शिकणारे विद्यार्थी आणि शिकवणारे शिक्षक कुठे गेले ?

( मराठवाडा मुक्ती दिनाच्या कार्यक्रमात डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रस्तुत लेखकाने ‘मराठवाडा इथं कमी पडतो’ या विषयावर दिलेल्या व्याख्यानाचा संपादित अंश- ) ज्या विद्यापीठात आपण शिकलो , वावरलो त्याच विद्यापीठात प्रमुख पाहुणा म्हणून येणं हा मला फार मोठा सन्मान वाटतो . इथं येतांना मला आनंद झालेला आहे आणि …

गणेशोत्सव : कांही ( अधार्मिक ) नोंदी 

या आठवड्यात गणेशोत्सव सुरु असल्यानं बदल म्हणून अ-राजकीय ,आत्मपर आणि काहीसं गतकातर आठवणींना उजाळा देणारं ( Nostalgic ) लिहितो आहे . ||एक|| ५३/५४ त्रेपन्न वर्षांपूर्वी , वयाच्या बारा-तेरा वर्षांचा असतांना मी अतिधार्मिक होतो . तसंही , घरात जे कांही चाललेलं असतं तेच मनावर बिंबत असण्याचं ते वय असतं . त्यानुसार …

फडणवीस आणि ठाकरे विरुद्ध पवार !

( महत्वाची सूचना-  श्रीरामपूर येथील पत्रकार परिषदेत प्रकाश वृत्त वाहिनीच्या हरिष दिघोटे या पत्रकाराच्या प्रश्नावर ज्येष्ठतम नेते शरद पवार यांनी चिडचिड करण्याआधी हा मजकूर लिहिलेला आहे . )   भाजप , शिवसेना , कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या यात्रा आणि पक्ष सोडण्याच्या नावाखाली पळापळीचा उठ(व)लेला बाजार लक्षात घेता गणेशोत्सव संपला की महाराष्ट्र विधानसभेच्या …

चिदंबरमनी गमावलं अन राज ठाकरेंनी कमावलं !

प्रशासनावर घट्ट पकड आणि कामाचा चांगला उरक असलेले कॉंग्रेसचे नेते एम . चिदंबरम यांच्याविषयी माझ्या मनात एक सूक्ष्मशी अढी आहे , हे आधीच नमूद करतो . त्याला कारण आहेत आपले आर. आर. उपाख्य आबा पाटील . ही घटना घडली तेव्हा चिदंबरम केंद्रात आणि आर. आर. पाटील राज्यात गृहमंत्री होते . …

एका मध्यमवर्गीय पिढीची आयडॉल

यावर्षी औरंगाबादचा श्रावण चार-साडेचार दशकांपूर्वीच्या श्रावणाशी नाळ जोडणारा आहे . मोठी नसली तरी एखादी मध्यम सर ,अन्यथा सतत लयबद्ध टपटप पहिल्या आठवड्यात सूर्याच्या गैरहजेरीत अनुभवायला मिळाली . अशा वेळी ‘पाऊस कधीचा पडतो , झाडांची हलती पाने’ या ओळी हमखास आठवतात आणि लगेच ‘मेघ रडू द्यावा डोळी , सांज हांकारावी थोडी’, …

सुहास्य वदनी सुषमा स्वराज !

नागपुरात पत्रकारिता करायला मिळाल्यानं अनेक पक्षांच्या  मोठ्या राजकीय नेत्यांना  , लेखक , विचारवंताना सहजगत्या पाहता आलं ; त्यांच्याशी संवाद  साधता आला . आचार्य विनोबा भावे हयात असेपर्यंत कॉंग्रेसचे अनेक नेते पवनारला जाण्यासाठी नागपूरला कायम पायधूळ झाडत असत . सेवाग्राम आश्रमामुळे सर्वोदय आणि गांधीवाद्यांची कायम उठ-बस असे . दीक्षाभूमीमुळे रिपब्लिकन राजकारण …

‘बलवंत’ची शताब्दी , पुस्तकं , सांस्कृतिक भान वगैरे…

( बलवंत वाचनालयाची माझ्या मनातली ‘ती’ वास्तू . छायाचित्र सौजन्य- आशा कोरान्ने )    ||१|| बलवंत वाचनालय ९९ वर्ष पूर्ण करुन १००व्या वर्षात पदार्पण करणार , ही बातमी वाचली आणि वयाचे किती उन्हाळे पावसाळे उलटून गेले ते जाणवलं , कारण बलवंत वाचनालयाशी असलेली नाळ माझ्या बाल आणि तरुण वयातली आहे . …

…ओन्ली शरद पवार !

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने येत्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची जय्यत तयारी केलेली असतांना  शरद पवार यांचा अपवाद वगळता इकडे विरोधी पक्ष मात्र लोकसभा निवडणुकीच्या पराभवातून सावरल्याचे चित्र नाही. प्रकृती ठीक नसतांना आणि याही वयात शरद यांच्यात राजकारण करण्याची असणारी उर्मी व सतत भटकंती करण्याची त्यांच्यात असणारी उर्जा विस्मयचकीत करणारी …

‘सत्तातुराणां न भयं , न लज्जा’

( गोवा विधानसभेतील विरोधी पक्ष नेत्यांसह भाजपत प्रवेश केलेले कॉंग्रेसचे अन्य विधानसभा सदस्य , भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह वरील छायाचित्रात  )    सध्या कर्नाटकात सुरू असलेला राजकीय तमाशा आणि  गोव्यात जे सत्तांतर झाले त्याचे वर्णन करण्यासाठी ‘सत्तातुराणां न भयं , न लज्जा’ याशिवाय दुसरे कोणते चपखल शब्द असूच …

प्रशासनाला समजते ‘हंटर’चीच भाषा !

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र , विद्यमान आमदार नीतेश राणे यांनी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबद्दल दोषी धरून राज्य प्रशासनातील एका उपअभियंत्यावर चिखल टाकल्यानं सध्या बराच स्वाभाविक गदारोळ उठला आहे . नीतेश राणे यांच्या चिखल टाकण्याच्या या कृत्याचं किंवा मारहाणीचं समर्थन नाही . एकुणातच , राणे कुटुंबाच्या दहशतीला पाठिंबा तर मुळीच …