वाढता असुसंस्कृतपणा … 

हा मजकूर प्रकाशित होईल तेव्हा राज्य विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल हांकेच्या अंतरावर आलेला असेल आणि त्याबद्दल मुद्रीत तसंच इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांतून निकालाची भाकितं व्यक्त झालेली असतील तेव्हा त्या तपशीलात जाण्यात कांहीच हंशील नाही . मात्र , माजी पंतप्रधान मनमोहनसिंह यांची पत्रकार परिषद पाहतांना त्यांचा सुसंस्कृतपणा पुन्हा अनुभवयाला मिळाला आणि कवी आरती प्रभू …

देर लगी आने में तुमको…

विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख उलटल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा आणि एक निर्विवाद लोकप्रिय नेते राज ठाकरे यांचं प्रचाराच्या  रणधुमाळीत धुमधडाक्यात आगमन झालं आहे . पहिल्याच सभेपासून राज ठाकरे नावाची मुलुखमैदानी तोफ गरजू लागली आहे . माध्यमांत त्यांना चांगली प्रसिद्धी मिळू लागलेली आहे यात आश्चर्य ते कांहीच नाही …

पिसाटलेली पत्रकारिता !

माध्यमात आणि त्यातही विशेषत: इलेक्ट्रॉनिक्स  माध्यमात लाईव्ह प्रसारणाचं आलेलं फॅड म्हणजे कोणतंही तारतम्य नसलेली , पिसाटलेली आणि अक्षरश: उबग आणणारी पत्रकारिता आहे . अंमलबजावणी संचालनालयाच्या ( ED) न आलेल्या समन्सवरुन देशातील ज्येष्ठतम नेते शरद पवार यांनी जो राजकीय इव्हेंट उभा केला त्यात माध्यमे आणि त्यातही विशेषत: प्रकाश वृत्तवाहिन्या अलगद अडकल्यानं …

निकालानंतरची धुळवड !

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले ; केंद्रात नवीन सरकार अस्तित्वात आलं आणि नेहेमी जे घडतं ते म्हणजे , निवडणुकीनंतरचं कवित्व म्हणा की धुळवड आता सुरु झाली आहे . यात आधी परस्परांविषयी व्यक्त केलेल्या अति(?)आपुलकी/आदराच्या भावना आणि आता व्यक्त केलेला उद्वेग, तळतळाट असा विरोधाभास आहे . ( अशा दोन परस्पर विरोधी भावना …

…पर्याय राहुल गांधीच !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भक्त तसंच भाजप समर्थकांच्या पचनी पडणार नाही आणि काँग्रेसजनांना रुचणार नाही , तरी स्पष्टपणे सांगायलाच हवं- २०१४च्या तुलनेत २०१९च्या लोकसभा निवडणुकीत अमेठीचा पराभव वगळता राहुल गांधी यांची कामगिरी चांगली…च राहिली आहे , असं माझं ठाम मत आहे . काँग्रेसच्या लोकसभेतील जागा ४४वरुन ५२वर पोहोचल्या म्हणजे कॉर्पोरेट भाषेत “राहुल गांधी यांचा केआरए …

नको उश्रामे आणि नको उन्मादही…

लोकसभा निवडणुकीचा निकाल आलाय ; नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष अपेक्षेपेक्षा जमोठ्ठ्या बहुमताने विजयी झालेले आहेत . मतदान यंत्राविषयी शंका , विजेत्यांनी साम-दाम-दंड भेदाचा अवलंब केला , जनमत अलोकशाहीवादी आहे , हा नॉन सेक्युलर विचारांचा विजय आहे , असा कोणताही कांगावा न करता समजूतदारपणे तसंच कोणताही नाहक वाद निर्माण …

कोलकात्यातील कांगावा

या लोकसभा निवडणुकीत मतमतांतरे , बेताल आरोप–प्रत्यारोपांचा कर्कश्श गलबला होताच ; त्यात आता हिंसाचाराची भर पडली आहे . अगदी ‘शत्रूचा शत्रू’ असं नव्हे तर , राजकारणाच्या भाषेत बोलायचं झालं तर प्रतिस्पर्ध्याचा प्रतिस्पर्धी तो आपला मित्र असं कांहीबांही म्हणत किंवा समर्थन करत नरेंद्र मोदी आणि भाजपला विरोध आहे म्हणून पश्चिम बंगालमध्ये …

प्रचार नव्हे उन्माद आणि अकाडतांडवही !

गुजरात विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराने गाठलेली पातळी बघताना २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आपले नेते आणखी खाली उतरणार याबद्दल व्यक्त केलेली भीती खरी ठरली आहे . आपल्या देशात आजवर झालेल्या सर्वच निवडणुकातली ‘उन्मादी     आरोप-प्रत्यारोपाची , असभ्य व लाज आणणारी’ पातळी गाठणारी अशी २०१९च्या लोकसभा निवडणुकीची नोंद होणार याबद्दल आता कोणतीही शंका विवेकी जनांच्या …

महाराष्ट्रात तरी काँग्रेस निर्नायक…

या लोकसभा निवडणुकीत देशात सर्वत्र काँग्रेस पक्षाची गेल्या निवडणुकीपेक्षा मोठी सरशी होण्याची चिन्हे दिसत असतांना महाराष्ट्रात मात्र हा पक्ष चांगली कामगिरी करेल किंवा नाही अशी शंका निर्माण होण्याजोगी स्थिती आहे . विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारविषयी पावलो-पावली नाराजी दिसते आहे आणि त्यातच काँग्रेसच जाहीरनामा असा कांही …

अडवाणी नावाची महाशोकांतिका…

लोकसभा निवडणुकीच्या दुसर्‍या आठवड्यातले सर्वाधिक चर्चेतले चेहरे आहेत राष्ट्रीय पातळीवर लालकृष्ण अडवाणी आणि राज्याच्या पातळीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे . नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय राजकारणात उदय झाल्यापासून लालकृष्ण अडवाणी यांचा हळूहळू नियोजनबद्ध अस्त केला जातोय अशी भूमिका घेत मी सलग लिहितो आहे ; अर्थातच अडवाणी भक्तांना ते मान्य नाही . नरेंद्र मोदी …