|| परमधाम आश्रम , वर्धा ||

      || नोंद …४ || नागपूरहून वर्ध्याला जाताना पवनार गावाच्या आधी एक पूल लागतो . या पुलाच्या थोडसं अलीकडे उजव्या हाताला एक छोटा रस्ता खाली उतरतो आणि नदीकाठाला बिलगत पुन्हा उजवीकडे एका छोट्या  चढावरचं वळण घेऊन परमधाम आश्रमात विसावतो . हाच तो आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम . …

सूर्यकांता पाटीलांची निवृत्ती आणि मराठवाड्याचं ‘न’ नेतृत्व…

सूर्यकांता पाटील यांनी राजकारणातून निवृत्त व्हायचा निर्णय घेतल्याचं वाचनात आलं . त्या भाजपच्या राजकारणातून निवृत्त झाल्या की एकूणच राजकारणातून , हे कांही अजून स्पष्ट झालेलं नाही . अलीकडच्या दीड-दोन वर्षात सूर्यकांता पाटील यांच्याशी ज्या कांही भेटी झाल्या त्यातून त्यांची झालेली घुसमट जाणवत होती . त्यामुळे भाजपच्या गोटातून तरी त्या आज-ना-उद्या …

हार्मोनियमवर बंदी घालणारे बा. वि. केसकर !

( अजूग = एकाकी / एकटा / एकेरी / बेगुमान / आड-दांड अशा अनेक अर्थछटा असलेला आणि कालौघात बराचसा विस्मरणात गेलेला शब्द म्हणजे ‘अजूग’ . ) || ३ || हार्मोनियमचे सूर कानी आले आणि तब्बल साडे तीन दशकं मनाच्या कुठल्या तरी सांदी कोपर्‍यात दडून बसलेली केसकर यांची   आठवण उसळी मारुन समोर …

इथे ओशाळला असेल कोरोनाही…

कोरोनाचा प्रतिबंध घालण्यात राज्य सरकारला आलेल्या अपयशाकडे लक्ष वेधण्यासाठी      माजी मुख्यमंत्री ( आणि पुन्हा होण्यासाठी आसुसलेले ) देवेन्द्र फडणवीस तसंच ( केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे यांचे ‘बगलबच्चू’ म्हणून राजकारणात ओळखले जाणारे ) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने केलेलं आंदोलन ना घटना ना कायद्याच्या विरोधी आहे …

कलाकृती आकळणं आणि आठवणींचा गुंता

|| २ || अक्षर लेखन- विवेक रानडे ( अजूग = एकाकी / एकटा / एकेरी / बेगुमान / आड-दांड अशा अनेक अर्थछटा असलेला आणि कालौघात बराचसा विस्मरणात गेलेला शब्द  आहे . ) ज्येष्ठ समीक्षक  बाळकृष्ण कवठेकर सरांच्या पोस्टमधील , “उतारवयातील हे एकाकीपण कुठे घेऊन जाणार कळत नाही . पुस्तके आहेत …

‘जीना और मरना भी कोरोना के साथ…’

( रेल्वे खाली चिरडल्या गेलेल्या मजुरांच्या रुळांच्यामधे पडलेल्या पोळ्या…छायाचित्र योगेश लोंढे ) ‘कोरोनाच्या महाभीषण आपत्तीमुळे देशावर लादलेली सलग तिसरी टाळेबंदी येत्या १७ मे रोजी उठवली जाईल याबद्दल ठाम साशंकता आहे . टाळेबंदीचा हा ‘खेळ’ १५ जूनपर्यंत सुरु राहू शकतो , असे संकेत स्पष्टपणे मिळू लागलेले आहेत . देशातल्या सुमारे १३० …

पत्रकाराचीही , चूक ती चूकच !

सध्या एका पत्रकारानं केली न केलेली चूक आणि एका पत्रकारितेच्या नावाखाली भाटगिरी करणारावर  झालेला हल्ला चर्चेत आहेत . त्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार  कामिल पारखे यांनी ‘अक्षरनामा’ या पोर्टलवर ‘पत्रकारितेतील ‘त्या’ अनुचित आणि सहज टाळता येण्यासारख्या घटनेचा सल आजही माझ्या मनात आहे !’ या लेखात त्यांच्या एका चुकीची कबुली दिली आहे …

पत्रकारितेवर घोंगावणारं खरं संकट

सध्या पत्रकार राहुल कुलकर्णी आणि एबीपी माझा ही प्रकाश वृत्त वाहिनी माध्यमात चर्चेत आहे . समकालीन मराठी माध्यमात जे पत्रकार चांगल्या बातम्या देतात , त्यात राहुल आघाडीवर आहे . त्याच्या कांही बातम्या त्याच्यातल्या संवेदनशील माणूस , उत्सूक  व जागरुक पत्रकारितेचा परिचय करुन देणाऱ्या असतात तर कांही कोणतीही शहानिशा करता दिलेल्या …

रात्र महाभयंकर वैऱ्याची आहे , आपण गंभीर कधी होणार ?

( वरील छायाचित्र – ‘सोशल  डिस्टनसिंग’चा असा हा अजब फंडा . चौकटीत पिशव्या ठेऊन लोक सावलीत एकत्र येत गप्पा मारत बसले आहेत ! || १ || ६ ते २५ मार्च समाज माध्यमांवर फारच क्वचित होतो , वृत्तपत्र तर बंद झालीयेत हे लक्षातही आलं नाही . कोरोनानं घातलेला धुमाकूळ आणि सरकार …

‘लोकशिक्षक’ मा. गो. वैद्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते , संघाच्या हिंदुत्वाचे प्रखर भाष्यकार अशी ओळख असलेल्या मा. गो.  वैद्य यांच्या व्यक्तीमत्वाचे  एक साक्षेपी , निष्पक्ष , व्यावसायिक आणि कुशल संपादक , भाषा तज्ज्ञ , संस्कृतचे शिक्षक व अभ्यासक हेही  असलेले पैलू अनेकांसाठी अज्ञात आहेत . मा. गो. वैद्य यांच्या  या वेगळ्या पैलूंवर  प्रकाश …