हे केवळ ‘देवेंद्र गेले , उद्धव आले’ नाही !
|| एक || शिवेसेनेनं अखेर भाजपशी काडीमोड घेतला आहे ; जे १९९९मध्ये घडायला पाहिजे होतं ते २०१९मध्ये घडतं आहे . तेव्हा ते घडलं नाही हा बाळासाहेब ठाकरे यांचा उमदेपणा होता आणि भाजपचं नेतृत्व अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या समंजस नेत्यांकडे होतं ; युती निभावण्याची जबाबदारी प्रमोद महाजन आणि गोपीनाथ …