्वपक्षीय शुद्धा अस्वस्थ झाले व त्यांच्या कानात कांही सांगून त्यांना बसवावे लागले. वयाच्या, प्कतृतिच्या कांही मर्यादा असतात. विस्मरणा सारख्या समस्या असतात. सगळ्या गोष्टी जाहीर पण चर्चिल्या जावू शकत नाहीत.

 • dattaatray

  अडवाणींबद्दल लोकांच्या मनात आदर, प्रेम आहे, अनेकांना वाटत होते त्यांना राष्ट्रपतीपदाची संधी मिळावी आणि मोदींनी ती द्यावी अन् उपकारातून उतराई व्हावे, पण, राजकारणात असे काही असत नाही..हेच प्रकर्षाने समोर आले…राजकारण नाती-गोती आणि अपकार-उपकाराच्या पुढे आहे हेच पुन्हा टळकपणे दिसून आले…

 • Ram Bedre….
  great sir..!!!

 • Hansraj Raut….
  sir khoop chan

 • Sameer Gaikwad

  विचार करण्यास भाग पाडणारं नेमक्या निष्कर्षाचं लेखन… गतकाळाची फिल्म पाहिल्यासारखे वाटलं…

 • Sunil Badurkar….
  समोर दिसणाऱ्या आणि सगळ्यांनी पाहिलेल्या दृश्याची माहिती. घडामोडीकडे कौतुकाने आंनदाने पाहताना मनात अनेक गोष्टी साहजिक नोंदवल्या जातात. त्यावरून चित्र रंगवले जाते. हा मानसिक व्यवहार प्रत्येकाच्या लेखनाच्या बाबतीत घडतो. त्यात गैर काहीही नाही. सदर लेखकाने माहिती आणि क्रम बरोबर सादर केला आहे. पण अन्वयार्थ आणि विश्लेषण यामध्ये जागा सोडल्या आहेत. देशाला मूळ प्रवाहापासून अराजकी महा रस्त्यावर आणून ठेवण्यासाठी दीर्घकालीन असे जे धोरण संघाने ठरवलेले होते आणि आहे त्यातील एक महत्वाच्या काळातील महत्वाची जबाबदारी संघाने दिली म्हणून आणि निष्ठावान पाईक म्हणून लालकृष्ण आडवाणी यांनी अत्यन्त प्रेमाने आनंदाने पार पाडलेली आहे. ज्याप्रमाणे राहुल द्रविड खेळायला आल्यावर त्याच्यावर स्वतःची विकेट वाचवणे सोबतच संघाची इज्जत वाचवणे अशी जबादारी आलेली असते अगदी तसेच बाजपेयी आडवाणी यांच्या भूमिका होत्या . प्रथमच सत्तेवर आल्यावर सर्व धोरणे मुळातून बदलता येत नसतात. पण त्यासाठी वाटा तयार कराव्या लागतात. धर्मनिरपेक्ष बाबतीत बॅरिस्टर जीना यांना दिलेले प्रशस्तीपत्र अत्यन्त गंभीर राजकीय खेळ आहे. . स्युडो सेक्युलॅरिझम ही संकल्पनाच त्यांनी रुजवली त्यासाठी बॅरिस्टर जिना यांना हुकुमानुसार प्रशस्तीपत्र दिले. धर्माच्या आधारावर राष्ट्र उभा करणे हे चूक आहे असे कधीही आडवाणी म्हणाले नाहीत आणि आजन्म ते तसेच राहतील. जनता पक्षाचा दारुण पराभव झाल्यावर पुढील दहा वर्ष गोंधळात जाणारच होते. त्या काळातील जागतिक आणि देशीय राजकारणाचा संदर्भ अजिबात न घेता , आणि ज्याला इंदिरा गांधी परकीय शक्ती म्हणत असत त्याचा विचार न करता संघाचे राजकारण समजणे कळणे आणि मेनी करणे अवघड आहे. खरे तर पत्रकार म्हणून प्रवीण बर्दापूरकर यांनी स्वतंत्र राजकीय पुस्तक लिहिणे आवश्यक आहे फक्त ब्लॉगवर समाधान मानू नये.

