पासवानांच्या ‘चिराग’ची फडफड ! 

शह-काटशह , डाव-प्रतिडाव , कोपरखळ्या , खुन्नस-वचपा , अशा अनेक कृती राजकारणात सतत घडत असतात . या कधी दृश्यमान असतात तर कधी नसतात . दृश्यमान नसणाऱ्या अशा कृतींचे परिणाम काही काळानंतर दिसू लागतात . राजकारणाचा हा खेळ कधी कुणाला वर चढवतो , तर कधी कुणी राजकारणाच्या साप-शिडीवरुन थेट तळाला येऊन …

मुद्दा , कुणी पक्ष सोडण्याचा नाही !

जितीन प्रसाद यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला म्हणून फार काही आभाळ कोसळलं आहे , असं समजण्याचं कारण नाही कारण पक्षातरं आता भारतीय राजकारणाचा अविभाज्य अंग झालेली आहेत . एखाद्या नेत्यानं पक्षांतर केलं हा मुद्दा नसून आता तरी काँग्रेस पक्ष खडबडून जागा होणार का नाही हा खरा मुख्य मुद्दा आहे …

पत्रकारांना संरक्षण देणारा निवाडा !

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय  उदय ललित आणि विनीत सरण यांनी नुकताच  ‘सरकारच्या कोणत्याही कृतीवर केलेली टीका हा राजद्रोह नाही’ , असा विनोद दुवा या ज्येष्ठ पत्रकाराच्या संदर्भात दिलेला निर्वाळा स्वागतार्ह आणि दिलासादायकही आहे . निर्भयपणे टीकास्त्र सोडणार्‍या पत्रकारांना त्यामुळे संरक्षणच मिळणार आहे . मात्र , एखाद-दुसरा अपवाद वगळता मराठी वृत्तपत्रसृष्टीने या …

रणजित देशमुखांची पंच्याहत्तरी !

 महाराष्ट्र कॉंग्रेसचं दोनवेळा अध्यक्षपद भूषवलेले ,  राज्यात प्रदीर्घ काळ मंत्री राहिलेले रणजित देशमुख यांचा मुलगा आशीष देशमुखचा गेल्या आठवड्यात फोन आला . माजी आमदार असलेल्या आशीषनं  सांगितलं ,  ‘बाबा ( म्हणजे रणजित देशमुख  ) येत्या २९ मे रोजी पंचाहत्तरीत प्रवेश करतायेत’ . मन एकदम भूतकाळात गेलं . रणजित देशमुख आणि …

भाजपला पर्याय की चर्चेचे नुसतेच बुडबुडे ?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहा:कार माजवल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या विरोधात देशात वातावरण निर्माण झालं आहे . नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा , या  मागणीनं  समाज माध्यमांवरुन चांगलाच जोर धरलेला आहे . कोणत्याही पंतप्रधान आणि सरकारला अशा मोहिमेला सामोरं जावंचं लागतं . बेजबाबदार म्हणा का ढिसाळ कारभार केला की , विरोधाचा असा सूर उमटतच असतो . …

जिव्हारी लागलेला घाव…

राजकारण आणि राजकारण्यांवर लिहिण्याचा कंटाळा आला म्हणून या आठवड्यात साप्ताहिक स्तंभाचं लेखन केलं नाही मात्र , त्या कंटाळ्याला राजीव सातव याच्या मृत्यूच्या बातमीची जिव्हारी लागणारी फळं येतील असं चुकूनही वाटलं नव्हतं… खरं तर , कालच सकाळी वाटलं होतं की एखादा एसएमएस पाठवून राजीव सातवच्या प्रकृतीची चौकशी करावी पण , ते टाळलं कारण तसं करणं प्रशस्त वाटलं …

राष्ट्रीय पर्यायाची राजकीय दिवाळखोरी !

कुणाला तरी दैवत्व प्राप्त करुन द्यायला श्रद्धाळू माणसाला जसं आवडतं तसंच आपल्या राजकारणी , त्यातही विशेषत: राजकीय विश्लेषकांना नेहमीच सत्ताधाऱ्यांविरुद्ध एका पर्यायाचा म्हणजे ‘हिरो’चा शोध असतो . पर्याय शोधण्याचा हा ‘खेळ’ देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सुरु आहे . आधी व्यक्ती म्हणून पंडित जवाहरलाल नेहरु , लाल बहाद्दूर शास्त्री , जयप्रकाश नारायण …

समाधिस्त होण्यासाठीच या चौकशा !

सध्या महाराष्ट्रात कोरोनाच्या कहराइतकंच चौकशांचं पेव फुटलेलं आहे . गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिलेल्या अनिल देशमुख यांच्या चौकशीची प्राथमिक फेरी केंद्रीय गुप्तचर खात्यानं आटोपली आहे आणि अनिल देशमुख यांच्यावर पदाचा गैरवापर केल्याचा गुन्हा दाखल केला आहे . उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटिनच्या कांड्या ठेवल्याप्रकरणी सचिन वाझे यांची चौकशी अजून सुरुच आहे …

…सोपान बोंगाणे आणि अशोक तुपे 

 || नोंद …२५ || ज्येष्ठ पत्रकार सोपान बोंगाणे याच्या निधनाची बातमी ऐकायला आली आणि भोवंडूनच गेलो . किती वर्षांचं असेल आमचं मैत्र ? या प्रश्नाचं काही ठोस उत्तर नाही , कदाचित ४४-४५ वर्षेही उलटली असतील . सोपान आणि माझ्यामध्ये काही योगायोग आहेत . त्याची ओळख ‘लोकसत्ता’चा ठाण्याचा ‘अनधिकृत‘ वार्ताहर होण्याआधीपासूनची …

निर्लज्जम सदा सुखी…

काळजाचा टोका चुकवणार्‍या कोरोना कहरावर ज्या पद्धतीने आपल्या देशातील राजकीय पक्ष आणि त्यांच्या अधिपत्त्याखालील सरकारं व्यक्त होत आहेत , त्यासाठी ‘निर्लज्जम सदा सुखी’ असंच म्हणायला प्रत्यवाय नाही . एकीकडे राजकीय पक्ष निर्लज्ज आहेत तर दुसरीकडे ( आरोग्य , पोलिस , सफाई , पाणी व  वीजपुरवठा आदी सेवांचा अपवाद वगळता ) …