​पवारांना पर्याय नाही !

एक शरद पवार वगळता कॉंगेस किंवा राष्ट्रवादीचा एकही नेता गेल्या वर्षभरात विरोधी पक्ष नेत्यासारखा वागलेला नाही. या राज्याला विधिमंडळात आणि विधिमंडळाबाहेर सौम्य ते आक्रमक अशा विरोधी पक्षाच्या नेतृत्वाची परंपरा आहे. पत्रकार या नात्याने विधीमंडळात माझा वावर १९७८ साली सुरु झाला तेव्हा उत्तमराव पाटील परिषदेत तर गणपतराव देशमुख सभेतील विरोधी पक्ष …

बावनकुळेंची मोहिनी,रावतेंचा षटकार,फडणवीसांचे बस्तान पक्के !

मंत्र्यांचे प्रगतीपुस्तक / उत्तरार्ध * विनोद तावडेंची पीछेहाट * पंकजांवर दडपण नको! * चंद्रकांत(दादा) अडकले प्रतिमेत उर्जाखाते आणि या खात्याशी संबधित असणाऱ्या सर्वच विभागांवर चंद्रशेखर बावनकुळे यांची अक्षरश: मोहिनी आहे. टोकाच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आयुष्याशी वाटचाल झालेली आहे की आपणही थक्क व्हावे, हा अनुभव या माणसाने विधानसभेची …

मुनगंटीवारांची फडणवीस-खडसेंवर आघाडी !

मंत्र्यांचे प्रगतीपुस्तक / पूर्वार्ध      या महिन्याच्या अखेरीस राज्यातील देवेंद फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युती सरकारला एकवर्ष पूर्ण होईल. या वर्षातील कामाचा लेखा-जोखा सरकारकडून मांडला जाईल. सरकार स्वत:च्या कामगिरीवर खूष असेल आणि लोकशाही परंपरेनुसार विरोधी पक्षाच्या दृष्टीकोनातून सरकारची कामगिरी निराशाजनक असेल! गेले महिनाभर अनेकांशी बोलून …

चला, शेतकऱ्यांसाठी एक पणती पेटवू यात…

//१// आसवांवर पिक काढावं म्हटलं तर डोळे आटलेले आहेत, अशा भयाण परिस्थितीतून गेल्या आठवड्यात राज्याच्या दुष्काळी आणि त्यातही प्रामुख्यानं मराठवाड्याची बऱ्यापैकी मुक्तता झाली आहे. परतीची वाट धरताना मान्सूननं अनेक भागात दिलासादायक हजेरी लावली. जोरदार नाही तरी मध्यम पावसाच्या सरी चांगल्या बरसल्या. नदी-ओढे चार-दोन दिवस वाहिले. पिण्याच्या पाण्याचा, जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न …

शेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला !

माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स.न. आपण मध्यंतरी जपानच्या दौऱ्यावर असतांना विदर्भातील वाशीम जिल्ह्यातील जऊळका (रेल्वे) या गावातील दत्ता उपाख्य गुड्डू आत्माराम लांडगे या शेतकऱ्यानं आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी दत्तरावनं आपल्याला एक पत्र लिहून ठेवलं आहे. ते पत्र आपल्यापर्यंत पोहोचलं नसणार. अशा संवेदनशील बाबी सरकारपासून लपवण्याची सराईत कोडगी परंपरा नोकरशाहीत असतेच, …

राहुलसाठी दिल्ली दूरच…

स्वप्न विकायची आणि मतं घ्यायची असा आपल्या देशाच्या सत्ताप्राप्तीच्या समकालीन राजकारणाचा उसूल आणि ‘गरीबी हटाव’ ते ‘अच्छे दिन’ असा हा दीर्घ पल्ला आहे. इंदिरा गांधी यांनी दाखवलेल्या स्वप्नाने तो सुरु झाला आणि नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत तो आता पोहोचला आहे. या प्रवासात काही काळ जयप्रकाश नारायण यांच्या आशीर्वादानं मोरारजी देसाई, इंदिरा …

हम नही सुधरेंगे !

आता परतीचाही मान्सून बरसण्याची शक्यता नाही अशा बातम्या प्रकाशित झालेल्या असतानाच औरंगाबाद या शहराच्या नामांतरावरुन सुरु झालेल्या खडाखडीच्या बातम्या वाचताना मनात आलेली पहिली प्रतिक्रीया आहे, ‘हम नही सुधरेंगे’! मराठवाड्यातील भीषण दुष्काळामुळे विदीर्ण झालेल्या अंत:करणाने लोकप्रतिनिधीं आणि प्रशासनाच्या संवेदना हरपल्या आहेत अशी जी टीका होते आहे–व्यथा मांडली जात आहे त्यावर शिक्कमोर्तब …

काळीज कुरतडवणा-यांचा महाराष्ट्र…

* पालन-पोषण करणं अशक्यच झालं म्हणून अगतिक झालेल्या परभणी जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं त्याची बैलजोडी एकही छदाम न घेता समोरच्याच्या हवाली केली – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवरून ही माहिती दिली आहे. * पाणी नाही, चारा नाही म्हणून गेल्या दोन वर्षात खंगलेल्या जर्सी गायींनी शेवटचा श्वास घेतल्याचं …

हवे आहेत, अंधाराची तहान लागणारे…

//१// वर्तमानाच्या मानगुटीवर इतिहास कायम विराजमान असतो आणि जुनं काही तरी उकरून काढून तो वर्तमानाला छळत असतो, असं जे म्हणतात त्याचा प्रत्यय गेला आठवडाभर महाराष्ट्रात जे काही घडलं त्यातून आला. महाराष्ट्रात जे दुहीचं वातावरण गेला आठवडाभर निर्माण झालं ते काही वर्तमानाला कायम प्रेरणा देणाऱ्या इतिहासातल्या छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वप्नातही …

बिहारी फटाके !

निवडणुका जाहीर होण्याआधी आणि दिवाळी बरीच दूर असताना बिहारात फटाके फुटायला लागले आहेत. अर्थातच हे फटाके राजकीय आहेत. विकासाचे तथाकथित गुजराथी मॉडेल घेऊन देश चालवणारे नरेद्र मोदी आणि सर्वच बदलौकिकाच्या गटारगंगेतून बिहारला शुद्ध करणारे नितीशकुमार हे दोघे सध्या राजकीय फटाके फोडण्यात आघाडीवर आहेत आणि बिहारातील लढाई या दोघातच झाडणार आहे. …