  • तुमची प्रतिक्रिया आवडली आणि त्यातल्या बह्तांश प्रतिपादनाशी मी सहमत आहे .
   मुळात हा अतिशय मोठा कॅनव्हास आहे ; अडवाणी हाही मोठ्या लेखनाचा विषय आहे .
   मनात बरंच काही आहे .
   बह्यू यात कधी उतरतं ते लेखनात !

 • Shashikant Pathak ·….
  You are right but one thing is here to note that Shri Advaniji had done a big mistake that he was appreciate mr jinha

 • Kishor Katti ….
  Very nice article.
  Some things happened were out of Advani’s control but for some he was responsible.

 • Balaji Sutar ….
  अतिशय नेमके विश्लेषण आणि विवेचनही. (y) ‘लालकृष्ण अडवाणी’ ही भारतीय राजकारणातली (जवळजवळ महाभारताच्या जवळ जाणारी) महाशोकांतिका आहे. आणि ती अडवाणींनी स्वत: ओढवून घेतलेली आहे. पाऊणशे वर्षांची प्रदीर्घ राजकीय कारकीर्द आणि अनुभव असूनही या शोकांतिकेचा अंदाज बांधता आला नाही, तिला बगलही देता आली, ही गोष्ट कदाचित अडवाणींना आता अधिक जिव्हारी लागत असेल. दोन वर्षांपूर्वी स्वत:हून राजकारणातून निवृत्ती घोषित करून अडवाणींनी स्वत:ला काही वेगळ्या राजकारणबाह्य कार्यात गुंतवून घेतलं असतं तर कदाचित आज त्यांचं मोल अधिक राहिलं असतं.

  • DrAnant Pandhare ….
   संपुर्ण लिखाणातून फक्त तुमचा अभिप्राय योग्य व चपखल… पण मोह तो मोहच… तो होतोच…!

 • Ashok Patil ·….
  अप्रतीम लिखाण!

 • Vasu Bharadwaj ….
  अहो सर, असं आपल्याला वाटते. त्यांना तसे वाटत असते की नाही कुणास ठाउक?

 • Sagar Suryawanshi ….
  ग्रेट सरजी 👌👍

 • Sanju Deo ·….
  Praveen Bardapurkar ,
  I feel your comments on FB are immature…..
  You have not understood the “Parivar” thinking…..
  Parivar has thought and done only good for every member of Parivar…..
  LikeShow more reactions · Reply · 18 hrs · Edited

 • Vinayak Bhalerao ·….
  खुप सुंदर

 • Anil Jadhav Rao ….
  खुप च छान.

 • Surendra Deshpande ….
  It was misrake of bjp not to give last year of nda to adwani as pm mr narwarlal mahajan as expected another term for nda and proved wrong

 • Gopal More ·….
  भाजप ( मोदी आणि शहा) नी अडवानीवर अन्याय केलेला आहे. याला देश साक्षी आहे.

 • Sachin Borse ….
  वय जास्त झाल्या कारणांमुळे आणी आधुनिक राजाकारणाची दिशा न समजल्याने हहि दशा झाली

 • Prashant Jambhule ….
  अतिशय छान विवेचन सर ..

