साहित्यातली हुल्लडबाजी !
यवतमाळच्या ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अरुणा ढेरे यांची बिनविरोध निवड झाल्यावर दहाएक दिवसांनंतरची घटना आहे- नागपूरच्या शुभदा फडणवीस आणि स्वाती खंडकर आमच्याकडे आल्या होत्या . शुभदा म्हणाली, ‘अरुणाताई अध्यक्ष झाल्यानं यंदा तरी संमेलनात कोणतेच वाद निर्माण होणार नाहीत‘. ‘समाज माध्यमांवर ज्या प्रतिक्रिया उमटत आहेत त्या जर ‘बिटविन द लाईन’ वाचल्या …