भाजपचं पडद्याआडचं ‘कर्नाटक कनेक्शन’
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याआधीच भारतीय जनता पक्षाच्या विषय पत्रिकेवर ‘ऑपरेशन कर्नाटक’ आणि ‘ऑपरेशन उत्तरप्रदेश’ होते . भाजपत अलीकडे घडलेल्या सर्व प्रमुख घटनांशी कर्नाटक कनेक्शन आहे ते कसं , या मजकुराच्या नंतरच्या भागात येणारच आहे . ठरल्याप्रमाणे कर्नाटकमधलं ऑपरेशन पार पडलं असून त्यात बी . एस . येडीयुरप्पा यांनी बाजी मारली …