 • Raj Kulkarni ….
  आडवाणी आणि वाजपेयी हे भाजपाचे प्रमुख स्तंभ असले तरी त्यांच्यावर स्वातंत्र्योत्तर काळातील गांधीवादी-नेहरूवादी राजकारणाचा प्रभाव कायम होता. आणीबाणीनंतर जेंव्हा जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले, त्याच वाजपेयी परराष्ट्र मंत्री होते. सत्ताबदलामुळे परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयातील नेहरूंची प्रतिमा कोणीतरी काढली होती, तर ती त्यांना पुन्हा बसविण्याचे आदेश दिले होते. आडवाणींनी सुद्धा 2004 च्या निवडणूक जाहीरनामा प्रकाशनाच्या सोहळ्यात गांधी,
  पटेल आणि नेहरूंचा फोटो व्यासपीठावर होता. आत्ताची कॉग्रेस सोनिया कॉग्रेस आहे, मुळ कॉग्रेसचा वारसा आमच्याकडे आहे, अशी त्यांची मांडणी होती. आडवाणी, वाजपेयी यांचे व्यक्तीगत जीवन फार धार्मिक असे नव्हते. परंतु मोदी मात्र गांधी नेहरूंचा तिरस्कार करणारे निघाले, जी संघाची मुख्य बैठक आहे. वाजपेयींच्या काळातही बीजेपीचेच सरकार होते आणि वाजपेयींची पार्श्वभुमी संघाचीच होती पण म्हणून कोणी लेखकांनी पुरस्कार वापसी करणे, असे प्रकार झाले नाहीत. वाजपेयींवर टिका केली म्हणून भाजपा समर्थक विरोधकांना देशद्रोही म्हणाले नाहीत की कोणी पाकीस्तानला पाठविण्याची भाषा केली नाही. आडवाणी आणि वाजपेयी यांच्या चिंतनशील युगाचा भाजपामधील अस्त अतिशय चिंताजनक आहे. म्हणूनच अनेकांना जास्त काळजी वाटते आणि म्हणून मोदींवर जास्त टिका होते. जवाबदारीचं भान नावाचा प्रकारच मोदींकडे नाही. नेहरूबद्दल तिरस्कार आणि द्वेष तर एवढा की नेहरू पटेलांच्या अंत्यविधीला हजर असताना, त्यांनी टांग मारली असा धादांत खोटा आरोप त्यांनी केला होता. या एवढ्या एकच प्रसंगातून त्यांच्या राजकारणातील विरोधाची पातळी समजून येते. अंत्यविधीतील उपस्थिती वा अनुपस्थिती मध्येही ज्यास राजकारण दिसते, तो व्यक्ती काय विचाराचा असेल याची कल्पनाही न केलेली बरी!
  आपण खूप सुंदर मांडणी आणि विश्लेषन केले आहे. ज्यामुळे कांही जुन्या गृहतिकांना पुष्टी मिळाली आणि कांही मुद्दे अधिक सुस्पष्ट झाले.

  • Madhav Kusekar · ….
   Perfect!

   • Kailash Nikumbh ….
    हे अगदी तंतोतंत बरोबर आहे👌

    • Anil Shende ….
     modi fobic likhanacha ha ek namuna aahe….

     • विजय तरवडे ….
      आडवाणी आणि वाजपेयी यांच्या चिंतनशील युगाचा भाजपामधील अस्त अतिशय चिंताजनक आहे. >>> 🙁

     • Rajesh Kulkarni ….
      येथे मुद्दा अडवाणींचा असताना राज कुलकर्णींनी मोदींबद्दलची आपली भडास येथे काढलेली दिसते. मोदी हे नेहरूद्वेषी आहेत की या देशात नेहरूंशिवाय इतरही झालेले आहेत हे सांगणारे आहेत? पटेलांच्या अंतयात्रेच्यासंबंधीचा मोदींनी दिलेला तपशील जरूर चुकीचा असेल मात्र त्याचा नेहरूद्वेषाच्या संदर्भात उल्लेख करण्यामागचा त्यांचा खोडसाळ हेतु लपत नाही. याच मोदींनी देशाचे नेत्ृत्व केलेल्या सर्वांनीच देशासाठी आपापले योगदान केलेले आहे हे अनेकदा सांगितलेले आहे. तरीही राज कुलकर्णींना त्यांचा नेहरूद्वेषच दिसतो. यामागे त्यांची नेहरूभक्ती दिसते.

