‘फ्रॅक्चर्ड’ आकलन , शिवाय मनमानीही !

 नमनाला घडाभर तेल जाळायला हवं – पश्चिम बंगालात सुरु झालेल्या  नक्षलवादी चळवळीनं एकोणिसशे ऐंशीच्या दशकात महाराष्ट्राचे दरवाजे ठोठावले ते गडचिरोली , चंद्रपूर या अरण्य प्रदेशात . तेव्हा या चळवळीचं वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांत विदर्भातली  सुरेश द्वादशीवर , राजाभाऊ पोफळी , प्रकाश दुबे आणि अन्य कांही पत्रकार होते ; ही मंडळी तशी मला ज्येष्ठ पण त्यांच्यासोबत मीही एक होतो . आदिवासींना त्यांचे …

निवडणूक निकाल : थोडी खुशी , थोडा गम !

‘काँग्रेसच्या अपयशात भाजपचं यश आहे’ किंवा ‘अमुक तमुक  पक्षाचा सुपडा साफ  झाला’ वगैरे शब्दांत गुजरात , हिमाचल प्रदेशच्या विधानसभा आणि दिल्ली महापालिकेच्या निवडणुकांचे विश्लेषण करण्याच्या आजवरच्या प्रस्थापित भाबड्या राजकीय मानसिकतेतून बाहेर येत या निवडणुकांच्या निकालाकडे पाहायला हवं . कोणताही प्रस्थापित  राजकीय पक्ष कांही  निवडणुकीत संपत नाही , हे लक्षात घ्यायला …

शब्दांच्या भूमीत सकस लेखनाचं पीक काढणारा लेखक …

आमच्या पिढीनं काळ्यावर पांढरं करायला सुरुवात केली तोपर्यंत कवी आणि कथालेखक म्हणून नागनाथ कोत्तापल्ले यांचं नाव मराठी साहित्याच्या प्रांगणात चर्चेत आलेलं होतं . हा लेखक खूप समजून उमजून लिहितो , अनेकदा तर आपल्याला जे म्हणावसं वाटतं तसंच लिहितो , अशी जवळीक कोत्तापल्ले यांच्या लेखनाविषयी तेव्हाही वाटायची . तेव्हा ते बीडला प्राध्यापक होते आणि …

बंड…एक फसलेलं आणि एक अधांतरी !

■‘मीडिया वॉच’च्या २०२२च्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेला लेख ■ महाराष्ट्राच्या राजकारणातली बंड म्हणा की, फूट माझ्या पिढीच्या पत्रकारांना नवीन नाहीत. १९७७ साली मी पत्रकारितेत आलो आणि महाराष्ट्र काँग्रेसमधलं पहिलं बंड १९७८ साली शरद पवार यांनी घडवलं. १२ आमदारांसह बाहेर पडून शरद पवार यांनी महाराष्ट्रातलं सिंडिकेट काँग्रेस आणि इंडिकेट काँग्रेसचं वसंतदादा पाटील …

‘कोरोना’नुभव ..   

■‘उद्याचा मराठवाडा’च्या २०२२ च्या दिवाळी अंकातील  लेख / चित्र- शिवानंद सुरकुटवार ■ || १  || बेगम मंगलाचं निधन ६ मार्च २०२०ला झालं आणि लगेच कोरोना नावाच्या  महाप्रलयंकारी हिंस्र श्वापदानं जगावर हल्ला केला  . २०१६च्या साधारण जूनपासून बेगमची तब्येत ढासळायला सुरुवात झाली . आधी ती पाहता पाहता असाध्य कंपवाताचा ( पार्किसन्स ) …

राहुल गांधींच्या पदयात्रेच्या तरंगांच्या लाटा होतील का ?

शेकडोंची गळाभेट , हजारोंना सोबतीला घेत आणि लाखो लोकांचे लक्ष वेधून घेणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पदयात्रा उद्या , ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात प्रवेश करत आहे . १५० दिवस चालणारी ही पदयात्रा बारा राज्यातून जाणार आहे आणि ३५७० किलोमीटरचा प्रवास राहुल गांधी पायी करणार आहेत . ७ सप्टेंबरला सुरु झालेली …

■ मल्लिकार्जुन खरगे : सक्षम अध्यक्ष  की ताटाखालचं मांजर ?

एकीकडे राहुल गांधी यांची देशव्यापी पदयात्रा सुरु असतांनाच दुसरीकडे काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची लुटूपुटूची लढाई मल्लिकार्जुन खरगे यांनी अपेक्षेप्रमाणे जिंकली आहे . लुटूपुटूची लढाई म्हणण्याचं  कारण की , खरगे यांच्या उमेदवारीला गांधी कुटुंबियाचा अघोषित आणि पक्षांतंर्गत जी-२१ गटाचा जाहीर पाठिंबा होता .  अशा परिस्थितीत शशी थरुर यांची उमेदवारी नाममात्र आहे आणि त्यांचा पराभव …

‘अनटोल्ड’ मनोहर म्हैसाळकर

( छायाचित्र – विवेक रानडे ) कार्यकर्ता , संघटक आणि माणूस अशा दोन पातळ्यांवर मनोहर म्हैसाळकर जगत असत . या दोन्ही पातळ्यांवर त्यांच्या बऱ्यापैकी निकट जाण्याची किंबहुना त्यांच्या खास गोटातला एक होण्याची संधी मला मिळाली . वैयक्तिक पातळीवर माधवी आणि मनोहर म्हैसाळकरांची नागपुरातील जी लाडकी पण व्रात्य कार्टी म्हणून ओळखली …

लळा आणि छंदही शब्दांचा !

■■ १५ ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिन , त्यानिमित्तानं हे  कांही आत्मपर –■■ बालपणीचा काळ , १९६०ते ७०च्या दशकातला . माझी आई-माई नर्स होती . औरंगाबाद जिल्ह्यातलं खंडाळा आणि बीड जिल्ह्यातलं नेकनूर ही दोन गावं वगळली तर तिची प्रत्येक नियुक्ती आडगावातलीच . एसटीनं  रस्त्यावरच्या फाट्यावर सोडलं की तिच्या नियुक्तीचं गाव …

दसऱ्याची धुळवड !

शिवसेनेतल्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांनी या वर्षीच्या  दसऱ्याचा माहोल  ‘हायजॅक’ केला . या मेळाव्यापुढे प्रकाश वृत्त वाहिन्या , डिजिटल प्लॅटफॉर्म आणि मुद्रीत माध्यमांना या राज्यात इतर काही प्रश्न आहेत याचा जणू विसरच पडलेला होता . गर्दीचा निकष लावला तर एकनाथ शिंदे आणि भाषणाच्या आघाडीवर उद्धव ठाकरे …