मराठीसाठी इष्टापत्ती ठरलेली रावतेंची निराशा !
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना साक्षी ठेवत हृदयाला हात घालणारी भावनात्मक भाषा वापरुन आणि काहीशी झोंबरी टीका केल्यानंतर अखेर मराठी विद्यापीठ तसंच मराठी भाषा भवनासाठी मुंबईतील ऐन मोक्याचा , मरिन ड्राईव्हवरचा भूखंड देण्याचं सरकारनं जाहीर केलं आहे . उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या …