      राज कुलकर्णींचा मोदीद्वेष यापूर्वीही अनेकदा दिसला अाहे. मोदी शिवाजीराजांच्या स्मारकाचे उद्घाटन करण्यास मोदी मुंबईत आले होते, तेव्हा सुरतस्वारीच्यावेळी तेथील काही गुजराती व्यापार्‍यांनी महाराजांना विरोध केला होता हे या महाशयांना आठवले होते. यावरून मोदी गुजराती असण्याचा दिवटा संबंध त्यांनी लावला होता. त्यांच्या स्वत:च्या मनातील मोदीद्वेष लपून राहतो का? तेव्हा अशा द्वेष्ट्या व्यक्तीकडून दुसरी करलीच अपेक्षा नाही.
      ज्या पक्षाने आपल्याच पक्षाच्या सरकारचे पंतप्रधानपद भुषवलेल्या नरसिंहरावांचा म्ृतदेहही पक्षाच्या मुख्य कार्यालयात आणू दिला नाही, इतकी नेहरू-गांधी घराण्याची भाटगिरी ज्या पक्षात चालते, त्या पक्षाचे पाईक असलेल्यांनी मोदींबद्दल बोलावे हा मोठाच विनोद आहे.
      राज कुलकर्णी निवडणुकीच्यावेळी अडवाणींनी गांधी-पटेल-नेहरूंचा फोटो वापरल्याचे म्हटले आहे. तेव्हा हे फेसबुकवर असते तर ‘पहा अडवाणींचा दांभिकपणा’ असे म्हणायल‍ाही त्यांनी कमी केले नसते. तेव्हा अडवाणींच्या निमित्ताने यांना आपला मोदीद्वेष झाडायची संधी मिळाली एवढेच काय ते!

     • Rajendra Bandgar ….
      1) अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांच्या नावाने गळा काढून काही फायदा आहे का, 2019 ला बीजेपी ची सत्ता कशी जाईल आणि सत्तेवर काँग्रेस कशी बसेल हे महत्वाचे नाही का…..???
      2) जस काँग्रेस नेहरूंना अजून हि 55 ते 60 वर्षानंतर उदोउदो करत आहे तसेच बीजेपी ने हि करावे का आणि का करावं तसे…….???
      ३) नेहरूनीं (आणि जे त्यावेळच्या सगळ्या नेत्यांनी) त्यांचे कर्तव्य पार पडले नाही का????
      आणि जर तसे असेल तर त्या कृतत्वाची परत फेड म्हणून जनतेने इतर नेत्यांच्या तुलनेत नेहरू गांधी कुटुंबाला सगळ्या जास्त म्हणजे तिसऱ्या पिडी पर्यंत सत्ता दिली आहे हे आता पुरे नाही का…???
      4) आणि आता पंडित नेहरुच कशासाठी लागत आहेत मोदींशी तुलना करायला, त्यानंतरचे पंतप्रधानांनाचे काही कर्तृत्व नाही च का..???

 • Vivek Khose ….
  परिपूर्ण

 • Siddheshwar Mane ·….
  प्रविणजी छान विश्लेषण पण राष्ट्रपती पदाचा उमेदवार न करायची कारणे आपण सांगीतला नाहीत

 • Ratnakar A. Mahajan ….
  ‘मळमळ’ बाहेर काढली ते बरे झाले !

 • Pallavi Dalvi ·….
  अप्रतिम

 • Mangesh Paturkar….
  सध्या वातावरण खुप खराब आहे,बऱ्याच लोकांना मळमळ होत आहे,मळमळ झाली की वानती होते,तब्यतेची काळजी घ्यायला पाहिजे.

