अंधाराची फुलं…
बेगम हयात असती तर आज , ९ डिसेंबरला तिचा ६७वा वाढदिवस आम्ही साजरा केला असता… 〈 या वर्षी दिवाळी अंकासाठी फारच कमी लेखन केलं . त्यात एक लेख अविनाश दुधे याच्या आग्रहामुळे ‘मीडिया वॉच’ दिवाळी अंकासाठी ‘मी आणि माझं एकटेपण’ या परिसंवादासाठी लिहिला . माझ्या एकटेपणाचा संबंध केवळ कोरोनाशी नाही …