देर लगी आने में तुमको…

विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख उलटल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा आणि एक निर्विवाद लोकप्रिय नेते राज ठाकरे यांचं प्रचाराच्या  रणधुमाळीत धुमधडाक्यात आगमन झालं आहे . पहिल्याच सभेपासून राज ठाकरे नावाची मुलुखमैदानी तोफ गरजू लागली आहे . माध्यमांत त्यांना चांगली प्रसिद्धी मिळू लागलेली आहे यात आश्चर्य ते कांहीच नाही …

पिसाटलेली पत्रकारिता !

माध्यमात आणि त्यातही विशेषत: इलेक्ट्रॉनिक्स  माध्यमात लाईव्ह प्रसारणाचं आलेलं फॅड म्हणजे कोणतंही तारतम्य नसलेली , पिसाटलेली आणि अक्षरश: उबग आणणारी पत्रकारिता आहे . अंमलबजावणी संचालनालयाच्या ( ED) न आलेल्या समन्सवरुन देशातील ज्येष्ठतम नेते शरद पवार यांनी जो राजकीय इव्हेंट उभा केला त्यात माध्यमे आणि त्यातही विशेषत: प्रकाश वृत्तवाहिन्या अलगद अडकल्यानं …

पवारांना अडचणीत आणणारा कॉम्रेड !

 || देशातील एक दिग्गज नेते शरद पवार यांना अंमलबजावणी संचालनालयाच्या ( ED) चौकशीच्या फेऱ्यात अडकवणारा माणूस एक कॉम्रेड आहे आणि ते लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील जेवरी या गावचे रहिवासी आहेत . कॉम्रेड माणिक जाधव हे त्यांचे नाव . माणिक जाधव हे समाजवादी , पुरोगामी विचाराचे . ते  जनता दलाच्या चिन्हावर  …

शिकणारे विद्यार्थी आणि शिकवणारे शिक्षक कुठे गेले ?

( मराठवाडा मुक्ती दिनाच्या कार्यक्रमात डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रस्तुत लेखकाने ‘मराठवाडा इथं कमी पडतो’ या विषयावर दिलेल्या व्याख्यानाचा संपादित अंश- ) ज्या विद्यापीठात आपण शिकलो , वावरलो त्याच विद्यापीठात प्रमुख पाहुणा म्हणून येणं हा मला फार मोठा सन्मान वाटतो . इथं येतांना मला आनंद झालेला आहे आणि …

गणेशोत्सव : कांही ( अधार्मिक ) नोंदी 

या आठवड्यात गणेशोत्सव सुरु असल्यानं बदल म्हणून अ-राजकीय ,आत्मपर आणि काहीसं गतकातर आठवणींना उजाळा देणारं ( Nostalgic ) लिहितो आहे . ||एक|| ५३/५४ त्रेपन्न वर्षांपूर्वी , वयाच्या बारा-तेरा वर्षांचा असतांना मी अतिधार्मिक होतो . तसंही , घरात जे कांही चाललेलं असतं तेच मनावर बिंबत असण्याचं ते वय असतं . त्यानुसार …

फडणवीस आणि ठाकरे विरुद्ध पवार !

( महत्वाची सूचना-  श्रीरामपूर येथील पत्रकार परिषदेत प्रकाश वृत्त वाहिनीच्या हरिष दिघोटे या पत्रकाराच्या प्रश्नावर ज्येष्ठतम नेते शरद पवार यांनी चिडचिड करण्याआधी हा मजकूर लिहिलेला आहे . )   भाजप , शिवसेना , कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या यात्रा आणि पक्ष सोडण्याच्या नावाखाली पळापळीचा उठ(व)लेला बाजार लक्षात घेता गणेशोत्सव संपला की महाराष्ट्र विधानसभेच्या …

चिदंबरमनी गमावलं अन राज ठाकरेंनी कमावलं !

प्रशासनावर घट्ट पकड आणि कामाचा चांगला उरक असलेले कॉंग्रेसचे नेते एम . चिदंबरम यांच्याविषयी माझ्या मनात एक सूक्ष्मशी अढी आहे , हे आधीच नमूद करतो . त्याला कारण आहेत आपले आर. आर. उपाख्य आबा पाटील . ही घटना घडली तेव्हा चिदंबरम केंद्रात आणि आर. आर. पाटील राज्यात गृहमंत्री होते . …

एका मध्यमवर्गीय पिढीची आयडॉल

यावर्षी औरंगाबादचा श्रावण चार-साडेचार दशकांपूर्वीच्या श्रावणाशी नाळ जोडणारा आहे . मोठी नसली तरी एखादी मध्यम सर ,अन्यथा सतत लयबद्ध टपटप पहिल्या आठवड्यात सूर्याच्या गैरहजेरीत अनुभवायला मिळाली . अशा वेळी ‘पाऊस कधीचा पडतो , झाडांची हलती पाने’ या ओळी हमखास आठवतात आणि लगेच ‘मेघ रडू द्यावा डोळी , सांज हांकारावी थोडी’, …

सुहास्य वदनी सुषमा स्वराज !

नागपुरात पत्रकारिता करायला मिळाल्यानं अनेक पक्षांच्या  मोठ्या राजकीय नेत्यांना  , लेखक , विचारवंताना सहजगत्या पाहता आलं ; त्यांच्याशी संवाद  साधता आला . आचार्य विनोबा भावे हयात असेपर्यंत कॉंग्रेसचे अनेक नेते पवनारला जाण्यासाठी नागपूरला कायम पायधूळ झाडत असत . सेवाग्राम आश्रमामुळे सर्वोदय आणि गांधीवाद्यांची कायम उठ-बस असे . दीक्षाभूमीमुळे रिपब्लिकन राजकारण …

‘बलवंत’ची शताब्दी , पुस्तकं , सांस्कृतिक भान वगैरे…

( बलवंत वाचनालयाची माझ्या मनातली ‘ती’ वास्तू . छायाचित्र सौजन्य- आशा कोरान्ने )    ||१|| बलवंत वाचनालय ९९ वर्ष पूर्ण करुन १००व्या वर्षात पदार्पण करणार , ही बातमी वाचली आणि वयाचे किती उन्हाळे पावसाळे उलटून गेले ते जाणवलं , कारण बलवंत वाचनालयाशी असलेली नाळ माझ्या बाल आणि तरुण वयातली आहे . …