नाथाभाऊंच्या असंतुष्ट भारुडाची सांगता !
हा मजकूर प्रकाशित होईल ; तेव्हा भाजपाचे एक ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी (महा)राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला असेल . या पक्षांतरानं गेले जवळजवळ पावणेतीन वर्ष एकनाथ खडसे यांच्या मनात खदखदणार्या असंतोषाच्या भारुडाची सांगता झाली आहे . खरं तर , या सांगतेला तसा उशीरच झाला आहे . मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्यावर …