 • Rajendra Bandgar ·,,,,
  1) अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांच्या नावाने गळा काढून काही फायदा आहे का, 2019 ला बीजेपी ची सत्ता कशी जाईल आणि सत्तेवर काँग्रेस कशी बसेल हे महत्वाचे नाही का…..???
  2) जस काँग्रेस नेहरूंना अजून हि 55 ते 60 वर्षानंतर उदोउदो करत आहे तसेच बीजेपी ने हि करावे का आणि का करावं तसे…….???
  ३) नेहरूनीं (आणि जे त्यावेळच्या सगळ्या नेत्यांनी) त्यांचे कर्तव्य पार पडले नाही का????
  आणि जर तसे असेल तर त्या कृतत्वाची परत फेड म्हणून जनतेने इतर नेत्यांच्या तुलनेत नेहरू गांधी कुटुंबाला सगळ्या जास्त म्हणजे तिसऱ्या पिडी पर्यंत सत्ता दिली आहे हे आता पुरे नाही का…???
  4) आणि आता पंडित नेहरुच कशासाठी लागत आहेत मोदींशी तुलना करायला, त्यानंतरचे पंतप्रधानांनाचे काही कर्तृत्व नाही च का..???

 • Sandesh Kadam

  २००२ मध्ये भाजपच्या गोवा अधिवेशनात व्हेटो वापरून जी चूक केली त्याची फळे आहेत.

 • Ravindra Munde…
  वाजपेयी आडवाणी नंतर भाजप मधल शहानपण नाहीस झालं..

  • Surendra Deshpande….
   जर तस असेल तर ते repeat व्हायला हवे होते पण तस नाही they both can not prove themselves to indian voters

 • Narendra Deshpande ·….
  Bardapurkar AaplyaAkleche Tare Todu Naka Aapn Kunachihi NaukariEmane Itbare keli nahi jikde Paisa v post milali tya thikani lal zelat basle

  • Sharad Deshpande
   ‘नॉर्मल देशपांडे इज इम्पॉसिबल’ पण प्रवीण-जी अपवादाने नियम सिद्ध होतो असे शास्त्रवचन आहे. त्यामुळे अपवाद शोधताना असा अपवाद म्हणजे मी हे तुम्हाला आढळून येइल

  • बहुसंख्य देशपांडेंबाबत ‘नॉर्मल देशपांडे इज इम्पॉसिबल’ ही म्हण खरी आहे , याचा पुन्हा अनुभव आला ! अर्थात याला सन्माननीय अपवाद असणारे काही देशपांडे आहेतच ; हे मला चांगलं ठाऊक आहे , त्यातले अनेक माझ्या परिचयाचे आणि आणि काही तर जीवश्चकंठश्च दोस्त आहेत .

 • ‘नॉर्मल देशपांडे इज इम्पॉसिबल’ ही म्हण खरी आहे , याचा पुन्हा अनुभव आला !

 • Mugdha Karnik….
  काय नेमका आलेख मांडलास, वाः.

 • Ashok Sahu ””
  Advani has killed at least 20 MP seats in a bid to block Modi. How can he expects nomination. In politics only one move decides future course, unless you are protected by dynastic politics

 • Mahesh Gujarpatil ….
  गरज सरो अडवाणी… नवि भाजपाची म्हण

  • Surendra Deshpande ….
   In bjp there is no person by every election leader changed no family business

 • Pramod M. Parate लालकृष्ण अडवाणीच स्वतः च्या महाशोकांतिकेला जबाबदार आहेत. राजधर्माचे पालन न केल्याबद्दल अटल बिहारी वाजपेई जेव्हा मोदींना गुजरात च्या मुख्यमंत्री पदावरून हाकलण्याचा प्रस्ताव करित होते तेव्हा अडवाणींनी त्याला विरोध केला होता.
  जर त्यावेली मोदी मुख्यमंत्री पदावरुन बरखास्त झाले असते तर आज अडवाणींनी भारताचे प्रधानमंत्री असते व नरेंद्र मोदी चहा विकत बसले असते.
  प्रभु रामचंद्रांनी अडवाणींना ना प्रधानमंत्री बनु दिले, ना राष्ट्रपती बनु दिले.
  स्वतः च्या स्वार्था साठी देवाच्या नावाने कोणीही हिंसाचार करू नये व समाजात दुही माजवू नये हेच प्रभु रामचंद्रांना कदाचित सुचवायचे असेल.