माझ्याकडे सांगण्यासारखं खूप आहे …

छायाचित्रात प्रकाशित पुस्तकांच्या स्वाक्षरांकित प्रती मंगलाच्या स्वाधीन करतांना डावीकडून मा. नानासाहेब चपळगावकर , मा. महेश एलकुंचवार आणि मा. डॉ. सुधीर रसाळ . छायाचित्रात सायलीही दिसत आहे . ( पुनर्लेखन केलेल्या माझ्या ‘डायरी’ , ‘क्लोज-अप’ आणि संपादित ‘माध्यमातील ती’ या तीन पुस्तकांचा प्रकाशन समारंभ ज्येष्ठतम समीक्षक डॉ. सुधीर रसाळ तसंच प्रख्यात नाटककार महेश एलकुंचवार , सेवानिवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर …

दुगाण्यांचं राजकारण ! 

सत्तेत असतांना आणि नसतांना , कसं आणि किती , बेताल आणि बेजबाबदार वागायचं याचे कांही विधीनिषेधशून्य अलिखित मापदंड आपल्या देशातील सर्वच राजकीय पक्षांनी अलीकडच्या कांही वर्षात आखून घेतलेले आहेत . त्यामुळे लोकशाहीचं गांभीर्य व पावित्र्य मलिन होत आहे याची जाणीव हे सर्व राजकीय पक्ष विसरले आहेत . जाहीर झालेल्या केंद्रीय …

वेतनवाढीची खंडणी आणि बळीराजाची मातीमोल जिंदगी… 

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे वेतनवाढ जारी होण्याआधी ; वर्षाकाठी राज्य सरकारच्या तिजोरीतले तब्बल १ लाख २ हजार ६६८ कोटी रुपये नोकरीत असलेल्या बाबूंच्या वेतनावर तर २७ हजार ३७८ कोटी रुपये सेवानिवृत्तीवेतनावर खर्च होत आहेत . त्यात आता आणखी सुमारे २६ हजार कोटी रुपयांची भर पडणार आहे म्हणजे बहुसंख्येनं बेपर्वा , …

साहित्यातली हुल्लडबाजी !

यवतमाळच्या ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अरुणा ढेरे यांची बिनविरोध निवड झाल्यावर दहाएक दिवसांनंतरची घटना आहे- नागपूरच्या शुभदा फडणवीस आणि स्वाती खंडकर आमच्याकडे आल्या होत्या . शुभदा म्हणाली, ‘अरुणाताई अध्यक्ष झाल्यानं यंदा तरी संमेलनात कोणतेच वाद निर्माण होणार नाहीत‘.   ‘समाज माध्यमांवर ज्या प्रतिक्रिया उमटत आहेत त्या जर ‘बिटविन द लाईन’ वाचल्या …

आमचे प्रिय ‘सर’ महेश एलकुंचवार !

आमचे प्रिय ‘सर’ आणि प्रतिभावंत नाटककार , लेखक महेश एलकुंचवार यांना राज्य सरकारचा विंदा करंदीकर जीवन गौरव सन्मान जाहीर झालाय . त्यानिमित्त- ( प्रोफाइल छायाचित्र- विवेक रानडे / /या छायाचित्राचे  सर्वाधिकार  विवेक रानडे यांच्याकडे राखीव आहेत ) ||१|| १९७० ते ८० चा तो काळ देशात आणि वैयक्तिक आयुष्यात विलक्षण घडामोडीचा …

चिपळूणचे दिवस 

     चिपळूणचे दिवस काही लख्ख , काही अंधुक आठवतात तर बरेच आता विस्मरणात गेले आहेत . ते सहाजिकही आहे कारण आता म्हणजे , २०१८च्या डिसेंबर महिन्यात ते दिवस उलटून गेल्याला चार दशकं होताहेत . चिपळूणचे दिवस म्हणजे नानासाहेब उपाख्य निशिकांत जोशी आणि दैनिक ‘सागर’शी जोडला गेलेला संस्कार आहे , तिथे …

बातमी वाघोबाची !

  पांच राज्यांच्या निवडणुका संपल्या , सर्वत्र चर्चा झडल्या , विश्लेषणं लिहून/बोलून झाली , आडाखे बांधून झाले , भविष्यवाण्या वर्तवून झाल्या…अतिकंटाळा यावा इतकं हे सर्व अजीर्णाचं होतं ! लक्षात आलं , सध्या देशातले वाघोबा माध्यमांत गाजताहेत ; ( टी-१ उपाख्य अवनीला ‘कॉल हिम डॉग अँड किल’ असं क्रूरपणे मारुन टाकलं …

निवडणूक निकाल : कांही निरीक्षणं

||१|| ‘काँग्रेसमुक्त भारत’ ही केवळ वल्गना आहे , भारतातून काँग्रेसचं उच्चाटन कधीच होणार नाही कारण सर्वधर्म समभाव हा विचार घेऊन या देशात वावर आणि विस्तार्‍लेल्या काँग्रेसनं देशातील सर्व जाती-उपजाती-पोटजाती , विविध भाषक , अनेक धर्म , परस्पर भिन्न संस्कृती यांची मोट या देशात सर्वात आधी बांधली , काँग्रेस नेत्यांनी स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलं , स्वातंत्र्यानंतरही इंदिराजी आणि राजीव गांधी यांनी देशासाठी प्राणाहुती …

वसंतदादा – उपेक्षित , सुसंस्कृत नेतृत्व

पत्रकारितेतील माझे समकालीन व मित्र दशरथ पारेकर यांच्या पुस्तकाला ज्येष्ठ संपादक व मित्रवर्य सदा डुंबरे यांनी लिहिलेली प्रस्तावना वाचनात आली आणि आठवलं माजी मुख्यमंत्री , सर्वार्थानं लोकनेते असलेल्या वसंतदादा पाटील यांचं जन्मशताब्दी वर्ष फारसा गाजावाजा न होता पार पडलंय ; त्याबद्दल खंतही वाटली . वसंतदादा पाटील यांचं स्मरण करत असतांना …

‘मि. तुकाराम मुंढे, अॅरोगन्स ऑफ ऑनेस्टी इज डेंजरस…’

नासिक महापालिकेचे आयुक्त असलेले तुकाराम मुंढे यांची बदली झाल्याबद्दल सरकारला दोष देणारे लोक आणि त्या सुरात सूर मिसळवणारी माध्यमे अज्ञानी आहेत ; त्यांना सरकार आणि नोकरशाही यातील फरक , त्यांच्या जबाबदार्‍या याचं कोणतंही आकलन नाही , असंच म्हणावं लागेल . इथे सरकार म्हणजे निवडून आलेले म्हणजे लोकप्रतिनिधी आणि नोकरशाही म्हणजे …