कर्कश्श, टोकाचे एकारलेले राजकारण !
‘मेरी मुर्गी की एकही टांग’ अशी एक म्हण लहानपणी मराठवाड्यात अनेकदा ऐकायला मिळायची, या म्हणीचा अर्थ ‘माझंच म्हणणं खरं आणि त्यासाठी कितीही एकारली भूमिका घेण्याची वृत्ती’ असा होता. याच वृत्तीची लागण आपल्या देशाच्या पुरोगामी-प्रतिगामी, डाव्या-उजव्या, सरळ-वाकड्या अशा वेगवेगळ्या राजकीय वाटांवर चालणाऱ्या बहुसंख्याना झालेली आहे, किंबहुना आपल्या देशातील राजकारणाचे ते एक …